खामगाव विधानसभेसाठी पहा काय चालंलय !खामगाव (मधुकर पाटील ) विधानसभेचे बिगुल संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाजलं सत्ताधारी आपल्या विकासातून तर विरोधी सरकारच्या अकार्यक्षमतेवरून या निवडणुकीकरिता सामोरे जात आहे यात सोशल मीडिया च्या माध्यमातुन कार्यकर्ते धन्यता मानणारे त्यात तर काही घर की रोटी ********** प्रमाणे व्हॉट्सअँप ग्रुप ला भिडले आहे सोशल मीडियातून आपल्या नेत्याला वरचढ दाखविण्याची जणू स्पर्धाच लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्लिप व्हील वर आपल्या पसंतीच्या उमेदवारांची नावे देऊन त्यांचं टक्केवारी स्वरूपात पसंती दर्शविण्यात येते या पसंती क्रमानुसार आपला आमदार कोण होईल याचं गणित या स्लिप व्हीलच्या माध्यमातून सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपला दाखविण्याची जणू स्पर्धा लागली असल्याचे पहावयास मिळत आहे तर आज आपला नेते इथे आपला नेता तिथे यावरही हा ***** फुल जबाबदारी असलेला कार्यकर्ता यात धन्यता मानत असल्याचं दिसून येत आहेयामध्ये विरोधी व सत्ताधारी कार्यकर्त्यामध्ये प्रसार प्रचार यंत्रणा चालवीत आहे खामगाव विधान सभेला 2014 व 2019 च्या निवडणुकीत सत्ताधारी ने विजय प्राप्त केला गेला तर आता ते 2014 2019 तर 2024 ला विजयाची हॅट्रिक साध्य करण्याकरिता विधानसभेच्या मैदानात तयारीला लागले आहे तर यांच्यासाठीसोशल मीडिया हाताळत आपल्या दोन्ही म्हणजे सत्ताधारी व विरोधी आपल्या नेत्याला वरचढ दाखविण्याकरता कार्यकर्ते कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे पक्षीय बलाबल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभेमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपा हा सामना असाच अटळ राहणार त्याला कारणही तितकेच राष्ट्रवादी (दोन्ही गट) असो कि (सेना) दोन्ही गट नाममात्र बळ ठेऊन आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा काहीसा परिणाम राहणार हे नक्कीत्यामुळे भाजपा विरुद्ध काँग्रेस असेच चित्र निश्चित असल्याचं दिसत आहे आमदार, माजी आमदार व इच्छुक यांच्या कार्य कुशलतेचा प्रसार प्रचार कसोसिने करण्याचा प्रयत्न मतदार संघातील कार्यकर्ते करीत असल्याचं दिसत आहे तर कार्यकर्त्यांकडून विविध विकास कामांची गणिते लाडक्या बहिणीसह मांडल्या जात आहेत तर विरोधीकडून रोजगार महागाईसह शहरातील रखडलेली कामे रस्त्यावर पडलेले खड्डे ग्रामीण भागातील हाल बेहाल चा पाढा पुढे करण्यात येत आहे यावर सोशल मीडिया चा पुरेपूर वापर करीत हे पगारी की विन पगारी असलेले कार्यकर्ते आपल्या आपल्या नेत्याचा पक्षाचा उदो उदो करण्यात धन्यता मानत असल्याचे पहावयास मिळत आहे तर यातून कुठल्याच पक्षाचा थारा नसलेले सुज्ञ मतदार वास्तव असलेल्या परिस्थितीची जाण ओळखत असल्याचे पहावयास परंतु सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यात टाळत असल्याचही दिसून येत आहे शेवटी एवढेच निवडणूक काही दिवसां साठीच असते यातून एकमेकांचे नुकसान होणार नाही किंवा वाद होणार नाही यावर कटाक्ष ठेवणे क्रम प्राप्त आहेयासाठी एकच कोणीही निवडून येणार तो आपलाच आमदार होणारच.
byदिव्यांग शक्ती
-
0