भव्य लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबीरखामगाव(मधुकर पाटील)मेंढे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि लॉयन्स क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्बिणीद्वारे पोटांच्या शस्त्रक्रियाचे शिबिर आणि गुडघ्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरदिनांक ४ ऑगस्ट रविवारवेळ : सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थळ : मेंढे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, १४ जसवंत कॉलनी, स्टेंट बँक कृषी शाखेमागे, नांदुरा रोड, खामगांव.वरील शिबिरात पोटांचे विविध आजार, गाठीचे आजार, पित्ताशय, अपेंडिक्स इत्यादी बाबत मोफत तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ऑपरेशन मध्ये रुग्णाला पन्नास टक्के सूट देण्यात येईल तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा ही विनंती या शिबिरात डॉ. सौ. समृद्धी अनिकेत मेंढे, जनरल सर्जन, इंडॉस्कॉपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, प्रोक्टोलॉजिस्ट लॅप्रोस्कॉपिक सर्जन खामगाव हे आपल्याला सेवा देतील तसेच वरील शिबिरात गुडघ्याच्या आजारांच्या रुग्णांसाठी गुडघ्यांची तपासणी मोफत करण्यात येईल तसेच दुर्बिणीद्वारे तपासणी आणि गुडघ्याची दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया करावयाची आवशक्यता लागल्यास त्यामध्ये ५०% सूट देण्यात येईल. शस्त्रक्रिया डॉ. अनिकेत मेंढे अस्थिरोगतज्ञ हे करतील. तरी गरजूंनी याचा फायदा घ्यावा * विनीत *लॉ. शंकर परदेशी, अध्यक्ष, लायन्स क्लब खामगाव लॉ. डॉ. धनंजय तळवणकर, सचिव, लायन्स क्लब खामगाव लॉ. राहुल भट्टड, कोषाध्यक्ष, लायन्स क्लब खामगाव प्रोजेक्ट इन्चार्ज १) लिओ. शुभम गरड २) लिओ गौरव खत्री ३) लिओ पियुष आंबेकर ४) लिओ ललित छांगाणी* नोंदणीसाठी फोन नंबर *लॉ. डॉ. मेंढे: 9422267472 लॉ. डॉ. सौ. सुरेखा मेंढे : 9423749600 लिओ अभिजीत मेहता : 9028811737 असे आव्हानयांनी केले आहे byदिव्यांग शक्ती -July 31, 2024
दखल दिव्यांग शक्तीची MPSC च्या पाञार्थीपासुन झाली सुरवात दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणार ! मुंबई (अशोक चव्हाण): कृषी विभागासह ईतर विभागात २०२३-२४ या वर्षात दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्यांची दिव्यांग प्रमाणपत्रे एम पी एस सी विभाग तपासणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू केल्याची माहिती विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या भरतीत दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांची सखोल चौकशी करावी, असे पत्र स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने मंञी महोदयासह सर्वांना दिले होते. नुकत्याच झालेल्या कृषी सेवक पदभरती परीक्षेत दिव्यांग आरक्षणांमधून भरती झालेल्या उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र काढून शासनाची फसवणूक केल्याचा उल्लेख या तक्रारीत होता २०१८-२०१९ मध्ये झालेल्या कृषी सेवक पदभरतीत दिव्यांग कोट्यातून बोगस प्रमाणपत्र वापरून उमेदवार निवडले गेलेले आहेत, असा संशय असल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे जे मूळ दिव्यांग आहेत त्यांना न्याय देण्यासाठी २०१६ पासून कृषी विभागासह एम पी ऐस सी ऊत्तीर्ण झालेल्या सर्व भरतीमध्ये निवड झालेल्या दिव्यांग कोट्यातील उमेदवारांची सखोल चौकशी करण्याचे आदेशित झाले आहे, ९-१ प्रमाणे यांची सक्षम अधिकार्याच्या माध्यमातुन तपासणी होणार आहे तर मिळालेल्या सुञानुसार शिक्षक वर्गासह ईतर विभागातील अधिकारी कर्मचारी हे बनावट अपंग असल्याचे प्रमाणपञ मिळवुन शासनाच्या एच्छिक बदलीसह प्रवास सवलतीचा व,ईतर लाभ घेत आहेअश्याची चौकशी करुन दिव्यांग सुरक्षा हमी कायद्यान्वैय कार्यवाही करण्याच्या मागणीने जोर धरला आहे byदिव्यांग शक्ती -July 29, 2024
राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार)दिव्यांग सेल चा मोर्चा छञपती संभाजीनगर .....५आॅगस्टला चलो छत्रपती संभाजीनगरऊठ दिव्यांगा जागा हो, विकासाचा धागा हो. आपल्या हक्कासाठी, दिव्यांगाला न्याय मिळण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे. मा. श्री. मदनकुमार इंगळे, प्रदेश सरचिटणीस दिव्यांग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर- दिव्यांग जन आंदोलन -दिव्यांग बांधवांच्या मागण्या खालील प्रमाणे :-१) दिव्यांगांना शासनाने विनाअट दोन रुम, स्वच्छतागृह, स्नानगृह मोफत बांधून देण्यात यावे.२) दिव्यांगांच्या पाल्यांना मोफत शिक्षण व नोकरी दयावी.३) दिव्यांग व निराधार यांना दरमहा रु. १०००० संजय गांधीचे पेन्शन देण्यात यावे.४)दिव्यांग नागरीकांना व्यवसायासाठी विनाअट २०० स्क्वे. फुट जागा देण्यात यावी.५) दिव्यांग नागरीकांना नवीन गॅस कनेक्शन, सिलेंडर मोफत भरुन मिळाले पाहिजे.६) दिव्यांगांना शहरी, ग्रमीण घरटॅक्स, पाणीपट्टी मध्ये १०० टक्के सुट देण्यात यावी.सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता स्थळ :- विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्यावतिने आयोजक :- श्री. रंगनाथ मिरगे, सुभाष दामले, अशोक आहेर, बालाजी तिवारी, सलीम पठाण, राजेश गायकवाड, परशरामराठोड, अशोक हिवर्डे, आर. डी. सोमासे, एस. के. पुंड, अशोक भोसले, गणेश थोरात, योगेश महाकाळ, अरुण बहिरे यांनी केले आहे byदिव्यांग शक्ती -July 28, 2024
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्याविदर्भ सचिव पदी विनोद भोकरे यांची नियुक्तीबुलढाणा :- पत्रकारांच्या समस्या आणि अन्याया विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या (भारत) विदर्भ सचिव पदी विनोद भोकरे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष जाधव यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी केली आहे. तसेच यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. 27 जुलै रोजी खामगाव येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होती.यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पत्रकारांना मागदर्शन करताना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ म्हणाले की, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यात तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी विविध विषयावर कार्यशाळा, बदललेल्या कायद्यावर मार्गदर्शन शिबिर तसेच पत्रकारांचे अडी - अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही देत राज्यात कोणताही पत्रकार कोणत्याही संघात असला तरी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या पत्रकार बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा मानस राहणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे विष्णू कंकाळ यांनी सांगितले.बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ यांनी पत्रकारांना मागदर्शन करीत पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय देणार असल्याचे सांगितले.