*न्याय न मिळालेल्या आईने व शिवसैनिकांनी चक्क ठानेदाराची आरती ओवाळण्याचा केला प्रयत्न* मलकापूर :- मलकापूर येथील पुनम भारंबे या महिलेने वैद्यकीय व्यवसायात अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डॉ. राहुल चोपडे यांचे विरुद्ध दिनांक 30 मार्च 2024 रोजी मुलाच्या चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व यासंदर्भात डॉक्टर राहुल चोपडे यांचे विरुद्ध मेडिकल अपराध व मेडिकल बेजबाबदारपणा या आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.मात्र 3 महिने उलटूनही मलकापूर पोलीसांनी कुठलीही एफ.आय. आर. नोंदवली नसल्याने आज 21 मे 2024 रोजी सायंकाळी पिढीत मातेने शिवसैनिकांनासह पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदार साहेबांना हार फुले घालून आरती ओवाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार या मातेचे १६ वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे त्याच्या डाव्या पायातील टोंगळ्याच्या वाटीचे फॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळपायापर्यंत पक्के प्लास्टर केले यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस मरण यातना सहन करत होता अवघ्या दोन दिवसात त्याचा पाय संवेदनहिन झाला घाबरून आई-वडिलांनी ब्रहानपूर येथील डॉ. सुभोध बोरले यांच्याकडे उपचार केला असता मातेला कळाले की चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तदनंतर डॉक्टर राहुल चोपडे यांच्याविरुद्ध मेडिकल बेजबाबदारपणा व मेडिकल अपराध या आशयाने दिनांक 30 मार्च 2024 रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली.मात्र गत तीन महिन्यापासून आज पर्यंत मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी सदर तक्रारीनंतर एफ आय आर नोंदणीचे कर्तव्य पार पाडले नसून माझा संविधनिक कायदेशीर अधिकार डावल्याचा आरोप करीत पिढीत दुर्गेशची आई सौ पुनम भारंबे यांनी मवाळ लोकशाही आंदोलनाच्या पद्धतीतून शिवसैनिकांसमवेत जाऊन मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती देण्याचा बेत आखून त्या चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये पोहोचल्या सहाजिकाच ठाणेदार हरबळले, किंतू, परंतु केले, आरती ओवाळण्यास नाकार देत धाकदपतशहा केला. नंतर दोन दिवसात प्रकरण कारवाईस लावतो असे म्हणून पीडित मातेला आश्वासन देऊन प्रकरण शांत केले. त्यावेळी दिपक चांभारे पाटील मलकापूर तालुकाप्रमुख, रोहन सागडे, युवासेना शहर प्रमुख, राजेंद्र काजळे, शिवसेना विभाग प्रमुख, तुषार पानट, युवासेना शहर उपप्रमुख, राणेताई व पत्रकार बांधब उपस्थित होते.*चौकट १* FIR नोंदविण्याचा सांविधनिक अधिकार डावलून पोलीसांनी कर्तव्याचे पालन केले नसुन गत 3 महिन्यापासून पीडित माता मलकापूर पोलिस स्टेशन चे उंबरठे झिजवत होती, तरी सुद्धा पोलीस प्रशासनाला पाझर फुटले नसल्याने मातेला न्याय्य देण्यासाठी आम्हीं शिवसैनिकांनी मातेसह मलकापूर शहर पो. स्टे. चे ठाणेदार श्री. अनिल गोपाळ यांची आरती ओवाळनीसाठी गेलो.या नंतर कुठल्याही व्यक्तीला न्याय देण्यापासून कुणीही अडवणूक केल्यास मलकापूर शिवसेना गप्प बसणार नाही- दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख शिवसेना.*चौकट २*पहिल्याच दिवशी मांडीपासुन तळपायापर्यंत पक्के प्लॅस्टर केल्याने पायात रक्त गोठून पाय बधीर होत गेला.वेदना असह्य होत होत्या.एकंदरित डॉ राहूल चोपडे यांच्या वैद्यकीय दुर्लक्षामुळे पोटच्या मुलाच्या पायाला कायमचे अपंगत्व येण्याची वेळ आली. तरी सुद्धा मला न्याय देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. म्हणून मला या निर्णयावर पोहचावे लागले. अजूनही न्याय न मिळाल्यास मी मुलांसह पोलीस स्टेशन आवारात उपोषणाला बसेल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील- पूनम भारंबे पीडित मुलाची माता
byदिव्यांग शक्ती
-
0