निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांनो सावधान खामगाव (मधुकर पाटील) निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांमध्ये जनाजागृती करणेबाबत राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून संपर्क साधला जात आहे. ती व्यक्ती निवृत्तीवेतनधारकांना आपणांस सुधारित निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असून त्याअगोदर तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणूकीस बळी पडले आहेत.अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये धडु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण आपल्या कोषागारामार्फत प्रेसनोटद्वारे निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना जागृत करावे. अनुषंगाने तसेच निवृत्तीवेतनधारक असोसिएशन यांना सूचित करावे.निवृत्तीवेतनधारक /कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी यासाठी सावधानता बाळगावी असेसंगीता ग. जोशीउपसंचालक (निवृत्तीवेतन),यांनी कळविले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0