*शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्यासह शिवसैनिकांनी केला मनोरुग्ण निराधार असाहाय्य अनाथ बेघर बेसारा नागरिकांसोबत आगळावेगळा पद्धतीने वाढदिवस साजरा व एक संकल्प केला इथून पुढे आपले वाढदिवस इथेच साजरे करायचे.* *सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथे जाऊन* *खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री.बाळूभाऊ जाधव व कट्टर शिवसैनिक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर भाऊ मेतकर यांच्या* वाढदिवसानिमित्त रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा डोळ्यासमोर ठेवून बेघर बेसहारा नागरिकांसाठी देवदूत म्हणून सेवा देत असलेले डॉक्टर नंदकुमार पालवे व त्यांच्या पत्नी सौ आरती ताई पालवे बेघर बेसहारा व्यक्तींसाठी सहारा म्हणून 2011 पासून सेवा देत आहे एक व्यक्ती पासून सुरू केलेली सेवा आता 250 ते 300 पर्यंत पोहचलेली आहे.जेव्हा रक्ताची नात्यातील साथ सोडतात तेव्हा पालवे सर त्यांना सहारा देतात कित्येकांना वेगवेगळे आजार असतात हाता पायाला मोठ्या जखमा पडतात बऱ्याच वेळ त्यामध्ये किडे सुद्धा पडतात तरी सुद्धा ते सर्वांचा विलाज करतात व पेशंट व्यवस्थित करून त्यांना आपुलकीची वागणूक देऊन आता ते सर्वांचे अनाथांचे नाथ बनले आहेत.त्यामध्ये आपला सुद्धा खाली चा वाटा असावा म्हणून आज आम्ही शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिक पळसखेड गाठून एक दिवस बेसाहारा सोबत घालविला त्यांना फळ फ्रुट खायला देत आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत खाल्ले बराच वेळ त्यांच्यासोबत घालवत आपण कशाप्रकारे इथं पोहोचलात डॉक्टर साहेबांनी आपली कशी सेवा केली आता तुम्हाला कसं वाटतंय व आपण कुठल्या फॅमिलीतून आहात असं जाणून घेतल्यानंतर लक्षात आले की मिडल क्लास व शेतकरी कमी प्रमाणात आढळले सुशिक्षित व नोकरी परिवारातील मोठ्या प्रमाणात मनोरुग्ण आढळले विशेष आधी मनोरुग्ण असलेल्या आमच्या भगिनींनी आम्हाला टीका लावून औक्षण केले हे एक विशेष. शिवसेना खामगाव विधानसभेच्या वतीने देवदूत डॉक्टर नंदकुमार पालवे साहेब यांचा सत्कार करत आपल्या हातून अशीच रुग्णसेवा घडत राहो अशाप्रकारे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. व आम्ही तेव्हाच एक संकल्प केला इथून पुढे आपण इतर काही खर्च न करता आपल्या परीने जे काही मदत होईल ते इथेच करायची व आपले वाढदिवस इथेच साजरे करायचे तसेच आमची इतरांना सुद्धा विनंती आहे. एक वेळ तुम्ही तिथे जाऊन पहा काही वेळ त्यांच्यासोबत घालउन पहा खरोखर मनाला समाधान वाटेल.एक दिवस मन रुग्णासोबत घालवत पुढील वाढदिवस करण्याचा संकल्प घेतला त्यामध्ये शिवसेना तालुकाप्रमुख -मा. राजेंद्र बघे.युवा सेना तालुकाप्रमुख -अमोल फेरंग.युवा सेना तालुका प्रमुख -बहादूर वाघे.युवा सेना शहर संघटक -शुभम मोरे.सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख - सोपान वाडेकर.सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख- सुरज ढोले.विभाग प्रमुख - अजय देशमुख.विभाग प्रमुख - लक्ष्मण काकडे. शाखाप्रमुख कृष्णा पुराणे..विभाग प्रमुख पवन मोसे.मा.गजानन बराटे. मा.अक्षय बदरखे आदींनी संकल्प घेतला.
byदिव्यांग शक्ती
-
0