*लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांना केले हजारो चाहत्यांनी अभिवादन* *खामगाव* --सर्वसामान्यांचे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांना आज त्यांच्या स्मृतिदिनी हजारो चाहत्यांनी विनम्र अभिवादन केले. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी पणन महासंघाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, लोकसभेचे सर्वोत्कृष्ट संसदपटू, राज्याचे माजी कृषिमंत्री सर्वसामान्याचे लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांचा आज स्मृतिदिन. या निमित्ताने शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शक्तिस्थळ असलेल्या स्मृतीस्थळी आज त्यांच्या हजारो चाहत्यांनी हजेरी लावली व त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोभावे अभिवादन केले. याप्रसंगी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे ज्येष्ठ पुत्र भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागरदादा फुंडकर ,खामगाव विधानसभाचे लाडके आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचेसह त्यांचे संपूर्ण परिवार स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झाले. पहाटेपासूनच या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी करीत त त्यांच्या समाधी स्थळी पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. कार्यकर्त्यांसह बुलढाणा ,अकोला व इतर जिल्ह्यातील आमदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उपस्थित राहून त्यांचे समाधीचे दर्शन घेत त्यांना मनोभावे अभिवादन केले.
byदिव्यांग शक्ती
-
0