*लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना केले हजारो चाहत्यांनी अभिवादन* *खामगाव* --सर्वसामान्यांचे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी हजारो चाहत्यांनी विनम्र अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी पणन महासंघाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, लोकसभेचे सर्वोत्कृष्ट संसदपटू, राज्याचे माजी कृषिमंत्री सर्वसामान्याचे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा आज स्मृतिदिन. या निमित्ताने शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शक्तिस्थळ असलेल्या स्मृतीस्थळी आज त्यांच्या हजारो चाहत्यांनी हजेरी लावली व त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोभावे अभिवादन केले. याप्रसंगी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे ज्येष्ठ पुत्र भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर ,खामगाव विधानसभाचे लाडके आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचेसह त्यांचे संपूर्ण परिवार स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाले. पहाटेपासूनच या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करीत त त्यांच्या समाधी स्थळी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. कार्यकर्त्यांसह बुलढाणा ,अकोला व इतर जिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उपस्थित राहून त्यांचे समाधीचे दर्शन घेत त्यांना मनोभावे अभिवादन केले. byदिव्यांग शक्ती -May 31, 2024
वाळूसाठे शोधण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*नांदुरा तालुक्यात 1775 ब्रास वाळू जप्त*सिंदखेडराजा, खामगावात टिप्परवर कारवाईबुलडाणा, दि. 29 : ( का.प्र.)अवैध वाळूबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आठवडाभरापासून कार्यवाही करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात येत आहे. या वाळूसाठ्याचा शोध ड्रोन सर्व्हेक्षणाने घेण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात आढळणारा वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाळूसाठा निदर्शनास येऊनही कारवाई केली नसल्यास संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.मलकापूर, नांदुरा, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यात वाळूसाठे आणि वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 1775 ब्रास वाळू साठे जप्त केले. मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात अपर तहसिलदार आणि कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात बेलाड गट नं. 224 येथे 354 ब्रास, बेलाड गट नं. 5 येथे 324 ब्रास, बेलाड गट नं. 19 येथे 103 ब्रास, येरळी गट नं. 236 येथे 85 ब्रास, बेलाड गट नं. 103 येथे 110 ब्रास, पलसोडा गट नं. 352 येथे 314 ब्रास, पतोंडा गट नं. 1 येथे 362 ब्रास, नांदुरा खुर्द येथे 123 ब्रास असा एकूण 1775 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला.मलकापूर येथे काल दिवसभरात एकूण 400 ब्रास रेती साठा जप्त करून लिलावाची कार्यवाही करण्यात आली. उकळी, ता. मेहकर येथे 50 ब्रास रेती जप्त करण्यात आली. पूर्णा नदीकाठील सावळी, ता. संग्रामपूर गावानजीक वनविभागाच्या जमिनीवर चार विविध ठिकाणी सुमारे 480 ब्रास वाळू साठा आढळून आला. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या सहाय्याने सदर वाळूसाठा जप्त करण्यात आला.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे 4 ब्रास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी एस. एस. म्हस्के, तलाठी जी. एस. टेकाळे, एस. जी. पांडव, आर. एस. देशमुख, व्ही. यू. कटारे, एस. आर. नागरे, आर. आर. लांडगे यांनी दि. 28 मे 2024 रोजी रात्री कारवाई केली. उमरद येथे समाधान नारायण मोरे, रा. ताडशिवणी यांच्या मालकीचे चार ब्रास रेती भरलेले टिप्पर क्रमांक एमएच 28 बीबी 7426 हा अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अटकाव करण्यात आला आहे. खामगाव येथे जप्त करण्यात आलेल्या वाहनाला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करून 64 हजार रुपये माल जप्त करण्यात आला आहे byदिव्यांग शक्ती -May 29, 2024
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाची उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक...हिंगणघाट मारोती महाकाळकर शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध पडला जिवघेणा खड्डा.....**राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उडानपूल बनतोय धोकादायक...* *राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदरावर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्याची त्वरित दुरुस्ती करून रस्त्या बांधण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी..शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे बांधकामाला फक्त दोन वर्षे झाले असून, पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून काश्मीर ते कन्याकुमारी ला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक रात्रन दिवस सतत सुरु असतात. या खड्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. यासोबतच महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतांत. सध्या परिस्थितीत झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या कंत्राटदार सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवर बोलून स्तविस्तर चर्चा केली.तसेच राष्ट्रीय प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा ईशारा देखील प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेवराव गौळकार, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव वांदीले, माजी संचालक सुरेशराव सातोकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोषराव तिमांडे, समुद्रपुर तालुका बूथअध्यक्ष गणेश वैरागडे, तालुका उपाध्यक्ष संजय लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अमोल बोरकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, सिद्धार्थ मस्के, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, उपसरपंच प्रवीण कलोडे, सुनील भूते, वाहतूक सेल विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे, जगदीश वांदिले, कुणाल येसंभरे, प्रशांत ऐकोनकर, उमेश नेवारे, अनिल भूते, विपुल थुल, अनिल आडकीने, समीर चापले, आशिष शेंडे, बचू कलोडे, संतोष चौधरी, पंकज भट, रत्नाकर पाटील, अमोल मुडे, बंडूजी लिहितकर, सुशील घोडे, शेखर ठाकरे, राहुल जाधव, मो. शाहीद, राजू मुडे, दिपक चांगलं,रंजित थुल, आकाश हुरले, आदित्य बुट्टे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.........प्रतिक्रिया...... *हिंगणघाट शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 वरील नांदगाव चौक येथील उडानपूल मागील तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. वाहतुकीसाठी सुरु झालेला हा उड्डाणपूल सुरु होताच विविध रोड च्या कामामुळे रस्त्या बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. यादरम्यान अनेकदा या उडानपुलाची डाग डुजी करण्यात आली. मात्र आता तर या उडान पुलाच्या मधोमध आर पार दिसणारा मोठा भगदाड पडला आहे.त्यामुळे या उडानपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल...**अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस**राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी* यांनी कळविले byदिव्यांग शक्ती -May 29, 2024
प्रेसनोट..*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाची उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक...**हिंगणघाट (मारोती महाकाळकर) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध पडला जिवघेणा खड्डा.....**राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उडानपूल बनतोय धोकादायक...* *राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी करत शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेला हा खड्डा अपघातास निमंत्रण देतो आहे. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदरावर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्याची त्वरित दुरुस्ती करून रस्त्या बांधण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी..शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचे बांधकामाला फक्त दोन वर्षे झाले असून, पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून काश्मीर ते कन्याकुमारी ला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक रात्रन दिवस सतत सुरु असतात. या खड्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. यासोबतच महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतांत. सध्या परिस्थितीत झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या कंत्राटदार सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवर बोलून स्तविस्तर चर्चा केली.तसेच राष्ट्रीय प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा ईशारा देखील प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेवराव गौळकार, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव वांदीले, माजी संचालक सुरेशराव सातोकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोषराव तिमांडे, समुद्रपुर तालुका बूथअध्यक्ष गणेश वैरागडे, तालुका उपाध्यक्ष संजय लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अमोल बोरकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, सिद्धार्थ मस्के, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, उपसरपंच प्रवीण कलोडे, सुनील भूते, वाहतूक सेल विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे, जगदीश वांदिले, कुणाल येसंभरे, प्रशांत ऐकोनकर, उमेश नेवारे, अनिल भूते, विपुल थुल, अनिल आडकीने, समीर चापले, आशिष शेंडे, बचू कलोडे, संतोष चौधरी, पंकज भट, रत्नाकर पाटील, अमोल मुडे, बंडूजी लिहितकर, सुशील घोडे, शेखर ठाकरे, राहुल जाधव, मो. शाहीद, राजू मुडे, दिपक चांगलं,रंजित थुल, आकाश हुरले, आदित्य बुट्टे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.........