नितीन चौधरी ठरला बुलडाण्याचा आर्यनमॅन देश-विदेशांतून पाचशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग बुलडाणा : (मधुकर पाटील) कोल्हापूर स्पोर्टस क्लब आणि रग्गेडियनच्या वतीने ट्रायथलॉन, ड्युएथलॉन स्पर्धा नुकताच राजाराम तलाव येथे झाली. या स्पर्धेत दोन वेळा दक्षिण अफ्रिकेत ९० किमी मॅरेथॉन यशस्वी करणारे बुलडाण्याचे वेगवान धावपटू साहसवीर नितीन चौधरी यांनी लोहपुरुष ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांनी २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारांत त्यांनी हे यश मिळवले. त्यांनी दोन किमी तास पोहणे (१:२२:५१), ९० किमी सायकलींग (३:५३:३४), रनिंग (२:४८:२२) असे त्यांनी हाफ आयर्नमॅन स्पर्धा ८ तास २४ मिनीटात पूर्ण केली. या स्पर्धेत देश-विदेशातूून पाचशेवर स्पर्धक सहभागी झाले. यात नितीन चौधरी याचे सर्वसाधारण गटात ६१ तर वयोगटात १६ क्रमांकावर राहिले. ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग, सायकलिंग, रनिंग अंतर पार करण्यास कस लागतो. नितीन चौधरी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. byदिव्यांग शक्ती -October 23, 2024
खामगाव विधानसभेसाठी पहा काय चालंलय !खामगाव (मधुकर पाटील ) विधानसभेचे बिगुल संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाजलं सत्ताधारी आपल्या विकासातून तर विरोधी सरकारच्या अकार्यक्षमतेवरून या निवडणुकीकरिता सामोरे जात आहे यात सोशल मीडिया च्या माध्यमातुन कार्यकर्ते धन्यता मानणारे त्यात तर काही घर की रोटी ********** प्रमाणे व्हॉट्सअँप ग्रुप ला भिडले आहे सोशल मीडियातून आपल्या नेत्याला वरचढ दाखविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्लिप व्हील वर आपल्या पसंतीच्या उमेदवारांची नावे देऊन त्यांचं टक्केवारी स्वरूपात पसंती दर्शविण्यात येते या पसंती क्रमानुसार आपला आमदार कोण होईल याचं गणित या स्लिप व्हीलच्या माध्यमातून सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपला दाखविण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे पहावयास मिळत आहे तर आज आपला नेते इथे आपला नेता तिथे यावरही हा ***** फुल जबाबदारी असलेला कार्यकर्ता यात धन्यता मानत असल्याचं दिसून येत आहेयामध्ये विरोधी व सत्ताधारी कार्यकर्त्यामध्ये प्रसार प्रचार यंत्रणा चालवीत आहे खामगाव विधान सभेला 2014 व 2019 च्या निवडणुकीत सत्ताधारी ने विजय प्राप्त केला गेला तर आता ते 2014 2019 तर 2024 ला विजयाची हॅट्रिक साध्य करण्याकरिता विधानसभेच्या मैदानात तयारीला लागले आहे तर यांच्यासाठीसोशल मीडिया हाताळत आपल्या दोन्ही म्हणजे सत्ताधारी व विरोधी आपल्या नेत्याला वरचढ दाखविण्याकरता कार्यकर्ते कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे पक्षीय बलाबल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना असाच अटळ राहणार त्याला कारणही तितकेच राष्ट्रवादी (दोन्ही गट) असो कि (सेना) दोन्ही गट नाममात्र बळ ठेऊन आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीसा परिणाम राहणार हे नक्कीत्यामुळे भाजपा विरुद्ध काँग्रेस असेच चित्र निश्चित असल्याचं दिसत आहे आमदार, माजी आमदार व इच्छुक यांच्या कार्य कुशलतेचा प्रसार प्रचार कसोसिने करण्याचा प्रयत्न मतदार संघातील कार्यकर्ते करीत असल्याचं दिसत आहे तर कार्यकर्त्यांकडून विविध विकास कामांची गणिते लाडक्या बहिणीसह मांडल्या जात आहेत तर विरोधीकडून रोजगार महागाईसह शहरातील रखडलेली कामे रस्त्यावर पडलेले खड्डे ग्रामीण भागातील हाल बेहाल चा पाढा पुढे करण्यात येत आहे यावर सोशल मीडिया चा पुरेपूर वापर