सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र मेश्राम यांना लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य कडून भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४ ने मुंबईत सन्मानित....-----------------------------मा.किशोरीताई पेडणेकर (मा.महापौर मुंबई महानगरपालिका) यांच्या प्रमुख उपस्थितीत....------------------------- साप्ताहिक दिव्यागं शक्ती पालघर जिल्हा प्रतिनिधी..देवेंद्र मेश्राम पालघर...(२९ मार्च २०२४ रोजी मुंबई)सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र मेश्राम यांनी केलेल्या व करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई येथे मुबई मराठी पत्रकार संघ हॉल आझाद मैदान सीएसएमटी मुंबई येथे "भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४" मा.किशोरीताई पेडणेकर (मुंबई महापौर महानगरपालिका) यांच्या हस्ते तिरंगा पट्टा,सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक,कला क्रीडा,आरोग्यिक अश्या अनेक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुण गौरव सत्कार मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ हॉल येथे करण्यात आला.सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन आणि नुकतेच निधन झालेल्या अभिनेत्री राजश्री काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्या नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मा.किशोरीताई पेडणेकर (मा.महापौर मुंबई महानगरपालिका),समारंभ अध्यक्ष मा.चारुशीला देशमुख (संस्थापक अध्यक्ष , कै.शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्था), मा.डॉ.मोनिका चोप्रा - जगताप (निमंत्रक लेक लाडकी अभियान मुंबई), मा.स्वाती ओक (प्रसिद्ध स्वंदर्यातज्ञ), मा.स्वाती घोसाळकर (उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ मुंबई व पत्रकार), मा.संगीताताई गुरव (समाजसेविका व उद्योजिका),जकिर खान (अभिनेता व कॉमेडियन),दीपक कळींगण (अध्यक्ष महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ),विजय भोसले (संपर्क प्रमुख शिव शंभू संघटना),देवानंद कांबळे (उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ),आणि कार्यक्रम संयोजक सूरज भोईर (लेक लाडकी अभियान,मुंबई सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार व गायक या सर्वांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य राहिले.सामाजिक कार्यकर्ता व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम यांनी लेक लाडकी अभियान अंतर्गत "भारत राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४" स्वीकारून सर्व प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रम आयोजक सूरज भोईर यांचे आभार मानले. byदिव्यांग शक्ती -March 31, 2024
*डॉ.चोपडेंच्या विरुद्ध पीडित मातेची पोलीस प्रशासनाकडे आर्त हाक मलकापूर : (विप्र) शहरातील डॉ. राहुल चोपडे यांनी अपघात झालेल्या एकुलत्या एक मुलावर चुकीचा इलाज केल्याने माझ्या मुलासह माझ्या परिवाराला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तरी डॉक्टर राहुल चोपडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूनम विश्वनाथ भारंबे रा. आनंद सोसायटी या मातेने ३० मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. १३ मार्च रोजी दुर्गेश भारंबे याचा दसरखेड एमआयडीसी परिसरात अपघात झाल्याने त्याला डॉक्टर राहुल चोपडे यांच्या दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान अपघात ग्रस्त मुलाची माता पूनम भारंबे व पिता विश्वनाथ भारंबे डॉ. राहुल चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असता तुमच्या मुलाच्या डाव्या पायाची गुडघ्याची वाटी सरकली आहे व फ्रॅक्चर सुद्धा झाले आहे त्याचप्रमाणे पायाला पक्के प्लास्टर करावे लागणार असल्याने तुम्ही आधी काउंटरवर ६ हजार रुपये जमा करा असे सूचित करण्यात आले त्यानुसार भारंबे दांपत्याने काउंटरवर ६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर अपघात ग्रस्त दुर्गेश च्या पायाचे प्लास्टर केल्या गेले परंतु प्लास्टर झाल्यानंतर दुर्गेशला जास्त प्रमाणात त्रास होऊ लागला. ही बाब