प्रतिक्रिया...... *हिंगणघाट शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 वरील नांदगाव चौक येथील उडानपूल मागील तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. वाहतुकीसाठी सुरु झालेला हा उड्डाणपूल सुरु होताच विविध रोड च्या कामामुळे रस्त्या बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. यादरम्यान अनेकदा या उडानपुलाची डाग डुजी करण्यात आली. मात्र आता तर या उडान पुलाच्या मधोमध आर पार दिसणारा मोठा भगदाड पडला आहे.त्यामुळे या उडानपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल...**अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस**राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी* byदिव्यांग शक्ती -May 29, 2024
खामगाव- जलंब फेरीच्या वेळेत बदल प्रवाशांनी नोंद घ्यावी खामगाव (मधुकर पाटिल) खामगाव वरून जलंब साठी सुटणाऱ्या तीन डब्याच्या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.ही गाडी आता पहाटे खामगाव वरून जलंब साठी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. याआधी ही गाडी पहाटे 4.50 मिनिटांनी सुटायची त्यामुळे जलंब वरून पहाटे 5 वाजता सुटणारी वर्धा-भुसावळ पॅसेंजर गाडी खामगाव येथील प्रवाशांना मिळत नव्हती त्यामुळे खामगाव वरून साठी पहाटे 4.50 मिनिटाला निघणाऱ्या गाडीच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी येथील प्रवाशातर्फे करण्यात आली होती.या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन खामगाव वरून जलंब साठी पहाटे 4.50 च्या गाडीच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे आता खामगाव वरून जलंब व तेथून मुंबई हावडा मेल वर्धा- भुसावळ पॅसेंजर व मुंबई हावडा मेल हे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. गाडीच्या वेळेच्या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी व या फेरीचा लाभ घ्यावा असे आव्हान येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक च्या वतीने करण्यात आले आहे. खामगाव वरून जलंब साठी व जलंब वरून खामगाव साठी दररोज प्रत्येकी चार फेऱ्या सोडण्यात येत आहे त्या फेऱ्या अशा खामगाव वरून जलम साठी पहाटे 4.40 वाजता सकाळी 10.30 वाजता दुपारी 3.20 वाजता व रात्री 8:40 वाजता जलंब वरून खामगाव साठी पहाटे 4 वाजता सकाळी 9 वाजता दुपारी 2.50 वाजता व दुपारी 4.50 वाजता byदिव्यांग शक्ती -May 28, 2024
युडीआयडी नोंदणी करणाऱ्या बेवसाईटचे अपडेशन दिव्यांगांनी युडिआयडी साठी काही दिवसांनी तपासणी करावी स(ाईड अपडेशनसाठी ) Unique Disability ID खामगाव (शेखर तायडे) :- संपुर्ण देशभराची असलेली युडिआयडी प्रणाली आधारित दिव्यांग तपासणीची ऑनलाईन साईड चे अपडेशनची प्रक्रिया चालु असल्यामुळे तपासणीला जाण्यापुर्वी किंवा तपासणी झालेनंतर दिव्यांग अर्ज मध्ये जुटी दिसुन येत आहेत ज्यामध्ये जन्म तारिख, टक्केवारी, नावबदल, ठिकाण, अर्ज केल्याची तारिख आदीमध्ये जुटी दिसुन येत आहेत. हि सर्व प्रक्रिया सुरळित होण्याकरिता साधारण पंधरा ते बीस दिवस लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे जर का आपण आपला अर्ज सादर करत तपासणी करिता जाणार आहात तर वरिल दर्शविलेल्या बाबीकडे लक्ष देऊनच पुर्तता करा जर का अर्ज भरुन तपासणी केली त्यात जुटी निर्माण झाली तर पुढिल प्रक्रिया म्हणजे सरेंन्डर करणे किचकट होऊन जाते. त्यामुळे आपले शारिरीक सह आर्थिक नुकसान होणारच हे टाळण्यासाठी थोडा विलंब सहन करत रितसर तपासणी करण्याचे करावे byदिव्यांग शक्ती -May 27, 2024
जिल्ह्यात दिव्यांग, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्व्हेक्षणसर्व्हेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटीलबुलडाणा, दि. 27 : जिल्ह्यातील दिव्यांग आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येत येत आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीने औरंगाबाद येथील महात्मा गांधी सेवा संघ घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाचे सर्व्हेक्षण करीत आहे. यातून जिल्ह्यातील दिव्यांग, एकल महिला, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबाची स्थिती समोर येण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी या सर्व्हेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.जिल्ह्यात सर्व्हेक्षण करताना मागील काळात कुटुंबातील सदस्यानी केलेली आत्महत्या, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय, आत्महत्येचे कारण, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे वय, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला असणारी मुले व मुली, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नी किंवा पतीचे नाव, कुटुंबात असणाऱ्या एकल महिला, विधवा, परित्यक्ता, तृतीयपंथी यांच्याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे २१ प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. तसेच कायदा लागू झाल्यानंतर दोन वर्षात राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा, तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम, योजना तयार कराव्यात. त्यानुसार दिव्यांगाचे सर्वेक्षण, तपासणी आणि दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्यात येणार आहे.