*दारूच्या बाटल्या फेकण्यावरून मारामारी* ..बाळापूर. (गणेश लहामगे) घराच्या अंगणात दारूची बाटली फेकल्याच्या वादातून मारामारी झाल्याची घटना सोनाळा गावात घडली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उरळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनाळा येथील रहिवासी विनोद विनोद आमझारे यांनी उरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या अंगणात दारूच्या बाटल्या ओतल्या व चप्पलही चोरून नेली. याबाबत मी आवाज उठवला असता शेजाऱ्यांनी माझ्याशी वाद घातला. एवढेच नाही तर शिवीगाळ करून मारहाणही केली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी 3 जणांविरुद्ध कलम 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला पुढिल तपास ऊरळ पोलिस करित आहे.............*दिव्यांग शक्ती लाईव्ह**अपडेट बातम्या करिता*व्हाटसप**7770010084**बातम्या जाहिराती पाठविण्याकरिता**मेल आयडी**nagarnaikm4@gmail.com.*

Post a Comment

Previous Post Next Post