डॉ. राहुल चोपडे यांना कथन केल्यानंतर प्लास्टर ताजे असल्यामुळे त्रास होतो आहे तो हळूहळू कमी होईल असे सांगून त्याच दिवशी दुर्गेश ला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर भारंबे दांपत्याने २ दिवस वाट पाहिली परंतु दुर्गेश चा त्रास काही कमी होत नव्हता तो सतत रडत होता. त्यामुळे १५ मार्च रोजी पुनम भारंबे यांनी दवाखान्याच्या फाईल वरील नंबर वर संपर्क केला असता डॉक्टर साहेब बाहेरगावी गेलेले असून २२ मार्चपर्यंत दवाखाना बंद आहे असे सांगण्यात येऊन लिहून दिलेली पेन किलर गोळी आहे ती देण्यास सांगितले. परंतु पेन किलर गोळी देऊनही दुर्गेशला फरक पडला नाही. त्यामुळे १६ मार्च रोजी पुनम भारंबे ह्या ऑटो रिक्षा द्वारे मुलाला घेऊन डॉ राहुल चोपडे यांच्या दवाखान्यात घेऊन गेल्या तर त्यांना दवाखाना सुरू असल्याचे दिसून आले. दवाखान्यातील कंपाउंडर साठे यांना दवाखाना तर चालू आहे मग फोनवर नर्सनी दवाखाना २२ मार्चपर्यंत बंद का आहे असे का सांगितले? असा प्रश्न उपस्थित केला असता ते जाऊ द्या तुमचे काम काय आहे ते सांगा असे असे म्हणत साठेंनी त्रास कमी होईल म्हणून लास्टर सैल करून देत त्या दोघांना घरी पाठवले. तर १७ मार्च रोजी दुर्गेश झोपेतून उठतच माझ्या पायामध्ये काहीतरी हालचाल जाणवत आहे असे वाटते की माझा पाय कोण कापून नेला आहे असे म्हणत जोरजोराने रडू लागला. त्यावर मातेने पायाला हात लावून विचारले की काही संवेदना जाणवतात का तर मुलगा म्हणाला की काहीच संवेदना जाणवत नाही. त्यामुळे भारंबे दांपत्याने त्यांच्या मुलाला बुरहानपुर येथील डॉ. सुबोध बोरले यांच्या दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी प्लास्टर कापले व तुमच्या मुलाचे ट्रीटमेंट चुकीचे झाले असून लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल नाहीतर तुमच्या मुलाच्या पायात इन्फेक्शन होईल व पाय कायमस्वरूपी कामातून जाईल असे सांगण्यात आले. त्यानुसार ऑपरेशन झाल्यानंतर २२ मार्च रोजी मुलाला सुट्टी देण्यात आली. तर सद्यस्थितीत त्या मुलावर योग्य औषध उपचार सुरू असल्याची बाब मातेने सांगितली. माझ्या मुलाला म्हणजेच दुर्गेश ला दिनांक 13 मार्च रोजी डॉक्टर चोपडे यांनी दाखल करून घेतले होते तेथे त्यांनी काळजी व सहानुभूतीपूर्वक योग्य उपचार केला नसल्याने माझ्या मुलाची तब्येत बिघडली होती आणि त्याच डॉक्टर राहुल चोपडे यांचा बेजोदारपणाची वृत्तीत कारणीभूत असून या पकानात तातडीने चौकशी करून त्यांच्यावर FRI दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी त्या मातेने निवेदनाद्वारे केली आहे. मलकापूर शहरात बेजबाबदार डॉक्टरांची संख्या वाढत असून महिन्याकाठी किमान सहा ते आठ रुग्णांना जीवन संपवावे लागते रुग्ण कोणत्याही समाजाचा असो अगर जातीचा असो अशा प्रकरणात एका विशिष्ट जातीचा डॉक्टर असलेल्या नेत्याच्या मदतीने प्रकरण निपटल्या जाते आणि हे उघड असताना पोलीस प्रशासनाकडून कोणताही FRI नोंदवल्या जात नाही ही आश्चर्याची बाब आहे."बॉक्स"*डॉक्टरांची "मेडिकल निग्लीजन्स" ची गय केली जाणार नाही- दिपक चांभारे पाटील* गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना डॉक्टरांच्या "मेडिकल निगलिजन्स" मुळे शारीरिक, आर्थिक ,मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच काय तर अनेकांचे जीव सुद्धा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र यानंतर मलकापूर तालुक्यातील कुठल्याही रुग्णासोबत डॉक्टरांकडून बेजबाबदार किंवा निष्काळजीपणाने उपचार केला गेल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आक्रमक होणारं असुन रुग्णांना न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही लढा देऊ असा दिलासा दिपक चांभारे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे. byदिव्यांग शक्ती -March 31, 2024
