Showing posts from August, 2024

जिल्हा न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरणबुलडाणा, दि. 24 : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात कोनशिलेचे अनावरण केले.यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, औरंगाबाद मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके, न्यायमूर्ती अविनाश घारोटे, न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती श्री. सुर्यवंशी, न्यायमूर्ती श्री. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधिश स्वप्नील खटी यांच्यासह वकील संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमापूर्वी न्यायमूर्ती श्री. गवई यांना पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. दरम्यान देऊळगाव राजा येथील न्यायाधीश शैलशे कंठे यांचे निधन झाले. त्यामुळे सहकार विद्या मंदिर येथे आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आला. न्यायाधीश श्री. खटी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी श्री. कंठे यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानंतर न्यायमूर्ती श्री. गवई यांनी शोक भावना व्यक्त केल्या. उपस्थितांनी दोन मिनीटे मौन पाळून श्री. कंठे यांना श्रद्धांजली वाहिली.

कुलदीप जंगम यांचे पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना गंभीर निर्देशविद्यार्थी -विद्यार्थिंनींच्या सुरक्षेचा मुद्दा संवेदनशिलतेने हाताळा बुलढाणा (प्रतिनिधी), दि. २३ :- जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय महत्वपूर्ण असून सर्व शाळांमधून त्यासाठीच्या सुरक्षात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज शिक्षण यंत्रणेतील सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रस्तुत विषयी असंवेदनशील असणाऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही शाळा व्यवस्थापनाची गय केल्या जाणार नाही, असा सज्जड इशारा सुध्दा कुलदीप जंगम यांनी दिला आहे. अलिकडच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सुमारे २४७० शाळांमधून शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्यादृष्टीने काटेकोर अंमलबजावणीसाठी आज जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख इत्यादी पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी हे दिशानिर्देश दिले. बैठकीस प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ, योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली ठग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरीष्ठ अधिव्याख्याता डॉ. समाधान डुकरे, उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन, आशिष वाघ व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत पुढे बोलतांना कुलदीप जंगम यांनी सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेचे शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयाकडे लक्ष वेधून शाळानिहाय विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या सुरक्षात्मक उपायोजनांचा आपल्या कार्यक्षेत्रात त्वरीत आढावा घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच सर्व शाळांमधून सखी सावित्री समिती गठीत करून या समितीच्या माध्यमातून शाळेतील सुरक्षात्मक उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थी-पालकांसाठी तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे किंवा नाही? असल्यास त्याव्दारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही होते किंवा नाही? याबाबत पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा दिले आहेत. ज्याशाळांमध्ये तक्रार पेटी निदर्शनास आली नसेल त्यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सुध्दा त्यांनी निर्देशित केले. शालेय परिसरात कुठल्याही अपप्रवृत्तींना थारा मिळणार नाही व वेळीच वेसण घातल्या जाईल यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा महत्वपूर्ण असल्याने सर्व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून व शाळा परिसरातील मोक्याच्या ठिकाणी एक महिना कालावधीच्या आत पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली स्थापित करण्याचे निर्देश सुध्दा कुलदिप जंगम यांनी दिले आहेत. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना इजा पोहचवतील अशा कुठल्याही प्रकारच्या अपप्रवृत्ती निदर्शनास आल्यास कठोर पावले उचलण्याबाबत त्यांनी सांगितले. तसेच दिनांक २१ ऑगष्ट रोजीच्या शासननिर्णयाप्रमाणे सुरक्षात्मक उपायोजनांच्या कोटकोर अंमलबजावणी बाबत त्यांनी निर्देशित केले आहे. पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने सर्व शाळांना भेटी देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सुध्दा त्यांनी दिले आहेत.

*राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचा निवेदनातून ~देण्यात~ आला चक्काजामचा इशारावर्धा (मारोती महाकाळकर) दिनांक 20/8/2024 ला मारोती महाकाळकर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात जिल्हा अधिकारी साहेब वर्धा यांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने शासन निर्णय प्रमाणे आमदार व खासदार निधी खर्च करण्याबाबतचे निवेदन तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिव्यांग कल्याण निर्वाह भत्ता मध्ये 60 70 टक्के ची अट न लावता सरसकट 40% दिव्यांग पासून दिव्यांग कल्याण निर्वाह भत्ता वाटप करण्यात यावा असे आज निवेदन देण्यात आले दहा ते बारा दिवसांमध्ये मागण्या निकाली न काढल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे**निवेदन* *देतेवेळी* जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर जगदीश देवतळे सतीश भाऊ गोळकार हिंगणघाट तालुकाध्यक्ष महेंद्र ईखार सचिन भजभुजे तालुका सचिव देवराव चापले अनता निमजे सेलू तालुका अध्यक्ष वामन चौधरी युवराज माणिककर राजू भट राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते

*दि.२२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा नायगांव तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा**ई पिक पाहणी रद्द करावी आणि पीक विमा देण्यात यावा यासाठी शेतकरी स्वतःच्या अर्जाद्वारे मुख्यमंत्र्यांना करणार मागणी ..*दि.२०/०८/२४. - नायगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे. राज्यकर्ते जातीपाती व धर्मामध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे द्यावे यासाठी पक्षविरहित,पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन शेतकरी- शेतमजूर हक्क समितीच्या वतीने दि.२२ ऑगस्ट गुरुवारी सकाळी १० वाजता हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत.या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत१) ई -पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपये देण्यात यावे.२) खरीप हंगाम २०२३ काळातील पिक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा.३) तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे.४) किसान सन्मान योजना ७/१२ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी.५) शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज देताना सिबील अट रद्द करावी.६) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्यात यावा. ६) वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि वन्यप्राण्यामुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे ही भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी.हा शेतकऱ्याचा आसूड मोर्चाची जनजागृती करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभाग अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे देगांवकर ,शेतकरी पुत्र श्याम वडजे, युवा नेतृत्व गजानन चव्हाण, छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी तालुक्यातील गावा -गावात जाऊन मोर्चाला येण्याचे आवाहन केले. या मोर्चाला येत असताना सर्व शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा अर्ज, भाकर -भाजी व पाण्याची बॉटल सोबत घेऊन यावी असे सांगण्यात आले आहे.

*दि.२२ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचा नायगांव तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा**ई पिक पाहणी रद्द करावी आणि पीक विमा देण्यात यावा यासाठी शेतकरी स्वतःच्या अर्जाद्वारे मुख्यमंत्र्यांना करणार मागणी ..*दि.२०/०८/२४. - नायगाव तालुक्यासह राज्यातील शेतकरी सरकारच्या धोरणामुळे मेटाकुटीला आलेला आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण ठरले आहे. राज्यकर्ते जातीपाती व धर्मामध्ये सामान्य जनतेचे भांडणे लावून शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व शेतकरी पुत्रांनी सरकारचे लक्ष आपल्या मागण्याकडे द्यावे यासाठी पक्षविरहित,पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन शेतकरी- शेतमजूर हक्क समितीच्या वतीने दि.२२ ऑगस्ट गुरुवारी सकाळी १० वाजता हेडगेवार चौकातून नायगाव तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढणार आहेत.या मोर्चामध्ये पुढील मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत१) ई -पीक पाहणी नोंद रद्द करून सरसकट कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे ५ हजार रुपये देण्यात यावे.२) खरीप हंगाम २०२३ काळातील पिक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा.३) तीन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्यात यावे.४) किसान सन्मान योजना ७/१२ ज्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना लागू करावी.५) शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज देताना सिबील अट रद्द करावी.६) स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला खर्चाच्या दीडपट भाव देण्यात यावा. ६) वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि वन्यप्राण्यामुळे शेतीचे जे नुकसान झालेले आहे ही भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी.हा शेतकऱ्याचा आसूड मोर्चाची जनजागृती करण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर, किसान ब्रिगेडचे विभाग अध्यक्ष डॉ. दत्ता मोरे देगांवकर ,शेतकरी पुत्र श्याम वडजे, युवा नेतृत्व गजानन चव्हाण, छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी तालुक्यातील गावा -गावात जाऊन मोर्चाला येण्याचे आवाहन केले. या मोर्चाला येत असताना सर्व शेतकऱ्यांनी आपला स्वतःचा अर्ज, भाकर -भाजी व पाण्याची बॉटल सोबत घेऊन यावी असे सांगण्यात आले आहे.

