प्रहारचा पहिला खासदार होणारच....बच्चु कडु अमरावती (विप्र)अमरावती लोकसभा मतदार संघात भाजप बोगस जातप्रमाणपञासाठी नावाजलेला उमदेवार नवनीत राणा यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ,माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसुळ यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याविरोधात दंड थोपटलेत. राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षातर्फे दिनेश बूब यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. भाजपने अमरावती लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर भाजपातुनही कडाडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाचे बंडखोर नेते दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दिनेश बूब यांनी शुक्रवारी प्रहारमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अमरावतीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला. ही निवडणूक आता रंगतदार होण्याचे संकेत आहेत.तर प्रहार सह शिवसेना (दोन्ही) भाजपा काॅग्रेस, राष्ट्रवादी गवई गटाचे कार्येकर्तेही यांनी आपला छुपा पाठींबा बुब यांना दिल्याचे दिसुन येत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0