युवा हिंन्दु प्रतिष्ठाण तर्फे स्वातंञ्यविर सावरकर चिञपटाचा एक शो मोफतखामगाव.(शेखर तायडे)- स्वातंत्र्य वीरसावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर हा चित्रपट उद्या रविवार ३१ मार्च रोजी येथील • सनी पॅलेसमध्ये सायंकाळी ६ ते ९ चा एक शो युवा हिंदू प्रतिष्ठाण तर्फे निःशुल्क दाखविण्यात येणार आहे.तरी धर्मप्रेमी युवक, युवतिनी या - चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा हिन्दू प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी आपली नावे युवा हिंदू प्रतिष्ठाण चे शहर प्रमुख मनोज ठोंबरे ८५२८५२१७१७, शहर सचिव अरविंद भोंगळ ७५१७४०६०५५ तसेच सदस्य राकेश सुतोने ९५९५६७६६८७ यांचेकडे उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत संपर्क करून आपली नोंदणी करावी.कृपया नोंदणी केलेल्यांनाच प्रवेश दिल्या जाईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी दिली आहे byदिव्यांग शक्ती -March 30, 2024
*यापञाची घराघरात चर्चा*.....(साभार सोशल मिडीया)*बायकोने दिला नवर्याच्या पक्षाचा राजीनामा...हे राजकारण आहे राजेहो यामध्ये भाऊ भावाचा नाही, मुलगा बापाचा नाही . आणि बायको नवर्याची नाही* ...अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वाभिमान पार्टीच्या कार्याध्यक्षा असलेल्या नवनित राणा यांनी राजिनामा देत भाजपा मध्ये प्रवेश करत ऊमेदवारी मिळविली आहेसोशल मिडीयावर फिरत असलेल्या राजीनामा पञावर लिहीले आहे किजा.क्र.सह दिनांक: 27/03/2024 प्रति, मा.श्री आ रविजी राणा संस्थापक अध्यक्ष - युवा स्वाभिमान पार्टी मा. महोदय, मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी ची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती, आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पार्टीने आजपर्यंत मला जो मानसन्मान दिला, सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती आपलीच सौ. नवनीत रवी राणा प्रत सहर्यांना माहितीकरीता सादर, विविध चर्चामुळे मुळ कलाकार असलेल्या तसेच बनावट जात प्रमाणपञामुळे चर्चित असलेल्या नवनित राणा यांनी दिलेल्या राजीनामापञाची खमंग हास्य चर्चा सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहे byदिव्यांग शक्ती -March 30, 2024
मोहम्मद हसन इनामदार यांना बुलढाणा मतदारसंघातून एमडीपी लोकसभेचे तिकीटबुलढाणा (मो.रईस): लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या महत्त्वाच्या घडामोडीत, अल्पसंख्याक लोकशाही पक्षाने (MDP) मोहम्मद हसन अब्दुल खालिक इनामदार यांना बुलढाणा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. इनामदार यांची उमेदवारी हा ऐतिहासिक क्षण आहे कारण ते या प्रदेशातून निवडणूक लढवणारे एकमेव अल्पसंख्याक उमेदवार आहेत. अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधीत्वासाठी प्रबळ दावेदार: इनामदार, एक अनुभवी राजकारणी आणि समाजाचे नेते, अल्पसंख्याकांच्या हक्क आणि सामाजिक कल्याणासाठी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. MDP द्वारे त्यांची निवड भारतीय राजकारणातील विविधता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पक्षाची वचनबद्धता अधोरेखित करते. मैदानातील एकमेव अल्पसंख्याक उमेदवार म्हणून, इनामदार उपेक्षित समुदायांचा आवाज वाढवणे आणि त्यांच्या विशिष्ट चिंतांचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. इनामदार यांच्या पाठीशी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांची रॅली : इनामदार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. विविध पार्श्वभूमीतील रहिवाशांनी सार्वजनिक सेवेतील त्यांचे समर्पण आणि विविध समुदायांमधील अंतर कमी करण्याची त्यांची क्षमता ओळखून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला आहे. इनामदार यांचा सामुदायिक विकास उपक्रमांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाने धार्मिक आणि सांस्कृतिक मार्गांवर मतदारांना प्रभावित केले आहे. निर्णायक निवडणूक: बुलढाण्यातील आगामी लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे, ज्यामध्ये अनेक पक्ष वर्चस्वासाठी स्पर्धा करत आहेत. इनामदार यांच्या नामांकनाने अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधित्वाच्या महत्त्वावर जोर देऊन निवडणुकीच्या परिदृश्यात एक नवीन आयाम जोडला आहे. प्रचाराला जसजसा वेग आला, तसतसा सर्वांच्या नजरा इनामदार यांच्याकडे असतील कारण ते सर्वच वंचित शोषित समाजाच्या लोकांचा विश्वास आणि मते मिळवू पाहत आहेत.तर कुठल्याच पक्षाने अल्पसंख्यांक ऊमेदवाराचा विचार न केल्याने निवडणुकीत बुलढाण्यातील नागरिक मतदान करून आपल्या मतदारसंघाचे भविष्य घडविण्याच्या संधीची आतुरतेने वाट पाहत मोहम्मद हसन ईनामदार यांना लोकसभैत पाठवायचे असल्याचे त्यांच्या समर्थांकांनी सांगितले आहे byदिव्यांग शक्ती -March 30, 2024
