भुकंपाच्या सौम्य धक्क्याने बाळापुर शेगावकर हादरले,राञीची झोपच नाही, प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचे आवाहन नागपूर, अकोला जिल्ह्यात झालेल्या भुकंपामुळेच शेगावात हादरे, प्रशासनाचा खुलासाशेगाव (गजानन कुळकर्णी) अकोला (मनोज भगत)... संत नगरी शेगाव शहरातील अनेक भागात 26 मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजे दरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला, यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले होते. अनेकांनी याबाबत तहसिलदार आणि पोलिस स्टेशनला फोन लावून खात्री केली. तर काहींना धक्का जाणवला ते समजलेच नाही. त्यामुळे शेगावकरांमध्ये भुकंप झाला किंवा नाही याबाबत संभ्रामवस्था निर्माण झाली आहे. 26 मार्च सायंकाळी आलेला भुकंपाचे केंद्र शेगाव नसून नागपूर आणि अकोला जिल्ह्यात आलेल्या भुकंपामुळे शेगावातील काही भागात सौम्य धक्के जाणवले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार बाजड यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले. शेगाव शहरा सोबतच नजीक असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याला भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली. मंगळवारी 26 मार्च च्या सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर गावात हा भूकंप झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्यावतीने ही माहिती प्रकाशित करण्यात आली. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी 06.27 वाजता अंत्री मलकापूर गावात सौम्य प्रकारचे हादरे जाणवले, रिश्टर स्केलवर हा भूकंप 2.9 इतक्या तीव्रतेचा होता. हा अत्यंत सौम्य भूकंप असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याची नोंद भूकंप मापक यंत्रावर झाली आहे. भूकंपाचे धक्के काही सेकंदापर्यंत जाणवल्याची माहिती भूकंप मापक यंत्रणेकडून देण्यात आली आहे. यापूर्वी जून 2022 मध्ये अकोल्यात 3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. जून 2020 मध्येही अकोला जिल्ह्यात भूकंपाची नोंद झाली होती. त्यावेळी राष्ट्रीय भूकंप मापक केंद्राने 23 जून 2020 रोजी सायंकाळी 05.28 वाजता भूकंपाची नोंद केली होती. 17 एप्रिल 2021 मध्येही अकोल्यात भूकंपाची नोंद आहे. यावेळीही एप्रिल महिन्यातच भूकंपाची नोंद झाल्याचे राष्ट्रीय भूकंप मापक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.यासाठी आप्ती व्यवस्थापन जातीने लक्ष ठेऊन आहे

Post a Comment

Previous Post Next Post