*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाची उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक...हिंगणघाट मारोती महाकाळकर शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर उड्डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध पडला जिवघेणा खड्डा.....**राष्ट्रीय महामार्ग 44 वरील उडानपूल बनतोय धोकादायक...* *राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्‌डाणपुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्‌डा पडलेला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेला हा खड्‌डा अपघातास निमंत्रण देतो आहे. हा रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदरावर तातडीने कारवाई करण्यात यावी व पडलेल्या खड्‌याची त्वरित दुरुस्ती करून रस्त्या बांधण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी..शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्‌डाणपुलाचे बांधकामाला फक्त दोन वर्षे झाले असून, पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून काश्मीर ते कन्याकुमारी ला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक रात्रन दिवस सतत सुरु असतात. या खड्‌यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गाने येता व जाता वाहनधारकांना हा खड्‌डा चुकवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना खड्‌डा दिसत नसल्याने अनेकदा या महामार्गावर दुचाकींचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावत असतात. यासोबतच महामार्गाने असंख्य जड वाहने क्षणाक्षणाला धावत असतांत. सध्या परिस्थितीत झालेल्या या भगदाडावर ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या कंत्राटदार सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवर बोलून स्तविस्तर चर्चा केली.तसेच राष्ट्रीय प्राधिकरनाच्या कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा ईशारा देखील प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, तालुकाध्यक्ष महेश झोटिंग पाटील, वासुदेवराव गौळकार, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव वांदीले, माजी संचालक सुरेशराव सातोकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, जिल्हा प्रचार प्रमुख संतोषराव तिमांडे, समुद्रपुर तालुका बूथअध्यक्ष गणेश वैरागडे, तालुका उपाध्यक्ष संजय लोणकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोद, अमोल बोरकर, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, सिद्धार्थ मस्के, ओबीसी जिल्हा सरचिटणीस अजय पर्बत, उपसरपंच प्रवीण कलोडे, सुनील भूते, वाहतूक सेल विधानसभा अध्यक्ष हेमंत घोडे, जगदीश वांदिले, कुणाल येसंभरे, प्रशांत ऐकोनकर, उमेश नेवारे, अनिल भूते, विपुल थुल, अनिल आडकीने, समीर चापले, आशिष शेंडे, बचू कलोडे, संतोष चौधरी, पंकज भट, रत्नाकर पाटील, अमोल मुडे, बंडूजी लिहितकर, सुशील घोडे, शेखर ठाकरे, राहुल जाधव, मो. शाहीद, राजू मुडे, दिपक चांगलं,रंजित थुल, आकाश हुरले, आदित्य बुट्टे, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.........प्रतिक्रिया...... *हिंगणघाट शहरातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग 44 वरील नांदगाव चौक येथील उडानपूल मागील तीन वर्षांपूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला होता. वाहतुकीसाठी सुरु झालेला हा उड्‌डाणपूल सुरु होताच विविध रोड च्या कामामुळे रस्त्या बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली होती. यादरम्यान अनेकदा या उडानपुलाची डाग डुजी करण्यात आली. मात्र आता तर या उडान पुलाच्या मधोमध आर पार दिसणारा मोठा भगदाड पडला आहे.त्यामुळे या उडानपुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल...**अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस**राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी* यांनी कळविले

Post a Comment

Previous Post Next Post