*डॉ.चोपडेंच्या विरुद्ध पीडित मातेची पोलीस प्रशासनाकडे आर्त हाक मलकापूर : (विप्र) शहरातील डॉ. राहुल चोपडे यांनी अपघात झालेल्या एकुलत्या एक मुलावर चुकीचा इलाज केल्याने माझ्या मुलासह माझ्या परिवाराला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. तरी डॉक्टर राहुल चोपडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पूनम विश्वनाथ भारंबे रा. आनंद सोसायटी या मातेने ३० मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. १३ मार्च रोजी दुर्गेश भारंबे याचा दसरखेड एमआयडीसी परिसरात अपघात झाल्याने त्याला डॉक्टर राहुल चोपडे यांच्या दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान अपघात ग्रस्त मुलाची माता पूनम भारंबे व पिता विश्वनाथ भारंबे डॉ. राहुल चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असता तुमच्या मुलाच्या डाव्या पायाची गुडघ्याची वाटी सरकली आहे व फ्रॅक्चर सुद्धा झाले आहे त्याचप्रमाणे पायाला पक्के प्लास्टर करावे लागणार असल्याने तुम्ही आधी काउंटरवर ६ हजार रुपये जमा करा असे सूचित करण्यात आले त्यानुसार भारंबे दांपत्याने काउंटरवर ६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर अपघात ग्रस्त दुर्गेश च्या पायाचे प्लास्टर केल्या गेले परंतु प्लास्टर झाल्यानंतर दुर्गेशला जास्त प्रमाणात त्रास होऊ लागला. ही बाब डॉ. राहुल चोपडे यांना कथन केल्यानंतर प्लास्टर ताजे असल्यामुळे त्रास होतो आहे तो हळूहळू कमी होईल असे सांगून त्याच दिवशी दुर्गेश ला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर भारंबे दांपत्याने २ दिवस वाट पाहिली परंतु दुर्गेश चा त्रास काही कमी होत नव्हता तो सतत रडत होता. त्यामुळे १५ मार्च रोजी पुनम भारंबे यांनी दवाखान्याच्या फाईल वरील नंबर वर संपर्क केला असता डॉक्टर साहेब बाहेरगावी गेलेले असून २२ मार्चपर्यंत दवाखाना बंद आहे असे सांगण्यात येऊन लिहून दिलेली पेन किलर गोळी आहे ती देण्यास सांगितले. परंतु पेन किलर गोळी देऊनही दुर्गेशला फरक पडला नाही. त्यामुळे १६ मार्च रोजी पुनम भारंबे ह्या ऑटो रिक्षा द्वारे मुलाला घेऊन डॉ राहुल चोपडे यांच्या दवाखान्यात घेऊन गेल्या तर त्यांना दवाखाना सुरू असल्याचे दिसून आले. दवाखान्यातील कंपाउंडर साठे यांना दवाखाना तर चालू आहे मग फोनवर नर्सनी दवाखाना २२ मार्चपर्यंत बंद का आहे असे का सांगितले? असा प्रश्न उपस्थित केला असता ते जाऊ द्या तुमचे काम काय आहे ते सांगा असे असे म्हणत साठेंनी त्रास कमी होईल म्हणून लास्टर सैल करून देत त्या दोघांना घरी पाठवले. तर १७ मार्च रोजी दुर्गेश झोपेतून उठतच माझ्या पायामध्ये काहीतरी हालचाल जाणवत आहे असे वाटते की माझा पाय कोण कापून नेला आहे असे म्हणत जोरजोराने रडू लागला. त्यावर मातेने पायाला हात लावून विचारले की काही संवेदना जाणवतात का तर मुलगा म्हणाला की काहीच संवेदना जाणवत नाही. त्यामुळे भारंबे दांपत्याने त्यांच्या मुलाला बुरहानपुर येथील डॉ. सुबोध बोरले यांच्या दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी प्लास्टर कापले व तुमच्या मुलाचे ट्रीटमेंट चुकीचे झाले असून लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल नाहीतर तुमच्या मुलाच्या पायात इन्फेक्शन होईल व पाय कायमस्वरूपी कामातून जाईल असे सांगण्यात आले. त्यानुसार ऑपरेशन झाल्यानंतर २२ मार्च रोजी मुलाला सुट्टी देण्यात आली. तर सद्यस्थितीत त्या मुलावर योग्य औषध उपचार सुरू असल्याची बाब मातेने सांगितली. माझ्या मुलाला म्हणजेच दुर्गेश ला दिनांक 13 मार्च रोजी डॉक्टर चोपडे यांनी दाखल करून घेतले होते तेथे त्यांनी काळजी व सहानुभूतीपूर्वक योग्य उपचार केला नसल्याने माझ्या मुलाची तब्येत बिघडली होती आणि त्याच डॉक्टर राहुल चोपडे यांचा बेजोदारपणाची वृत्तीत कारणीभूत असून या पकानात तातडीने चौकशी करून त्यांच्यावर FRI दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी त्या मातेने निवेदनाद्वारे केली आहे. मलकापूर शहरात बेजबाबदार डॉक्टरांची संख्या वाढत असून महिन्याकाठी किमान सहा ते आठ रुग्णांना जीवन संपवावे लागते रुग्ण कोणत्याही समाजाचा असो अगर जातीचा असो अशा प्रकरणात एका विशिष्ट जातीचा डॉक्टर असलेल्या नेत्याच्या मदतीने प्रकरण निपटल्या जाते आणि हे उघड असताना पोलीस प्रशासनाकडून कोणताही FRI नोंदवल्या जात नाही ही आश्चर्याची बाब आहे."बॉक्स"*डॉक्टरांची "मेडिकल निग्लीजन्स" ची गय केली जाणार नाही- दिपक चांभारे पाटील* गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील बऱ्याच रुग्णांना डॉक्टरांच्या "मेडिकल निगलिजन्स" मुळे शारीरिक, आर्थिक ,मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच काय तर अनेकांचे जीव सुद्धा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र यानंतर मलकापूर तालुक्यातील कुठल्याही रुग्णासोबत डॉक्टरांकडून बेजबाबदार किंवा निष्काळजीपणाने उपचार केला गेल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आक्रमक होणारं असुन रुग्णांना न्याय मिळेल तोपर्यंत आम्ही लढा देऊ असा दिलासा दिपक चांभारे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0