*स्मशानभुमी द्या अन्यथा आंन्दोलन*खामगाव (का.प्र.) शहरापासुन अगदी शहरातीलच वाडी ग्रामपंचायती मध्ये स्मशानभुमी करीता ग्रामसेवकाकडे आन्दोलनात्मक निवेदन गावची लोकसंख्या 8/10 हजार असून आज पर्यंत गावाला स्मशान भूमी मिळाली नाही दुर्भाग्य आहे. आणि गांवकरी मंडळी यांनी लोक वर्गणी जमा करून बांधली होती ती आज दिनांक 26.05.2024 रविवार चक्री वादळ आल्या मुळे जमीन दोस्त झाली आहे. आम्ही सर्व गावकरी आज आमच्या गावचे सरपंच विनोद प्रमोद मिरगे यांना त्याची सूचना दिली व त्याची दुरस्ती ची मागणी केली असता, त्यांनी आम्हाला ती स्मशान भूमी अवैध रित्या तुम्ही बांधली आहे त्या मुळे आम्ही काहीच मदत करू शकत नाही त्या मुळे आम्हाला 15 दिवसात स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी,अन्यथा आम्ही 16 व्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालया समोर स्मशान भूमीचे भूमिपूजन करून त्या जागी लोकं वर्गणी मधून स्मशान भूमि करू त्यामुळे पुढे भविष्यात काही तणाव निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील. असे निवेदन पञात राजेश धोंडुजी खोद्रे यांनी म्हटले आहे तर या निवेदनाच्या प्रतीलिपी मुख्यमंत्री कार्यालयगृहमंत्री साहेब, पालक मंत्री,आकाश फुंडकर आमदार साहेब खामगाव विधान सभा कलेक्टर साहेब बुलडाणा Sdo साहेब Bdo साहेब पंचायत समिती खामगाव... शहर पोलीस स्टेशन यांना पाठविल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post