यावेळी नवनियुक्त विदर्भ सचिव विनोद भोकरे यांनी नियुक्ती बद्दल सर्वांचे आभार मानत महाराष्ट्र राज्य, विदर्भासह जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करणार आहे. पत्रकारांसाठी आरोग्य, निवारा व आर्थिक परिस्थिती या गोष्टींवर भर देणार आहे. तसेच पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( भारत) काम करीत आहे. त्यामुळे पुढील काळात संघटना वाढीसाठी काम करीत पत्रकारांवर होणारा अन्याय व अत्याचाराला नेहमीच वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. असे विनोद भोकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ यांनी ज्येष्ठ पत्रकार रमेश खंडारे यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच गजानन रोकडे यांची अन्याय - अत्याचार समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आहे. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कान्हेरकर, नवनियुक्ती जिल्हा संघटक रमेश खंडारे, पद्माकर धुरंदर, गजानन रोकडे , जुबेर शहा, संतोष आटोळे, सिद्धेश्वर निर्मल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. byदिव्यांग शक्ती -July 28, 2024
महिला व बालकांच्या लोक कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार प्रा.अनुजाताई सावळे खामगाव (का.प्र. ) तालुक्यातील शहरालगत असलेल्या जयपुर लांडे येथे लेक लाडकी योजना सह महिला बालकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी बुलढाणा जिल्हा महिला बालकल्याण समिती सदस्या तथा राष्ट्रवादी बुलढाणा जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे यांचे प्रमुख ऊपस्थित तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस जे महाले तर मंचावर प्रमुख ऊपस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वतंञ पञकार संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष मनोज नगरनाईक महिला कर्मचारी संघटना तालुकाअध्यक्ष मा.अर्चनाताई टाले,दिव्यांग शक्ती प्रतिनीधी मधुकर पाटिल,प्रहार शहराध्यक्ष क्षञुघन ईंगळे,ऊप सरपंच दुर्योधन तायडे,शिवलाल ऊबाळे,संगणक परिचालक जिल्हाध्यक्ष शुभम लांडे प्रणिताताई देवगिरीकर,कविताताई ईंगळे हे ऊपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अंकिताताई लांडे व ईतरांचे हस्ते सत्कार करण्यात आलायावेळी माजी सैनिक यांच्या सुविध्ज्ञ पत्नीं सौ.पुष्पाबाई लांडे यांचा अनुजाताई सावळे व मनोज नगरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलातर कार्यक्रमाला शिक्षण सप्ताहातील सहावा दिवस व्रुक्षारोपण,मुख्यमंञी लाडकी बहिण निमित्य शिबीर तसेच राज्याचे ऊपमुख्यमंञी अजित पवार यांचे वाढदिवसाचे निमीत्याने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी बोलतांना सावळे ताई यांनी गावकर्यांना संबोधतांना सरकारच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी त्यातील असलेल्या ऊणिवा दुर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करुन त्याचे निराकरण करण्याचे त्यांनी आश्वासित केले तसेच बुलढाणा जिल्ह्यातील महिला व मुलींना सक्षम करण्यासाठी यथाशक्ती योगदान देण्याचे सांगितले,यासोबतच प्रास्ताविकामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी संजय करंजकरसर शरद वानखेडे रमेश सारोळकर,राजेश सावळे,राजकुमार पल्हाडे,सुधाकर राऊत,भाग्यश्री चौधरी,आशा सेविका किरणताई तायडे आंगणवाडीसेविका लताताई तायडे,कल्पना जाधव मदतनिस ऊषाबाई पवार रंजनाबाई पवार तसेच गोपाल लांडे,पंजाब टाकरस,जनार्धन लांडे,श्रीक्रुष्ण लांडे सुरेंद्र पवार या गावकरीसह विद्यार्थी ऊपस्थित होते तर कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन महादेव पांडे यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप संविधान वाचन करुन करण्यात आले. byदिव्यांग शक्ती -July 28, 2024