दिव्यांगांच्या एकूण लोकसंख्येची किंवा त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती शासनाकडे अचूक नोंद उपलब्ध होण्यासाठी सदर सर्वेक्षण उपयुक्त ठरणार आहे. या सर्वेक्षणातून माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाकरिता विविध उपक्रम व योजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहितीचे संकलन करणे, दिव्यांग व्यक्ती विषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या समस्या, गरजा ओळखणे व त्यांचे सर्वांगीण पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे.दिव्यांगांना आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार, शिक्षण, प्रशिक्षण, दिव्यांगत्वाचे कारण समजून घेण्याकरिता समाजामध्ये जागरूकता मोहीम राबविणे, लहान वयातच दिव्यांगत्व ओळखून, ते कमी करण्यासाठी, त्याचा शोध घेवून शीघ्र निदान व त्वरीत उपचार करणे, त्यांच्या पुनर्वसनास प्रोत्साहन देणे आदी उपाययोजना करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण सुरू आहे.दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण जिल्ह्यातील सर्व शहरे, गावे, वाडी-वस्ती, तांडे व पाड्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, कटक मंडळामध्ये राबविण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण करण्यासाठी आशा गट प्रवर्तकांकडून गावस्तरावरील आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी लोकप्रतिनिधींनाही सहभागी करण्यात येणार आहे. byदिव्यांग शक्ती -May 27, 2024
आनंदराव अडसुळ होणार राज्यपाल!बुलढाणा (वि.प्र): अमरावतीमधून माजी अर्थराज्यमंञी आनंदराव अडसुळ यांना लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी भाजपने राज्यपालपदाची ऑफर दिल्याचा दावा शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. अडसूळ म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला राज्यपालपदाचा कार्यभार मिळेल, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावासह केंद्राकडे शिफारस पाठवणार असल्याचे सांगितले. राज्यातील वातावरण विरोधी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) बाजूने असल्याचे अडसूळ यांनी म्हटल्याच्या एका दिवसानंतर आणि विरोधकांनी संयुक्त आघाडी स्थापन केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला काही प्रमाणात बळ मिळेल, असे सांगितल्यानंतर ही प्रतिक्रिया आली. विरोधकांनी एकजुटीची स्थापना केल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीचे काही नुकसान होणार आहे. अमरावती लोकसभा जागेसाठी अडसूळ इच्छुक होते, मात्र महायुतीने त्यांच्याऐवजी भाजपच्या नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. नवनीत राणा विजयी होतील याची शाश्वती नसल्याचेही अडसूळ म्हणाले. अडसूळ यांनी सेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या राज्यामध्ये महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल या विधानाचे अडसुळ यांनी समर्थन केले होते. तर अडसुळ यांचा अमरावती व बुलढाणा लोकसभेतील जनसंपर्क पाहता तसेच विविध संघटनेचा असलेला त्यांचा दांडगा अनुभव शिवसेना (शिंदे)फायद्याचा ठरणार असल्याचे दिसणार आहे byदिव्यांग शक्ती -May 26, 2024
*चोरट्यांचा शेतशिवाराकडे मोर्चा**शेतातून साहित्य लंपास*खामगाव- तालुक्यातील घाटपुरी शिवारातील एका शेतातून अज्ञात चोरट्यांनी साहित्य लंपास केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.यासंदर्भात स्थानिक गोपाळनगर भागातील रहिवासी गणेश रामेश्वर भेरडे यांनी 24 मे 2024 रोजी शिवाजीनगर पोस्टेला फिर्याद दिली. त्यामध्ये नमूद केले आहे की, त्यांच्या घाटपुरी शिवारातील गट नं. 29/2 मधील शेताला तारेचे कंपाऊंड असून लोखंडी गेटची जाळी लावलेली आहे व त्याला साखळदांडाने कुलूप लावले आहे. शेतामध्ये विहीर असून पाण्याच्या व्यवस्थेसाठी विद्युत मिटर व संच लावण्यात आलेला आहे. तसेच सिंचन व्यवस्थेसाठी शेतात पिव्हीसी पाईपलाईन टाकलेली आहे व स्प्रींकलर सिस्टीम साठी सुप्रीम कंपनीचे पिव्हीसी पाईप सुध्दा ठेवलेले होते. 22 मे 2024 रोजी सकाळी रोजी शेतीची मशागत करण्यासाठी शेतात गेलो असता गेटचे कुलूप उघडलेले असल्याचे दिसून आले. शेतात पाहणी केली असता 10 फुटाचे 6 पिव्हीसी पाईप अं. किंमत 1200 रुपये तसेच 10 फुटाचे 2 लोखंडी पाईप अं. किंमत 1500 रुपये व इतर साहित्य 500 रुपये असा एकुण 2750 रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. तरी या प्रकरणी चोरट्याचा शोध घेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद केले आहे. सदर प्रकरणी पोहेकाँ संदीप टाकसाळ तपास करीत आहेत. byदिव्यांग शक्ती -May 24, 2024