करीत हे पगारी की विन पगारी असलेले कार्यकर्ते आपल्या आपल्या नेत्याचा पक्षाचा उदो उदो करण्यात धन्यता मानत असल्याचे पहावयास मिळत आहे तर यातून कुठल्याच पक्षाचा थारा नसलेले सुज्ञ मतदार वास्तव असलेल्या परिस्थितीची जाण ओळखत असल्याचे पहावयास परंतु सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यात टाळत असल्याचही दिसून येत आहे शेवटी एवढेच निवडणूक काही दिवसां साठीच असते यातून एकमेकांचे नुकसान होणार नाही किंवा वाद होणार नाही यावर कटाक्ष ठेवणे क्रम प्राप्त आहेयासाठी एकच कोणीही निवडून येणार तो आपलाच आमदार होणारच. byदिव्यांग शक्ती -October 18, 2024
विकासाचा पाऊस पडला कुठे. मलकापूर ;माजी आमदार चैनसुख संचेती याचा मतदार कडून झालेला पराभव आणि आमदार एकडे यांचा विजय मलकापूर शहरासह विधान सभेतील नागरिकांसाठी विकासाच्या मुद्द्यावर एक आशावाद ठरेल असे वाटत होते परंतु सन 2019 ते 2024 कालखंड उलटला अनेकदा भूमिपूजन आणि विकासाच्या बातम्यांचा सडा दिसून आला मात्र प्रत्यक्षात विकासाचा पाऊस मतदार संघाच्या कोणत्या परिसरात पडला हा मतदारांसाठी शोध व विवंच्येचा विषय ठरला आठवडी बाजार संकुल पोलीस चौकी बस स्टॉप सभागृहे यासारख्या अनेक विविध विकासाच्या कामाचे भूमिपूजन माननीय आमदार एकडे यांच्या हस्ते होताना दिसून आले मतदारसंघात एक नवं चैतन्य व विकासाचा आशावाद दिसून आला परंतु तब्बल पाच वर्षे उलटूनही विकास न दिसल्याने आजही आशावादाची निराशावादात परिवर्तन झालेले आहे.तरीही प्रसार माध्यमांमधून वारंवार विकास झाल्याचे जाहिराती ठासून ठासून मतदारांसमोर ला जात आहे परंतु ही मलकापूर विधानसभा मतदारसंघातील जनता अडाणी आहे असंच कदाचित विद्यमान आमदार यांना वाटत असावी कारण मतदारसंघात लोकांच्या मूलभूत सेवा सुविधा याचा पूर्णतः अभाव दिसून येत आहेत मतदार संघात जागोजागी नादुरुस्त रस्ते विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न शौचालयाचा प्रश्न कायदा सुव्यवस्थे चां प्रश्न सारख्या अनेक बाबी गेल्या पाच वर्षात पूर्णपणे अस्था वेस्था झाल्याचे चित्र असताना माननीय आमदार एकडे मतदारांसमोर मांडून त्यांना बुरड घालण्याचा प्रयत्न करीत आहे. byदिव्यांग शक्ती -October 08, 2024
राहुरी ( मधुकर घाटगे )नवरात्रोत्सव निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने नऊ ऑक्टोबर पासून श्री वैष्णवी देवी गुफा व दर्शन तसेच चैतन्य दे वींचा देखाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुरी येथील ब्रह्मकुमारीज संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे .राहुरी शहरातील नगरपालिकेचे पाठीमागे असणाऱ्या राजयोग भवन येथे बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता या देखाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती ब्रह्मकुमारी नंदादीदी यांनी दिली .दिनांक 9 , 10 , 11 ऑक्टोबर पर्यंत या देखाव्याच्या दर्शनाची वेळ सायंकाळी सात ते दहा अशी राहणार असून सायंकाळी साडेसात वाजता आरतीची वेळ असेल , अशी माहिती ही देण्यात आली .स्वप्नपूर्ती कल्पवृक्ष या देखाव्याचे मुख्य आकर्षण असणार आहे . मागील वर्षी ही राजयोग भवन च्या वतीने धार्मिक महोत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे . नवरात्रोत्सव महोत्सवानिमित्त आयोजित देखाव्याचा लाभ शहरवासीयांनी विशेष करून महिला भगिनींनी घ्यावा , असे आवाहन राजयोग भवन , ब्रह्मकुमारीज यांच्या वतीने करण्यात आले आहे . byदिव्यांग शक्ती -October 06, 2024