प्रहारचा पहिला खासदार होणारच....बच्चु कडु अमरावती (विप्र)अमरावती लोकसभा मतदार संघात भाजप बोगस जातप्रमाणपञासाठी नावाजलेला उमदेवार नवनीत राणा यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ,माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटलेत. राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातर्फे दिनेश बूब यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर भाजपातुनही कडाडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाचे बंडखोर नेते दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दिनेश बूब यांनी शुक्रवारी प्रहारमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अमरावतीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला. ही निवडणूक आता रंगतदार होण्याचे संकेत आहेत.तर प्रहार सह शिवसेना (दोन्ही) भाजपा काॅग्रेस, राष्ट्रवादी गवई गटाचे कार्येकर्तेही यांनी आपला छुपा पाठींबा बुब यांना दिल्याचे दिसुन येत आहे byदिव्यांग शक्ती -March 30, 2024
*दारूच्या बाटल्या फेकण्यावरून मारामारी* ..बाळापूर. (गणेश लहामगे) घराच्या अंगणात दारूची बाटली फेकल्याच्या वादातून मारामारी झाल्याची घटना सोनाळा गावात घडली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनाळा येथील रहिवासी विनोद विनोद आमझारे यांनी उरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या अंगणात दारूच्या बाटल्या ओतल्या व चप्पलही चोरून नेली. याबाबत मी आवाज उठवला असता शेजाऱ्यांनी माझ्याशी वाद घातला. एवढेच नाही तर शिवीगाळ करून मारहाणही केली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी 3 जणांविरुद्ध कलम 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला पुढिल तपास ऊरळ पोलिस करित आहे.............*दिव्यांग शक्ती लाईव्ह**अपडेट बातम्या करिता*व्हाटसप**7770010084**बातम्या जाहिराती पाठविण्याकरिता**मेल आयडी**nagarnaikm4@gmail.com.* byदिव्यांग शक्ती -March 29, 2024
खामगाव बांधकाम ऊपअभियंता जि.प. गायबच!............. खामगाव (शेखर तायडे) जिल्हा परिषद ऊपविभाग बांधकाम ऊप अभियंता श्री फोंडे रा.पुणे हे कार्यलयात गैरहजर असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कामे रेंगाळली असल्याने सरपंच,सदस्य,ठेकेदार,तक्रारदार,सर्व सामान्य नागरिक हैरान झाल्याचे दिसुन येत आहेतर कार्यलयातील कर्मचारी यांना विचारणा केली असता साहेब दौर्यावर आहे किंवा बाहेर गेले ,आत्ताच गेले असे विविध कारणे देत असल्यामुळे त्या फोंडे साहेबांच्या कारभारावर अंकुश ठेवणार कोण असा प्रतिप्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे. byदिव्यांग शक्ती -March 28, 2024
*आचारसंहिता भंग प्रकरणी तक्रार निवारण कक्ष स्थापित* खामगांव दि.२८:मा.भारत निवडणूक अयोग यांचे आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता १६ मार्च २०२४ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची अधिसुचना दि.२८ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द झाली असून आचारसंहिता दि.१६ मार्च २०२४ पासुन लागू झालेली आहे व त्याच दिवशी दुपारी ३ वाजता पासून आदर्श आचार संहिताही सर्वत्र लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुंषगाने ०५ बुलढाणा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २६ खामगांव विधानसभा मतदार संघा मध्ये आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यालयामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.तथापि दरम्यानच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी नागरिकांना तक्रार दाखल करण्याकरिता उपविभागीय अधिकारी,तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी खामगांव या कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह,खामगांव येथे स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला आहे. करीता सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,आचारसंहिता भंग बाबत काही तक्रार असल्यास ०७२६३२९५६८८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह खामगांव येथे तक्रार निवारण केंद्र व जनसंपर्क मदतकक्ष स्थापन करण्यात आले असून तेथे व्यक्तिश:किंवा वरील दुरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधावा.असे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. byदिव्यांग शक्ती -March 28, 2024