डिबीटीमार्फेत अनुदान जमा होणार तर वेळेत कागदपञे दाखल करा,,,प्रदिप कामठे पुणे..(आकाश क्षिरसागर) सर्व संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थी ना कळवण्यात येते दि 4/3/24 च्या शासन निर्णया नुसार मानधन वेळेवर DBT मार्फत करण्यात येणार आहे आपले मानधन बंद होऊ नये व महिन्यात वेळेवर मिळावे यासाठी दि 24/05/24 पासुन आपल्या राज्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागा मध्ये आपले अपंगांचे प्रमाणपत्र आधार कार्ड व ब्यांक पासबुक जमा करावे जेणेकरुन आपले संजय गांधी निराधार अनुदान वेळेवर DBT द्वारे वेळेवर जमा होईलअसे दिव्यांगांचे नेते राष्ट्रीय सचिव प्रदिप कामठे (9527818317) यांनी कळविले आहे तसेच दिव्यांगांना काही अडचणी समस्या असतिल तर त्यांनी संपर्क साधण्याचे करावे असेप्रदिप कामठे राष्ट्रीय सेक्रेटरी (सचिव )ऑल इंडिया अससोसिएशन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलीटीस. व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना यांनी प्रसिद्धीस दिले आहे byदिव्यांग शक्ती -May 24, 2024
निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनो सावधान खामगाव (मधुकर पाटील) निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनाजागृती करणेबाबत राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणूकीस बळी पडले आहेत.अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये धडु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोषागारामार्फत प्रेसनोटद्वारे निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे. अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे.निवृत्तीवेतनधारक /कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी यासाठी सावधानता बाळगावी असेसंगीता ग. जोशीउपसंचालक (निवृत्तीवेतन),यांनी कळविले आहे byदिव्यांग शक्ती -May 23, 2024
पिंपळगाव कमानी येथे सांडपाणी रस्त्यावर..... जामनेर(अशोक चव्हाण प्रतिनीधी)पिंपळगांव कमानी येथे वार्ड क्रमांक २ मधे गटारीतून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन व पाण्याचा व्हाॕल्व जोडला आहे त्यामुळे या वार्डमधील नागरिकांना रो घाण पाणी मिळत असल्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडले आहे.त्यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,ग्रामपंचायत प्रशासन चे मात्र या खंबीर विषयाकडे दुर्लक्ष असून हे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या वार्डमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे आणि वार्डमधील सर्व गटारी व पाण्याची पाईपलाईन आणि व्हाॕल्व त्वरित दुरुस्त करावे अन्यथा सर्व नागरिक ग्रामपंचायत,तहसिलदार कार्यालय,जि.प.कार्यालय आणि जळगांव जिल्हाधिकारी यांना याबाबतीत सविस्तर निवेदन देऊन ग्रामपंचायत प्रशासन विरोधात आंदोलन करेल असे निवेदन जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,संस्थेचे विद्यमान संचालक तथा उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रामपंचायत सदस्या-सौ.अनुसया चव्हाण,संस्थेचे संचालक,प्रविणभाऊ चव्हाण,भारत चव्हाण,बबलू राठोड यांच्यासह सर्व नागरिकांनी कळविले आहे. byदिव्यांग शक्ती -May 23, 2024
*न्याय न मिळालेल्या आईने व शिवसैनिकांनी चक्क ठानेदाराची आरती ओवाळण्याचा केला प्रयत्न* मलकापूर :- मलकापूर येथील पुनम भारंबे या महिलेने वैद्यकीय व्यवसायात अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. राहुल चोपडे यांचे विरुद्ध दिनांक 30 मार्च 2024 रोजी मुलाच्या चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व यासंदर्भात डॉक्टर राहुल चोपडे यांचे विरुद्ध मेडिकल अपराध व मेडिकल बेजबाबदारपणा या आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.मात्र 3 महिने उलटूनही मलकापूर पोलीसांनी कुठलीही एफ.आय. आर. नोंदवली नसल्याने आज 21 मे 2024 रोजी सायंकाळी पिढीत मातेने शिवसैनिकांनासह पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदार साहेबांना हार फुले घालून आरती ओवाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार या मातेचे १६ वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे त्याच्या डाव्या पायातील टोंगळ्याच्या वाटीचे फॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस मरण यातना सहन करत होता अवघ्या दोन दिवसात त्याचा पाय संवेदनहिन झाला घाबरून आई-वडिलांनी ब्रहानपूर येथील डॉ. सुभोध बोरले यांच्याकडे उपचार केला असता मातेला कळाले की चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तदनंतर डॉक्टर राहुल चोपडे यांच्याविरुद्ध मेडिकल बेजबाबदारपणा व मेडिकल अपराध या आशयाने दिनांक 30 मार्च 2024 रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली.मात्र गत तीन महिन्यापासून आज पर्यंत मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी सदर तक्रारीनंतर एफ आय आर नोंदणीचे कर्तव्य पार पाडले नसून माझा संविधनिक कायदेशीर अधिकार डावल्याचा आरोप करीत पिढीत दुर्गेशची आई सौ पुनम भारंबे यांनी मवाळ लोकशाही आंदोलनाच्या पद्धतीतून शिवसैनिकांसमवेत जाऊन मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती देण्याचा बेत आखून त्या चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये पोहोचल्या सहाजिकाच ठाणेदार हरबळले, किंतू, परंतु केले, आरती ओवाळण्यास नाकार देत धाकदपतशहा केला. नंतर दोन दिवसात प्रकरण कारवाईस लावतो असे म्हणून पीडित मातेला आश्वासन देऊन प्रकरण शांत केले. त्यावेळी दिपक चांभारे पाटील मलकापूर तालुकाप्रमुख, रोहन सागडे, युवासेना शहर प्रमुख, राजेंद्र काजळे, शिवसेना विभाग प्रमुख, तुषार पानट, युवासेना शहर उपप्रमुख, राणेताई व पत्रकार बांधब उपस्थित होते.*चौकट १* FIR नोंदविण्याचा सांविधनिक अधिकार डावलून पोलीसांनी कर्तव्याचे पालन केले नसुन गत 3 महिन्यापासून पीडित माता मलकापूर पोलिस स्टेशन चे उंबरठे झिजवत होती, तरी सुद्धा पोलीस प्रशासनाला पाझर फुटले नसल्याने मातेला न्याय्य देण्यासाठी आम्हीं शिवसैनिकांनी मातेसह मलकापूर शहर पो. स्टे. चे ठाणेदार श्री. अनिल गोपाळ यांची आरती ओवाळनीसाठी गेलो.या नंतर कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्यापासून कुणीही अडवणूक केल्यास मलकापूर शिवसेना गप्प बसणार नाही- दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख शिवसेना.*चौकट २*पहिल्याच दिवशी मांडीपासुन तळपायापर्यंत पक्के प्लॅस्टर केल्याने पायात रक्त गोठून पाय बधीर होत गेला.वेदना असह्य होत होत्या.एकंदरित डॉ राहूल चोपडे यांच्या वैद्यकीय दुर्लक्षामुळे पोटच्या मुलाच्या पायाला कायमचे अपंगत्व येण्याची वेळ आली. तरी सुद्धा मला न्याय देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. म्हणून मला या निर्णयावर पोहचावे लागले. अजूनही न्याय न मिळाल्यास मी मुलांसह पोलीस स्टेशन आवारात उपोषणाला बसेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील- पूनम भारंबे पीडित मुलाची माता byदिव्यांग शक्ती -May 22, 2024
मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीच्या कामांना महावितरणकडून गतीग्राहकांनी सहकार्य करावे : महावितरण बुलडाणा, दि.२१ मे २०२४ :- मागिल काही दिवसांपासून सुरु असलेल्या उनाच्या तडाक्यासोबतच अधून-मधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतरच लगेचच सुरु होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरणने विविध ठिकाणी मान्सुमपुर्व देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र वीज यंत्रणांच्या देखभाल दुरूस्तीसह वीज वाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे या व अशा इतर कामाचा यात समावेश.कडक उन्हाच्या झळा झेलत महावितरणचे कर्मचारी देखभाल व दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. मागील काही महिन्यांपासून बुलडाण्यासह संपुर्ण विदर्भात अंगाची लाही-लाही करणारे तापमान आहे, त्यातच अधून-मधून वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणा-या बदलाचा प्रतिकुल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. यामुळे ऊन्हाळा व त्यानंतर लगेच सुरु होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात, या फ़ांद्या काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी आपापल्या भागातील यंत्रणेची या दॄष्टीने चाचपणी करून गरजेनुसार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने या फांद्या छाटण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. वीज तारांमध्ये अडकलेले पतंग, मांजा, पताका, तोरण, फ़्लेक्स बॅनर्स, प्लास्टिक झेंडे याचाही फटका यंत्रणेला बसत असतो, यामुळे वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वाहिन्यांत अडकलेले पतंग, मांजा, कपडयांचे तुकडे किंवा तत्सम काहीही तारांवर असेल तर ते वेळीच काढून टाकण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. सैल झालेले गार्डींग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबांमधील झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहीत्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलीका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलणे. वीजवितरण यंत्रणेत अर्थिंगचे महत्व अधिक आहे, याकरिता रोहीत्रांचे अर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही मोठया प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. याशिवाय वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीजेचे खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे, रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकरची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.*वीज ग्राहकांनी सहकार्य करावे* वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे. देखभाल दुरुस्तीची कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी आहे. वीज ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून सहकार्य करावे, byदिव्यांग शक्ती -May 21, 2024
