खामगाव- जलंब फेरीच्या वेळेत बदल प्रवाशांनी नोंद घ्यावी खामगाव (मधुकर पाटिल) खामगाव वरून जलंब साठी सुटणाऱ्या तीन डब्याच्या गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.ही गाडी आता पहाटे खामगाव वरून जलंब साठी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे. याआधी ही गाडी पहाटे 4.50 मिनिटांनी सुटायची त्यामुळे जलंब वरून पहाटे 5 वाजता सुटणारी वर्धा-भुसावळ पॅसेंजर गाडी खामगाव येथील प्रवाशांना मिळत नव्हती त्यामुळे खामगाव वरून साठी पहाटे 4.50 मिनिटाला निघणाऱ्या गाडीच्या वेळेत बदल करण्यात यावा अशी मागणी येथील प्रवाशातर्फे करण्यात आली होती.या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन खामगाव वरून जलंब साठी पहाटे 4.50 च्या गाडीच्या वेळेत बदल केला आहे. त्यामुळे आता खामगाव वरून जलंब व तेथून मुंबई हावडा मेल वर्धा- भुसावळ पॅसेंजर व मुंबई हावडा मेल हे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. गाडीच्या वेळेच्या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी व या फेरीचा लाभ घ्यावा असे आव्हान येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक च्या वतीने करण्यात आले आहे. खामगाव वरून जलंब साठी व जलंब वरून खामगाव साठी दररोज प्रत्येकी चार फेऱ्या सोडण्यात येत आहे त्या फेऱ्या अशा खामगाव वरून जलम साठी पहाटे 4.40 वाजता सकाळी 10.30 वाजता दुपारी 3.20 वाजता व रात्री 8:40 वाजता जलंब वरून खामगाव साठी पहाटे 4 वाजता सकाळी 9 वाजता दुपारी 2.50 वाजता व दुपारी 4.50 वाजता
byदिव्यांग शक्ती
-
0