वाळूसाठे शोधण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करणार-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*नांदुरा तालुक्यात 1775 ब्रास वाळू जप्त*सिंदखेडराजा, खामगावात टिप्परवर कारवाईबुलडाणा, दि‍. 29 : ( का.प्र.)अवैध वाळूबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आठवडाभरापासून कार्यवाही करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करण्यात येत आहे. या वाळूसाठ्याचा शोध ड्रोन सर्व्हेक्षणाने घेण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणात आढळणारा वाळूसाठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वाळूसाठा निदर्शनास येऊनही कारवाई केली नसल्यास संबंधित तलाठ्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.मलकापूर, नांदुरा, मेहकर आणि संग्रामपूर तालुक्यात वाळूसाठे आणि वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे 1775 ब्रास वाळू साठे जप्त केले. मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात अपर तहसिलदार आणि कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात बेलाड गट नं. 224 येथे 354 ब्रास, बेलाड गट नं. 5 येथे 324 ब्रास, बेलाड गट नं. 19 येथे 103 ब्रास, येरळी गट नं. 236 येथे 85 ब्रास, बेलाड गट नं. 103 येथे 110 ब्रास, पलसोडा गट नं. 352 येथे 314 ब्रास, पतोंडा गट नं. 1 येथे 362 ब्रास, नांदुरा खुर्द येथे 123 ब्रास असा एकूण 1775 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला.मलकापूर येथे काल दिवसभरात एकूण 400 ब्रास रेती साठा जप्त करून लिलावाची कार्यवाही करण्यात आली. उकळी, ता. मेहकर येथे 50 ब्रास रेती जप्त करण्यात आली. पूर्णा नदीकाठील सावळी, ता. संग्रामपूर गावानजीक वनविभागाच्या जमिनीवर चार विविध ठिकाणी सुमारे 480 ब्रास वाळू साठा आढळून आला. मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या सहाय्याने सदर वाळूसाठा जप्त करण्यात आला.सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे 4 ब्रास अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. मंडळ अधिकारी एस. एस. म्हस्के, तलाठी जी. एस. टेकाळे, एस. जी. पांडव, आर. एस. देशमुख, व्ही. यू. कटारे, एस. आर. नागरे, आर. आर. लांडगे यांनी दि. 28 मे 2024 रोजी रात्री कारवाई केली. उमरद येथे समाधान नारायण मोरे, रा. ताडशिवणी यांच्या मालकीचे चार ब्रास रेती भरलेले टिप्पर क्रमांक एमएच 28 बीबी 7426 हा अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिस ठाण्यात अटकाव करण्यात आला आहे. खामगाव येथे जप्त करण्यात आलेल्या वाहनाला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने कारवाई करून 64 हजार रुपये माल जप्त करण्यात आला आहे

Post a Comment

Previous Post Next Post