*भारत विकास परिषद खामगांव शाखेचा उत्कृष्ट कार्याबाबत गौरव* (खामगांव) भारत विकास परिषद तर्फे नागपूर येथे विदर्भ प्रांतस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 18 व 19 मे रोजी करण्यात आले होते. हा कार्यक्रम डिडोळकर भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवीन कृपलानी भारत विकास परिषद प्रांत उपाध्यक्ष यांनी भूषविले तर मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखर घुशे तर राष्ट्रीय सेवा प्रकल्प प्रमुख नीलिमा बावने हे व्यासपीठावर विराजमान होते. या कार्यशाळेत भारत विकास परिषदेच्या प्रांत व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची विविध विषयावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. शिवाय सेवा संस्कार प्रकल्पाबाबत विविध सत्रे संपन्न झाली. या प्रसंगी प्रांत कार्य कारणीचा शपथविधी सुद्धा संपन्न झाला. याप्रसंगी विदर्भ प्रांतातील उल्लेखनीय कार्य करणा-या तीन शाखांचा सन्मान करण्यात आला. त्यात भारत विकास परिषद खामगांव शाखेचा सुद्धा समावेश होता. उत्कृष्ट कार्य करणा-या खामगांव शाखेचे अध्यक्ष म्हणून श्यामसुंदर छांगाणी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रांत स्तरीय या कार्यशाळेसाठी मिलिंद दंडवते, माधवराव कांबळे, राजेश पुरोहित, रवि खराटे हे पदाधिकारी उपस्थित होते. असे विनय वरणगांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे. byदिव्यांग शक्ती -May 21, 2024
*युडिआयडी साठी थोड थांबुन तपासणी करा* आपला ञास वाचेल खामगाव .... ा(शेखर तायडे) संपुर्ण देशभराची असलेली युडिआयडी प्रणाली आधारित दिव्यांग तपासणीची आॅनलाईन साईड चे अपडेशनची प्रक्रिया काही दिवसापासुन चालु असल्यामुळे तपासणीला जाण्यापुर्वी किंवा तपासणी झालेनंतर दिव्यांग अर्ज मध्ये ञुटी दिसुन येत आहेत ज्यामध्ये जन्म तारिख,टक्केवारी,नावबदल,ठिकाण अर्ज केल्याची तारिख आदीमध्ये ञुटी दिसुन येत आहे हि सर्व प्रक्रिया सुरळित होण्याकरिता साधारण पंधरा ते बिस दिवस लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहेजर का आपण आपला अर्ज सादर करत तपासणी करिता जाणार आहात तर वरिल दर्शविलेल्या बाबीकडे लक्ष देऊनच पुर्तता करा जर का अर्ज भरुन तपासणी केली त्यात ञुटी निर्माण झाली तर पुढिल प्रक्रिया म्हणजे सरेंन्डर करणे किचकट होऊन जातेत्यामुळे आपले शारिरीक सह आर्थिक नुकसान होणारच हे टाळण्यासाठी थोडा विलंब सहन करत रितसर तपासणी करण्याचे करावे byदिव्यांग शक्ती -May 20, 2024
निकामी साहित्याचा लिलाव,हर्राशी खामगाव :औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निकामी झालेल्या साहित्याचा जाहीर लिलाव l खामगाव: स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय टी आय) प्रशिक्षणा दरम्यान नीकामी झालेले हत्यारे, औजारे, साहित्य यांचा जाहीर केला २२ मे २०२४ रोजी सकाळी सल ११.३० वाजता संस्थेत ठेवण्यात आला आहे ज्यांना या जाहीर लिलावामध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता सदर साहित्याची पाहणी करता येईल.जाहीर लिलावाबाबतच्या सविस्तर अटी व शर्ती संस्थेच्या सूचना फलकावर लावलेल्या आहेत असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. byदिव्यांग शक्ती -May 20, 2024
*शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह शिवसैनिकांनी केला मनोरुग्ण निराधार असाहाय्य अनाथ बेघर बेसारा नागरिकांसोबत आगळावेगळा पद्धतीने वाढदिवस साजरा व एक संकल्प केला इथून पुढे आपले वाढदिवस इथेच साजरे करायचे.* *सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथे जाऊन* *खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री.बाळूभाऊ जाधव व कट्टर शिवसैनिक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर भाऊ मेतकर यांच्या* वाढदिवसानिमित्त रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा डोळ्यासमोर ठेवून बेघर बेसहारा नागरिकांसाठी देवदूत म्हणून सेवा देत असलेले डॉक्टर नंदकुमार पालवे व त्यांच्या पत्नी सौ आरती ताई पालवे बेघर बेसहारा व्यक्तींसाठी सहारा म्हणून 2011 पासून सेवा देत आहे एक व्यक्ती पासून सुरू केलेली सेवा आता 250 ते 300 पर्यंत पोहचलेली आहे.जेव्हा रक्ताची नात्यातील साथ सोडतात तेव्हा पालवे सर त्यांना सहारा देतात कित्येकांना वेगवेगळे आजार असतात हाता पायाला मोठ्या जखमा पडतात बऱ्याच वेळ त्यामध्ये किडे सुद्धा पडतात तरी सुद्धा ते सर्वांचा विलाज करतात व पेशंट व्यवस्थित करून त्यांना आपुलकीची वागणूक देऊन आता ते सर्वांचे अनाथांचे नाथ बनले आहेत.