लहान व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण व इतर योजनांच्या जाहिराती सुरू कराव्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून आंदोलनाचा ईशारा --- अकोला- शासन ,प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वयाची भूमिका ठेऊन शासनाला लोकाभिमुख ठेवण्यात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या छोट्या वृत्तपत्रांकडे शासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.समतावादाचा उद्घोष करणाऱ्या शासनाकडून नेहमीप्रमाणे यावेळी सुध्दा लाडकी बहिण योजनेच्या कोट्यवधींच्या जाहिरात वितरणातून क वर्ग छोटी वृत्तपत्रे व साप्ताहिक वृत्तपत्रांना डावलण्यात आले आहे.अशा पक्षपाताचा फटका छोट्या वृत्तपत्रांना नेहमीच दिला जात असून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला मजबूत करण्याऐवजी कमकुवत करण्याचं काम म्हणजे छोट्या वृत्तपत्रांवर होत असलेला प्रचंड अन्याय आहे. हा अन्याय दुर करून क वर्ग छोट्या व साप्ताहिक वृत्तपत्रांना लाडकी बहिण योजना व इतर योजनांच्या जाहिराती त्वरीत सुरू कराव्यात.अन्यथा महाराष्ट्रातील छोट्या आणि साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रकाशक ,संपादकांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात येईल असा इशारा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी दिला आहे.या आशयाची पत्रे त्यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस व या.अजितजी पवार यांना मेल व स्टिंग पोस्ट व्दारे पाठविली आहेत.या छोट्या वृत्तपत्रांना डे सतत दुर्लक्ष मृहणजे ही वृत्तपत्रे बंद पाडण्याचं षड्यंत्र सरकारने रचलं असेल तर वृत्तपत्र सृष्टीची होणारी फार मोठी प्रतारणा आहे. विशेष प्रसिध्दी मोहिमांनंतर लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी शासनाचे रू. १९९ कोटीचे नियोजन असून ह्या सर्व जाहिराती क वर्ग छोट्या आणि साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळून हा सारा मलिदा राजकीय नेत्यांशी संबंधित मोठ्या वृत्तपत्रांच्या घशात टाकला जात आहे.मग छोट्या वृत्तपत्रांनी शासकीय योजनांच्या बातम्या छापून शासनाला शहरी व तळागाळात आणि ग्रामीण भागात प्रसिध्दी देत रहायचे आणि जाहिरातींचे फायदे मात्र मोठ्या वृत्तपत्रांनी लाटायचे? ही चुकीची बाब अन्याय आणि पक्षपात लोकशाही शासन प्रणालीत संविधानिक प्रणाली आणि समतावादाने वाटचाल करणाऱ्या शासनाला कमीपणा आणणारी आहे. असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. या गंभीर सत्याचा विचार करून लाडकी बहिण योजनेच्या जाहिराती छोट्या क वर्ग आणि साप्ताहिक वृत्तपत्रांना त्वरीत सुरू करण्यात याव्यात.यानंतरच्या जाहिराती सुध्दा या वृत्तपत्रांना नियमित मिळाव्यात.अन्यथा महाराष्ट्रातील समस्त संपादक प्रकाशकांना सोबत घेऊन या अन्यायाविरूद्ध तिव्र आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचा ईशारा देण्यात आला आहे.==========================.