एकनाथ शिंदेचे नाव अन राज्यात दुफळी निर्माण करणारे बॅनर खामगाव (का.प्र.)संपुर्ण राज्यात दिव्यांग अनुदान वाढीसाठी अनेक संस्था संघटनेच्यावतिने मागिल काही वर्षेपासुन सहा हजार,पाच हजार देण्यासाठी लढा ऊभारत मुख्यमंञी ऐकनाथ शिंदे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस,अजित पवार ईतर मंञ्यासह आमदार खासदार यांच्याकडे मागण्या सादर केल्या आहेत दिव्यांग विभागाकडुनही याविषयी सरकार ला अवगत केले असतांना दिव्यांग बांधवांची दिशाभुल करणारी एक फसवी जाहिरात आनंद दिघे दिव्यांग योजना म्हणुन ऐकनाथ शिंदेंचा फोटो लावुन संपुर्ण राज्यभर हे बॅनर सोशल मिडीयावर म्हणे मिळणार दरमहा ३ हजार 18 वर्षांवरील 40% दिव्यांग व्यक्तींना 6 महिन्यानंतर 6 हजारांचा लाभ 80% दिव्यंगत्व असलेल्या व्यक्तींना 6 महिन्यानंतर 18 हजारांचा लाभ पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र असणे आवश्यक योजनेला 111.83 कोटींची तरतूद दिव्यांगांच्या हिताचे सरकार आपले महायुतीचे..! {पण हि योजना कुठे याचा पत्ता नमुद नाही } असे लिहुन राज्यात एका मोठ्या शहरा पर्यन्त सिमीत असलेली योजना ही राज्यभरातील दिव्यांगाना अचंभ्यात टाकण्याचे दिशाभुल करण्याचे काम करित आहे आधिच (ज्याची मागणी नव्हती!) लाडकी बहिन योजना विविध बाबीतुन चर्चेत आलेली असतांना या फसगत करणार्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महायुतीच्या नावे प्रसारीत होणारी ३०००/- देणारी जाहिरात थांबविण्याची मागणी किंवा हि योजना संपुर्ण राज्यभर लागु करण्याची मागणी दिव्यांगाकडुन होत आहे तर byदिव्यांग शक्ती -July 27, 2024
*देशात बोगस दिव्यांगांची खैर नाही**याची सुरवात सरकारी अधिकारी कर्मचारीपासुन*शेगाव (संतोष निंबाळकर)देशभरात चर्चित असलेल खेडकर कुटुंब विशेषता पुजा खेडकर यांनी तिन प्रकारामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपञामुळे सनसनाटी पुर्वेक या आय ए एस दर्जाची प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थान रचल्याचे निर्देशनात या महिलेमुळे दिसुन आले आहेवास्तविक असलेल्या दिव्यांगाच्या हक्कावर गदा आणण्याचे पाप यामुळे घडल्याचे चर्चिले जात असतांनाच राज्यात बोगस अधिकारी मग बुलढाणा जिल्हा असो कि सातारा या ठिकाणची प्रकरणासह बिड जिल्हासह बुलढाणा जिल्ह्यात अख्खि जिल्हा परिषदच म्हणजे ५२%कर्मचारी अधिकारी अपंग असल्याचे प्रकरण डोळ्या समोर ठेऊन शासनाच्यावतिने आता बोगस अपंग अधिकारी कर्मचारीवर कार्यवाहीचा बडगा ऊगारणार असल्याचे समोर येत आहेवास्तविक युपीएससी यंञणा असो कि राज्यातील एमपीएससी यंञणा यांनी ताक फुंकुन पिण्यासारखे कर्तव्य बजावणे गरजेचे असतांना वास्तविक शहिनीशा न करता या जनमानसामध्ये मानद पदाची गरिमेला डाग लावण्याचे काम या यंञणेकडुन झाल्याचे चर्चेतुन दिसत आहेवास्तविक दिव्यांगांना डावलण्याचे प्रताप खाऊगिरी करणार्या मेडिकल बोर्ड मुळे होत असल्याचे दिसुन येत असतांनाही यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने कंबर खोचली असल्याचे चर्चिले जात आहे तर मेडिकल बोर्डेची तपासणी ईन कॅमेरासह दिव्यांग प्रतिनीधी समक्ष होणे गरजेचे असल्याचे दिसुन आले आहे byदिव्यांग शक्ती -July 23, 2024