त्यामध्ये आपला सुद्धा खाली चा वाटा असावा म्हणून आज आम्ही शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिक पळसखेड गाठून एक दिवस बेसाहारा सोबत घालविला त्यांना फळ फ्रुट खायला देत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत खाल्ले बराच वेळ त्यांच्यासोबत घालवत आपण कशाप्रकारे इथं पोहोचलात डॉक्टर साहेबांनी आपली कशी सेवा केली आता तुम्हाला कसं वाटतंय व आपण कुठल्या फॅमिलीतून आहात असं जाणून घेतल्यानंतर लक्षात आले की मिडल क्लास व शेतकरी कमी प्रमाणात आढळले सुशिक्षित व नोकरी परिवारातील मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण आढळले विशेष आधी मनोरुग्ण असलेल्या आमच्या भगिनींनी आम्हाला टीका लावून औक्षण केले हे एक विशेष. शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने देवदूत डॉक्टर नंदकुमार पालवे साहेब यांचा सत्कार करत आपल्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो अशाप्रकारे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. व आम्ही तेव्हाच एक संकल्प केला इथून पुढे आपण इतर काही खर्च न करता आपल्या परीने जे काही मदत होईल ते इथेच करायची व आपले वाढदिवस इथेच साजरे करायचे तसेच आमची इतरांना सुद्धा विनंती आहे. एक वेळ तुम्ही तिथे जाऊन पहा काही वेळ त्यांच्यासोबत घालउन पहा खरोखर मनाला समाधान वाटेल.एक दिवस मन रुग्णासोबत घालवत पुढील वाढदिवस करण्याचा संकल्प घेतला त्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख -मा. राजेंद्र बघे.युवा सेना तालुकाप्रमुख -अमोल फेरंग.युवा सेना तालुका प्रमुख -बहादूर वाघे.युवा सेना शहर संघटक -शुभम मोरे.सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख - सोपान वाडेकर.सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख- सुरज ढोले.विभाग प्रमुख - अजय देशमुख.विभाग प्रमुख - लक्ष्मण काकडे. शाखाप्रमुख कृष्णा पुराणे..विभाग प्रमुख पवन मोसे.मा.गजानन बराटे. मा.अक्षय बदरखे आदींनी संकल्प घेतला. byदिव्यांग शक्ती -May 20, 2024
*विद्यार्थ्यांच्या चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी संपन्न झाला माटरगाव येथील सुसंस्कार शिबिराचा समारोप* खामगाव प्रतिनिधी: संस्कार महर्षी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांचे प्रेरणेने पंधरा वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यात दिनांक 3 मे ते 14 मे पर्यंत माटरगाव येथे वय वर्ष 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार निवासी शिबिर आयोजित केल्या जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा महालक्ष्मी कृषी विद्यालय माटरगाव या ठिकाणी दिनांक 3 मे ते 14मे पर्यंत सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. यावर्षी या शिबिरात 77 मुला-मुलींनी प्रवेश घेतला होता. या शिबिरात सहभागी मुलांना आदर्श दिनचर्या, भारतीय संस्कृती, भजन संगीत, बौद्धिक, व्यायाम या मुख्य विषयांतर्गत राष्ट्रधर्म जागृतीच्या दृष्टीने संस्कार केले जातात. देश धर्म व संस्कृती संवर्धनार्थ आयोजित या संस्कार सोहळ्याचा समारोप दिनांक 14 मे रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या चित्ताकर्षक प्रात्यक्षिकांनी रंगला. समारोपीय सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी महालक्ष्मी कृषी विद्यालयाचे अध्यक्ष अनंतराव आळशी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार एडवोकेट आकाश दादा फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, राष्ट्रधर्म युवा मंचचे डॉ. मनोज महाराज चौबे, शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, माजी अर्थ व बांधकाम सभापती सुरेश वनारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देवचे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान भाऊ भोजने,जुगल किशोर गांधी, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे उपस्थित होते. संध्याकाळच्या नयनरम्य वातावरणात सामुदायिक प्रार्थनेने या समारोपीय सोहळ्याला सुरुवात झाली. व त्यानंतर सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी त्यांना शिबिरात शिकवलेले बौद्धिक, भजन,संगीत आणि लेझीम मल्लखांब लाठीकाठी व पावल्या यांच्या आकर्षक प्रदर्शनाने तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षकांना खीळवून ठेवले. तसेच विविध सामाजिक प्रश्नांना हात घालत विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणांनी श्रोत्यांना विचार करायला भाग पाडले. याप्रसंगी आमदार एडवोकेट आकाश दादा फुंडकर यांनी सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी पालकांनी सुद्धा सुसंस्कृतपणे वागलं पाहिजेत असे प्रतिपादन केले व गुरुदेव सेवा मंडळ माटरगावच्या सातत्यपूर्ण चालत असलेल्या सेवा कार्याचे कौतुक केले. तर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी सुद्धा आपल्या मनोगतातुन संस्कृती रक्षणार्थ या सर्वांगीण सुसंस्कार शिबिराची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी विविध विषयांतर्गत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये लाठीकाठी विषयात महेश सायखेडे व वैष्णवी हिरळकार मल्लखांब मध्ये सोमेश लोड व चि. ओम लेझीम मध्ये शाश्वत खोडके व श्रीनिवास कसूरकर यांनी प्राविण्य मिळवले तर शिबिराचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून विठ्ठल वसंतराव जवळकर यांनी यावर्षी बाजी मारली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. byदिव्यांग शक्ती -May 20, 2024