वर्धापन दिन व स्थलांतर सोहळ्याचेश्री समृध्दी महिला नागरी सह. पत संस्था मर्या. निमंञणशेगाव (प्रतिनीधी)शेगाव परिसरात अपल्या प्रगतीची यशस्वी वाटचालमधुन श्री. समृध्दी महिला नागरी सह. पत संस्था मर्या. शेगांव या संस्थेला दिनांक ०७/१०/२०२४ सोमवार रोजी १२ वर्ष पुर्ण होत आहे. या बारा वर्षात संस्थेच्या सर्व सन्माननिय सभासद, ठेवीदार, कर्जदार व शुभचिंतक यांच्या सहकार्याने संस्था प्रगती पथाकडे यशस्वी वाटचाल करीत असुन मागील आर्थिक वर्षामध्ये संस्था नफ्यामध्ये तसेच विश्वासाला पाञ ठरली आहे. सर्वांनी संस्थेवर जो विश्वास दाखविला तो यापुढे ही कायम राहील यात शंका नाही. तरी या संस्थेच्या १२ वा वर्धापनदिन व स्थलांतर सोहळ्यास ऊपस्थित राहण्याचे आव्हाहन केले आहेया वर्धापन दिन व स्थलांतर सोहळ्याच्याकार्यक्रमाचे उद्घाटक मा.लोकनेते विजयराजजी शिंदे मा. आमदार तथा भाजपा नेते महाराष्ट्र राज्यकार्यक्रमाचे अध्यक्षमा. देवाभाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन अध्यक्षप्रमुख मार्गदर्शन सौ.अनुजाताई सावळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेस महिला अधाडी तथा अध्यक्ष राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन को.आ.क्रे.सोसा. बुलढाणाप्रमुख अतिथी म्हणुनमा.श्री. नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था. बुलडाणानितीन पाटिल ठाणेदार शेगाव पो.स्टे.रणधिर गावंडे एक्साईज आॅफिसर खामगाव, गणेशभाऊ पाटिल अरविंद गॅस शेगाव,अरुण श्रीराम शेगोकार ऊद्योगपती मुंबई,शैलेंद्रदादा पाटील मा.नगराध्यक्ष,शारदा गोपाल कलोरे मा.नगराध्यक्ष, ए.बी.सांगळे सहाय्यक निबंधक शेगाव,संतोष बाप्पु देशमुख समाजसेवक,राजेंद्र घोंगे सहाय्यक निंबधक सह. संस्था बुलढाणा,संदिपदादा शेळके शिवसेना नेते तथा राजश्री शाहु परिवार, अॅड विजयकुमार कस्तुरे बहुजन साहित्य संघ चिखली,राष्ट्रीय ऊपाध्यक्ष केंद्रीय मानवधिकार संघटन नवि दिल्लीअनंता शिंदे भाजपा शहराध्यक्ष बुलढाणा,गोदावरीताई जगदाळे नांदुरा वैशाली तायडे खामगावभारत साळवे सामाजीक कार्यकर्ता,बाबासाहेब महामुने छञपती संभाजीनगर राष्ट्रीय मानवधिकार संघटन डाॅ डि व्ही खरात नागसेन बुद्धविहार चिखलीमंगलाताई गर्दे सामाजिक कार्यकर्त्या नांदुराकिरणभाऊ मोरे मुख्य संपादक दै.प्रखर प्रहार,राजवर्धन शेगोकार न्युज ईंडिया जिल्हाप्रतिनीधी बुलढाणा,मनोज नगरनाईक संपादक दिव्यांग शक्ती संस्थापक अध्यक्ष विराट मल्टीपर्पज फाऊन्डेशन (दिव्यांग संस्था)खामगाव, मनोज भोजने जिल्हाध्यक्ष दलित मुक्तीसेना खामगाव, धम्मपाल नितनवरे शहराध्यक्ष वंचित आधाडी,ऊस्मान कुरेशी संपादक दै.लोकमंथन लोणार,शे.बुढन कुरेशी संपादक खामगाव आझादहे राहणार आहेतकार्यक्रमाचे स्थळ : मटकरी गल्ली, माहेश्वरी भवन जवळ, शेगांव जि. बुलडाणा वार सोमवार दि. ०७/१०/२०२४ वेळ : दुपारी १.०० वा. सदर कार्यक्रमाला ऊपस्थित राहण्याची विनंतीप्रा.भास्कर ईंगळे अध्यक्ष रिपब्लिक न्युज पेपर असो.बुलढाणा जिल्हा संपादक सा.भागिदार तथा प्रतिनीधी विश्वसम्राट एस आर धनोकार व्यवस्थापकसंजय पाटिल माऊली बहु.ग्रामीण शिक्षण संस्था तोरणवाडायांच्यासहअध्यक्षा ऊपाध्यक्षा संचालिका व व्यवस्थापक कर्मचारी संग्राहक व्रुंद श्री सम्रुद्धी महिला नागरी पत संस्था मर्या.शेगाव यांच्यावतिने करण्यात आली आहे byदिव्यांग शक्ती -October 05, 2024
शिवसेना ऊपनेते शरददादा कोळी खामगाव येथेखामगाव (शेखर तायडे) ऊध्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी पक्ष संघटना बळकटीसाठी शिवसेनेची बुलंद तोफ शिवसेना उपनेते मा श्री शरद दादा कोळी रविवार दि 6.10.2024 रोजी 11,30 वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय खामगांव तालुका व शहर गांधी चौक खामगाव येथे येत आहेत तरी सर्व शिवसैनिक शिवसेना शाखाप्रमुख उप तालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपशहर प्रमुख शिवसेना सर्व अंगीकृत संघटना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी महिला आधाडी यांनी वेळेवर हजर राहावे असे श्रीराम खेलदार तालुका प्रमुख शिवसेना , संदीप वर्मा शहर प्रमुख खामगांव व समस्त शिवसैनिकांनी केले आहे byदिव्यांग शक्ती -October 05, 2024
