*विदर्भात सर्वांनी झाडे लावण्याकडे भर द्या-पवन चव्हाण*खामगाव:-विदर्भात वाढत्या उष्णतेकडे पाहता. सर्वांनी आपल्या घरी, अंगणात, शेतात आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात झाडे लावणे काळाची गरज बनली आहे.सध्या विदर्भात उष्णतेचा पारा हा दरवर्षीच्या तुलनेत 48°C च्या पार चढला आहे. अगोदर तापमान थोडे कमी असायचे मात्र दिवसेंदिवस काळ बदलत चालला आहे तापमानाचे प्रमाण उच्चांक गाठत आहे.अकोला, खामगाव, ह्या शहरामध्ये रस्त्यावर निघणे सुद्धा कठीण झाले आहे.वाढत्या इमारती आणि औद्योगिकरण यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. मात्र वृक्षरोपांनाकडे कोणाचेही लक्ष नाही. या कडे नागरिकांचा आणि तरुणांचा कल असणे आवश्यक आहे.लोणावळा आणि उच्च वृक्ष असलेल्या प्रदेशात संतुलित पाऊस आणि नियंत्रित उष्णतेचा पारा आहे. कारण इथे वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.आणि यामुळेच इथे दळणवळण आणि पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या नकाशावर प्रसिद्ध झाले आहे.आपल्या विदर्भात सुद्धा येणारी उष्णतेची लाट भयानक होऊ शकते त्यामुळे आत्ताच सर्वांनी वृक्षरोपणाकडे भर द्यायला हवे.व सर्वांनी ह्या उन्हाच्या लाटेत डोक्याला रुमाल व सोबत पाण्याची बॉटल घेऊन घराबाहेर पडावे व वयोवृद्ध नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पवन चव्हाण यांनी विचार मांडताना केले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0