बम बम भोले च्या गजरात नांदुरा नगरी दुम दुमली नांदुरा नगरीची मानाची कावड मानल्या जाणाऱ्या शिव ग्रुप मानाची कावड यात्रा यांनी पवित्र श्रावण मासा निमित्त दिनांक 19/8/24 सोमवार रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात कावड यात्रा काडण्यात आली या वेळेस मलकापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेश भाऊ एकडे यांचा हस्ते कावड पूजन करून आरती करतात आली या वेळी मा.नगर सेवक लाला भाऊ इंगळे मा.नगर सेवक निलेश भाऊ कोलते , प्रणव दादा एकडे या मान्यवरांनी कावडचे पूजन करून कावड यात्रेला सुर्वात करण्यात आली कावड यात्रा गांधी चौक , मार्गाने जळगाव गेट रस्त्यांनी पवित्र पूर्णा नंदीचे जल आण्या साठी पोचले परत गजानन महाराज मंदिर येरडी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तेथून यात्रा नांदुरा नगरीत प्रवेश करते वेळेस ठीक ठिकाणी कावडचे मोठ्या उत्सवात फुलांची उधळण रांगोळ्या काडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले शिवाजी स्कूल समोर शिव भक्त साठी अल्पोपहार ठेवण्यात आला होता कावड मध्ये विशेष आकर्षण म्हणून हनुमान जी यांचा देखावा व बाबा महाकाल यांचा देखावा विशेष आकर्षण ठरला पाऊस सुरू असताना सुधा नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती मानाची कावड यात्रा यांचे वर्षी 14 व वर्ष होते पुढे कावड यात्रा छ्त्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे गांधी चौक रस्त्याने संत जंगली महाराज मंदिर येथील देवादी देव महादेव यांचा जलअभिषेक करून महाआरती करण्यात आली कावड यात्रे चे नियोजन -:निकेतन वाघमारे,योगेश पांडव ,तुषार जूनगडे, गणेश जामोदे,गुड्डू राठोड,रुपेश विंचनकर, शिवा कवडे, आकाश इंगळे, कार्तिक काजळे , गौरव टेंभुर्णी , प्रथमेश चांडक ,सागर इंगळे , अमोल फंदात ,प्रतीक जुनगडे, संतोष जुनगडे, यांचा सह अनेक शिव भक्त सहभागी होते या वेळी शिव ग्रुप समिती कडून निकेतन वाघमारे यांनी पोलिस प्रशासनाने विशेष आभार वेक्त केली

• लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांनी होणार . तानाजी व्यायम शाळा सचिव ओंकारआप्पा तोडकर यांचेवतिने राष्ट्रीय शाळेत अन्नदान,• ३५०० विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरासह विविध कार्यक्रमखामगाव : लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.    महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांची ता. २१ ऑगस्ट रोजी जयंती आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सर्वप्रथम  येथील सिद्धविनायक टेक्निकल कॅम्पस येथे लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी खामगाव मतदार संघाचे आमदार ऍड. आकाश फुंडकर, सागर फुंडकर, फुंडकर परिवार तसेच नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने न. प. अंतर्गत येणाऱ्या पहिली ते पाचवी शाळेतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा शुभारंभ येथील शाळा क्रमांक ६ मधे आमदार अड,आकाश फुंडकर यांच्या हस्ते होईल. प्रगतीचा एकच मंत्र, शिक्षण घेणे हेच तंत्र उपक्रमांतर्गत पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक किट दिल्या जाणार आहे. त्यानंतर शिवाजी नगर भागातील मराठा समाज सभागृह येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांसाठी भव्य मोती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भाजपा तसेच रोटरी क्लब खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर मार्फत नेत्र तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. १०.३० वाजता भाजपा अल्पसंख्याक आघाडी यांच्या वतीने खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप , सकाळी ११ वाजता भाजपा विधानसभा प्रमुख संजय शिनगारे यांचे तर्फे लॉयन्स अन्नछत्रच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातलगांना अन्नदान व सायंकाळीं ५.३० वाजता भाजपाचे जेष्ठ नेते शत्रुघ्न पाटील यांचे तर्फे शिवनेरी लंगर सेवेच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातलगांना भोजन वाटप करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात भाजप युवा मोर्चाच्या अनेक शाखांचे उद्घाटन आमदार आकाश फुंडकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागर फुंडकर यांचे हस्ते होणार आहे.तसेच तानाजी व्यायाम शाळेचे सचिव ओंकार आप्पाजी तोडकर यांचे मार्फत सकाळी 11 वाजता टिळक राष्ट्रीय विद्यालय येथे भोजन वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी खामगाव मतदार संघाच्या वतीने करण्यात आले आहे