MH - 56 खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन खामगाव(शेखर तायडे)महाराष्ट्र शासन गृह (परिवहन) विभाग शासन निर्णय क्रमांक एमव्हीडी ०७२४/प्र.क्र.१६५/परि-४ मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२४ च्या आदेशान्वेय गृह विभाग शासन निर्णय क्र. एमव्हीडी ०८१५/प्र.क्र. २३३/परि-४ दि. १८ जून, २०१८. २. परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. पआका/रवका/का.- १०/ / नवीन कार्यालय निर्मिती/खामगाव/२०२४/जा.क्र.६८३३, दि. १०.०६.२०२४ व जा.क्र.१०८६४, दि.२७.०९.२०२४.यानुसारखामगाव, जि. बुलढाणा येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव, जि. बुलढाणा या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील, तुर्तास सदर कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी. सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी. सदर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. तर यावर खामगावकरांची प्रतिक्रीया घेतली असता ५६ तर भेटलेच असतेच जर खामगाव जिल्हा झाला असता तरअसोबुलढाणाचे हेलपाडे वाहनाचा कामामुळे वाचणार याचे समाधान आहे byदिव्यांग शक्ती -October 03, 2024
MH - 56 खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन खामगाव(शेखर तायडे)महाराष्ट्र शासन गृह (परिवहन) विभाग शासन निर्णय क्रमांक एमव्हीडी ०७२४/प्र.क्र.१६५/परि-४ मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२४ च्या आदेशान्वेय गृह विभाग शासन निर्णय क्र. एमव्हीडी ०८१५/प्र.क्र. २३३/परि-४ दि. १८ जून, २०१८. २. परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. पआका/रवका/का.- १०/ / नवीन कार्यालय निर्मिती/खामगाव/२०२४/जा.क्र.६८३३, दि. १०.०६.२०२४ व जा.क्र.१०८६४, दि.२७.०९.२०२४.यानुसारखामगाव, जि. बुलढाणा येथील वाहन नोंदणी संख्या, एकूण लोकसंख्या यांचा विचार करता स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव, जि. बुलढाणा या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील, तुर्तास सदर कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी. सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी. सदर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. तर यावर खामगावकरांची प्रतिक्रीया घेतली असता ५६ तर भेटलेच असतेच जर खामगाव जिल्हा झाला असता तरअसोबुलढाणाचे हेलपाडे वाहनाचा कामामुळे वाचणार याचे समाधान आहे byदिव्यांग शक्ती -October 03, 2024
सणवार सुसाट तर साखर नाही ताटात *सहा महापासुन अंतोदय लाभार्थींना साखरचे वाटत रखडले*बुलढाणा (शेखर तायडे)अन्न पुरवठाविभागा अंतर्गत प्रथम लाभार्थी कुटुंब असलेल्या कार्ड धारकांना प्रति कार्ड एक किलो साखर वाटप पस्तिस कीलो धान्यासोबत देण्यात येतेपरंतु मागिल एप्रील महिन्यापासुन ते आजतागत म्हणजे सहा महिन्यापर्यन्त साखरेचे वाटपच न झाल्याने पुरवठा विभागात सावळा गोंधळ पहावयास मिळत आहेयाविषयी अन्न पुरवठा विभागाविषयी रोष निर्माण होत आहेतर या विषयी तहसिल अंतर्गत असलेल्या पुरवठा विभागातुन माहिती घेतली असता एप्रिल महिन्याची साखर वितरणाची पुर्तता झाली आहे वरिष्ठकार्यलयातुन ऊर्वरित साखर आल्यास ते रेशन दुकानदारांना देण्यात येऊन त्याचे वाटप होईल तर याविषयी बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांचेशी संपर्क साधला असता एप्रिल मे जुनची डिमांड केलेली ती आल्यावर लगेच वाटप करण्यात येईलतब्बल सहावा महिना पुर्ण झाला तरी अजुनही साखरेमुळे तोंड गोड होत नाही अशी ओरड होत असतांना गहु बंद करुन ज्वारी वाटप होत आहे.