प्रतीबंधीत गुटखा, पानमसाला साठवल्याच्या आरोपातून धर्मेद्र छगांणी यांची निर्दोष मुक्तता .खामगाव (मधुकर पाटील)अन्न सुरक्षा अधिकारी राव साहेब वाकड ेयांनी शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती की धर्मेद्र छगांणी यानी सराफा येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी पान मसालाजे की मानव आरोग्यास अपायकारक आहे याप्रकरणीगुन्हा क्र 38/15कलम 328,208 2७३, 188 भादवि सहकलम26 (2) (ir) (iii) अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006अंतर्गत गुन्हा दाखल केला तपास पूर्ण करून दोषारोपपत्र वि तदर्थ तथा अतिरिक्त सत्र न्यायधिश क्र १खामगाव केले त्याला खटला क्र 98/15 देण्यात आला सरकारी पक्षाने एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले आरोपीचे वकिल मोहता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून धर्मेद्र छगांणी याची निदोष मुक्तता केली आरोपी तर्फे अधिवक्ता तरुणकुमार विजयसिंह मोहता, खामगाव यांनी काम पाहीले byदिव्यांग शक्ती -March 27, 2024
भुकंपाच्या सौम्य धक्क्याने बाळापुर शेगावकर हादरले,राञीची झोपच नाही, प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन नागपूर, अकोला जिल्ह्यात झालेल्या भुकंपामुळेच शेगावात हादरे, प्रशासनाचा खुलासाशेगाव (गजानन कुळकर्णी) अकोला (मनोज भगत)... संत नगरी शेगाव शहरातील अनेक भागात 26 मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजे दरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला, यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले होते. अनेकांनी याबाबत तहसिलदार आणि पोलिस स्टेशनला फोन लावून खात्री केली. तर काहींना धक्का जाणवला ते समजलेच नाही. त्यामुळे शेगावकरांमध्ये भुकंप झाला किंवा नाही याबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. 26 मार्च सायंकाळी आलेला भुकंपाचे केंद्र शेगाव नसून नागपूर आणि अकोला जिल्ह्यात आलेल्या भुकंपामुळे शेगावातील काही भागात सौम्य धक्के जाणवले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार बाजड यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. शेगाव शहरा सोबतच नजीक असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली. मंगळवारी 26 मार्च च्या सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर गावात हा भूकंप झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्यावतीने ही माहिती प्रकाशित करण्यात आली. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 06.27 वाजता अंत्री मलकापूर गावात सौम्य प्रकारचे हादरे जाणवले, रिश्टर स्केलवर हा भूकंप 2.9 इतक्या तीव्रतेचा होता. हा अत्यंत सौम्य भूकंप असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची नोंद भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. भूकंपाचे धक्के काही सेकंदापर्यंत जाणवल्याची माहिती भूकंप मापक यंत्रणेकडून देण्यात आली आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये अकोल्यात 3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. जून 2020 मध्येही अकोला जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय भूकंप मापक केंद्राने 23 जून 2020 रोजी सायंकाळी 05.28 वाजता भूकंपाची नोंद केली होती. 17 एप्रिल 2021 मध्येही अकोल्यात भूकंपाची नोंद आहे. यावेळीही एप्रिल महिन्यातच भूकंपाची नोंद झाल्याचे राष्ट्रीय भूकंप मापक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.यासाठी आप्ती व्यवस्थापन जातीने लक्ष ठेऊन आहे byदिव्यांग शक्ती -March 27, 2024