*यापञाची घराघरात चर्चा*.....(साभार सोशल मिडीया)*बायकोने दिला नवर्याच्या पक्षाचा राजीनामा...हे राजकारण आहे राजेहो यामध्ये भाऊ भावाचा नाही, मुलगा बापाचा नाही . आणि बायको नवर्याची नाही* ...अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वाभिमान पार्टीच्या कार्याध्यक्षा असलेल्या नवनित राणा यांनी राजिनामा देत भाजपा मध्ये प्रवेश करत ऊमेदवारी मिळविली आहेसोशल मिडीयावर फिरत असलेल्या राजीनामा पञावर लिहीले आहे किजा.क्र.सह दिनांक: 27/03/2024 प्रति, मा.श्री आ रविजी राणा संस्थापक अध्यक्ष - युवा स्वाभिमान पार्टी मा. महोदय, मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी ची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती, आज दिनांक 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पार्टीने आजपर्यंत मला जो मानसन्मान दिला, सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते. कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे ही विनंती आपलीच सौ. नवनीत रवी राणा प्रत सहर्यांना माहितीकरीता सादर, विविध चर्चामुळे मुळ कलाकार असलेल्या तसेच बनावट जात प्रमाणपञामुळे चर्चित असलेल्या नवनित राणा यांनी दिलेल्या राजीनामापञाची खमंग हास्य चर्चा सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत होत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0