*भारत विकास परिषद खामगांव शाखेचा उत्कृष्ट कार्याबाबत गौरव* (खामगांव) भारत विकास परिषद तर्फे नागपूर येथे विदर्भ प्रांतस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 18 व 19 मे रोजी करण्यात आले होते. हा कार्यक्रम डिडोळकर भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवीन कृपलानी भारत विकास परिषद प्रांत उपाध्यक्ष यांनी भूषविले तर मार्गदर्शक म्हणून चंद्रशेखर घुशे तर राष्ट्रीय सेवा प्रकल्प प्रमुख नीलिमा बावने हे व्यासपीठावर विराजमान होते. या कार्यशाळेत भारत विकास परिषदेच्या प्रांत व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची विविध विषयावर मार्गदर्शनपर भाषणे झाली. शिवाय सेवा संस्कार प्रकल्पाबाबत विविध सत्रे संपन्न झाली. या प्रसंगी प्रांत कार्य कारणीचा शपथविधी सुद्धा संपन्न झाला. याप्रसंगी विदर्भ प्रांतातील उल्लेखनीय कार्य करणा-या तीन शाखांचा सन्मान करण्यात आला. त्यात भारत विकास परिषद खामगांव शाखेचा सुद्धा समावेश होता. उत्कृष्ट कार्य करणा-या खामगांव शाखेचे अध्यक्ष म्हणून श्यामसुंदर छांगाणी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रांत स्तरीय या कार्यशाळेसाठी मिलिंद दंडवते, माधवराव कांबळे, राजेश पुरोहित, रवि खराटे हे पदाधिकारी उपस्थित होते. असे विनय वरणगांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0