आता सणवार चालु आहेत त्यामुळे नियमीत वाटप होत असलेल्या धान्यासाठी आता सणावारापर्यन्त गोडधोडसाठी साखर देणे तसेच संपुर्ण धान्य पुरवठा वितरणासाठी याचा विचार संबधित विभागाने करणे गरजेचे आहे byदिव्यांग शक्ती -October 02, 2024
आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचे चले जाव आंदोलन : राहुल साळवे न नांदेड (माधव शिंदे) जिल्हा प्रतिनिधी :: नांदेड जिल्ह्यात अपंग दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ आणि दिव्यांग व्यक्तीसाठींचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ सह शासन निर्णयांची अंमलबजावणी न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करत आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत चले जाव आंदोलन करणार असल्याची माहिती आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शासन स्तरावरून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी विविध शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत परंतु स्थानिक पातळीवर त्यांची अंमलबजावणी केली जात नाही. आमदार - खासदार निधीतूनही दिव्यांगांच्या कल्याणासाठी दरवर्षी 30 लाख रुपये विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे परंतु कार्यकाळ संपत आला तरी एकाही आमदार महोदयाने हा निधी खर्च केला नाही. तसेच खासदारानेही एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा ३० लाख रुपये निधी अखर्चितच ठेवत आपला कार्यकाळ पूर्ण केला असल्याचे साळवे म्हणाले.नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांगांवरील वाढते अन्याय अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना जिल्ह्यात अपंग दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली त्यातून दरमहा १५०० रूपये मानधन दिले जात आहे त्याच धर्तीवर लाडका दिव्यांग योजना राबवून प्रति दिव्यांग ६ हजार रुपये प्रति महिना संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना मानधन देण्यात यावे व आजवर दिव्यांगांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या विविध विभागातील शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढून काळा दिवस पाळत जिल्हा परिषद.महानगरपालिका. जिल्हाधिकारी कार्यालय. पोलिस प्रशासनसह संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात जाऊन आमचा कायदा नाही तर तुमचा फायदा नाही म्हणत अधिका-यांच्या खुर्च्या जप्त करून चलेजाव आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन राहुल साळवेसह.देविदास बद्देवाड.फेरोज खान पठाण.प्रदिप हणवते.शेषेराव वाघमारे.विष्णु जायभाये.आनंदा माने.संतोष गज्जलवाड.कार्तिककुमार भरतीपुरम.राजु इराबत्तीन.सय्यद आरिफ.शिवाजी सुर्यवंशी.रवि कोकरे.नागनाथ कामजळगे. राजकुमार देवकर.परशुराम गायकवाड.प्रशांत हणमंते.अजय गोरे.शेख आतिक.मुंजाजी कावळे.संजय धुलधाणी.हसन खान.शेख माजिद.कमलाकर टाकळीकर.शेख आलिम.राज कदम.नागेश निरडी.धर्मेंद्र नालटे.किरणकुमार न्यालापल्ली.भाग्यश्री नागेश्वर. सविता गवते. कल्पना सप्ते.मनिषा पारधेसह मुकबधीर कर्णबधिर संघटना व ब्लाईंड संघटना यांच्याकडून आज करण्यात आले आहे. byदिव्यांग शक्ती -October 01, 2024