विकासाचा पाऊस पडला कुठे. मलकापूर ;माजी आमदार चैनसुख संचेती याचा मतदार कडून झालेला पराभव आणि आमदार एकडे यांचा विजय मलकापूर शहरासह विधान सभेतील नागरिकांसाठी विकासाच्या मुद्द्यावर एक आशावाद ठरेल असे वाटत होते परंतु सन 2019 ते 2024 कालखंड उलटला अनेकदा भूमिपूजन आणि विकासाच्या बातम्यांचा सडा दिसून आला मात्र प्रत्यक्षात विकासाचा पाऊस मतदार संघाच्या कोणत्या परिसरात पडला हा मतदारांसाठी शोध व विवंच्येचा विषय ठरला आठवडी बाजार संकुल पोलीस चौकी बस स्टॉप सभागृहे यासारख्या अनेक विविध विकासाच्या कामाचे भूमिपूजन माननीय आमदार एकडे यांच्या हस्ते होताना दिसून आले मतदारसंघात एक नवं चैतन्य व विकासाचा आशावाद दिसून आला परंतु तब्बल पाच वर्षे उलटूनही विकास न दिसल्याने आजही आशावादाची निराशावादात परिवर्तन झालेले आहे.तरीही प्रसार माध्यमांमधून वारंवार विकास झाल्याचे जाहिराती ठासून ठासून मतदारांसमोर ला जात आहे परंतु ही मलकापूर विधानसभा मतदारसंघातील जनता अडाणी आहे असंच कदाचित विद्यमान आमदार यांना वाटत असावी कारण मतदारसंघात लोकांच्या मूलभूत सेवा सुविधा याचा पूर्णतः अभाव दिसून येत आहेत मतदार संघात जागोजागी नादुरुस्त रस्ते विजेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न शौचालयाचा प्रश्न कायदा सुव्यवस्थे चां प्रश्न सारख्या अनेक बाबी गेल्या पाच वर्षात पूर्णपणे अस्था वेस्था झाल्याचे चित्र असताना माननीय आमदार एकडे मतदारांसमोर मांडून त्यांना बुरड घालण्याचा प्रयत्न करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post