*मुख्यमंत्री शिंदेंनी महाराजांची बाजू घेतल्याने मुसद्दीख खान यांचा शिंदे सेनेस जय महाराष्ट्र* (बिड )....शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक युवक जिल्हाप्रमुख मुसद्दीख खान यांनी पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लाम आणि पैगंबरांबद्दल अर्वाच्य वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजाचा कैवार घेत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या तसेच सत्याला सोडून चुकीची साथ देत असल्याबद्दल शिंदे सेनेच्या पदाचा राजीनामा देत जय महाराष्ट्र केला आहे.मुसद्दीख खान हे गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून शिवसेनेत शिंदे गटाच्या अल्पसंख्यांक युवक जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. पक्षासाठी त्यांनी चांगली भरीव कामगिरी केली होती. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाला तसेच तरुण पिढीला पक्षासोबत जोडण्याचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने केले होते. परंतु नुकतेच उपद्व्यापी रामगिरी महाराजांनी इस्लाम आणि पैगंबरांबद्दल नको ते बरडल्याने इस्लाम धर्मासह पैगंबरांची विटंबना झाली आहे. यात महाराज दोषी असताना सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांची बाजू घेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे वक्तव्य केले. यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून जो निष्पक्षपणा मुख्यमंत्र्यांकडे असायला हवा तो त्यांनी दाखविला नाही तसेच सर्व धर्म समभाव या नीतीवर ते अंमलबजावणी करत असल्याचे दिसत नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत यापुढे शिंदे सेनेच्या पदावर राहणे शक्य नसल्याचे सांगत अल्पसंख्यांक युवक जिल्हा प्रमुख पदावर राहणे इस्लाम, पैगंबर आणि एक मुसलमान म्हणून शक्य नसल्याने आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे मुसद्दीख खान यांनी म्हटले असून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

*बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री नवयुवक मानाची कावड यात्रा हर हर महादेवाच्या गजरात शिवलिंगावर पवित्र जलाभिषेक*खामगाव:- श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मराठी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी निमित्त काल दि१८ऑगस्ट २४ रोजी रात्री ८ वाजता कावडधारी श्री नवयुवक मानाची कावड यात्रेचे अध्यक्ष राहुल कळमकार यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्र येरळी पुर्णा.येथून पवित्र जल आणण्याकरिता कावडधारी पायी रवाना झाले होते तर आज दि १९ऑगस्ट २४ रोजी सकाळी खामगांव शहरात दाखल झाले व शहरातील मुख्य पाच मंदिरामध्ये शिवलिंगावर हर हर महादेवाच्या गजरात पवित्र जलाभिषेक करण्यात आला या कावडयात्रेत शिवभक्त विक्की धारपवार, अमोल उंबरकर, गोपाल धारपवार, योगेश रेड्डी,विनोद गवई, निलेश विल्हेकर, आशिष सावंत, विक्की विल्हेकर, राहुल दामोदर,रुद्राक्ष कळमकार,कृष्णा मेहरा,संकेत भारसाकळे,यांचा सहभाग होता यावेळी अध्यक्ष राहुल कळमकार,प्रकाश गायकवाड,मोहन खुळे,दीपक गायकवाड,अंकित पुरवार,सागर जामोदे, विक्की बाबुळकर, राहुल नाटेकर,रवि ठोसर,विरू राजपूत, आशिष धापा, नितिन राणा, विठ्ठल भडागे, कैलास माहुरे,आदी मंडळाचे पदअधिकारी व कावडधारी,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा -मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी*** तेल्हारा हिवरखेड येथील हॉलिफेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी सी.आर.पी.एफ चे माजी हेड कॉन्स्टेबल श्री सुरेश जी निंबोकार होते. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ अस्वार मॅडम यांच्या हस्ते सीआरपीएफचे सैनिक सुरेश निंबोकार यांचा शाॅल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गावचे पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे डॉ.प्रशांत इंगळे डॉ. रामदास धुळे जगन्नाथ महाकाळ देवेंद्रजी राऊत अरुण रहाणे डॉक्टर तारापुरे वार्ताहार मनोज भगत श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे सर तेलगोटे सर गवागुरु मॅडम हागे मॅडमभड सर गावातील जेष्ठ नागरिक पालक वर्ग याची प्रमुख उपस्थिती होती.या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे दिले. देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेडल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ. कल्पना अस्वार मॅडम यांना सुद्धा इंडियन टॅलेंट ऑल्मपियाड मधून बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड देण्यात आला. शिक्षिका सौ शितल शेळके मॅडम यांना बेस्ट टीचर अवार्ड मिळाला .सोबतच कुऱ्हाडे मॅडम यांना सुद्धा बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना अस्वार मॅडम यांनी केले तर संचालन पल्लवी फोपसे मॅडम व सीमा रहाटे मॅडम यांनी केले . प्रमुख अतिथी डॉक्टर प्रशांत इंगळे यांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांची प्रगती मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले त्यानंतर भारत सरकार च्याअध्यादेशानुसार नुसार तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली. शेवटी आभार शितल शेळके मॅडम यांनी केले .तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम, शितल अग्रवाल मॅडम, प्रज्ञा गवई मॅडम ,पुनम मानकर मॅडम, सोनू कुऱ्हाडे मॅडम, सिमा सोनोने मॅडम, प्रतिभाताई वायकर, कुमुदिनी ताई ठेंगेकर ,मनीष ताळे आदींच्या आदींनी परिश्रम घेतले.

स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खामगाव : श्री छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जयहिंद लोकचळवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यात 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता श्री महादेव मंदिर सुटाळा बुद्रुक येथे स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या हस्ते रुद्राभिषेक केला जाणार आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित राहतील. तदनंतर सुटाळा खुर्द ग्रामपंचायत मध्ये सकाळी 9 वाजता स्वर्गीय संजय ठाकरे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठाकरे परिवाराकडून देण्यात आलेल्या वॉटर चिलरचे लोकार्पण होईल आणि सुटाळा खुर्द ग्रामपंचायत मध्ये प्रथमच घंटागाडी ग्रामस्थांच्या सेवेत रुजू करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता सुटाळा खुर्द ग्रामपंचायतच्या ह भ प तुळशीराम महाराज वानखडे कमान गेटचे उद्घाटन वानखडे परिवारातील सदस्य आणि स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उपरोक्त सर्व कार्यक्रमांना माजी जिल्हा परिषद सदस्य सीमाताई ठाकरे, सरपंच निलेश देशमुख, उपसरपंच जयेश वावगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती राहणार आहेत.यानंतर सावजी लेआउट मधील श्री उदासी बाबा मंदिरात सकाळी 10 वाजता भव्य हृदयरोग तपासणी शिबिर होईल आणि वृक्षारोपण केले जाणार आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी केली जाईल. तसेच एन्जिओप्लास्टी,बायपास ई.सी.जी., शुगर, बी.पी., आर.बी.एस.,युरीक अॅसीड, एच.बी., कॅलेस्ट्रॉल,पि.एफ.टी, हे सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. डॉ. निखिल संजय ठाकरे हे रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सीमाताई ठाकरे, स्वप्निल ठाकरे पाटील, सरपंच निलेश देशमुख उपसरपंच जयेश वावगे त्यांच्यासह नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळात स्वप्नील ठाकरे पाटील हे श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यालयात उपस्थित असतील. तरी हृदयरोग तपासणी शिबिर तसेच सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री छत्रपती प्रतिष्ठान खामगाव व जय हिंद लोकचळवळ बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

*आय एम ये चा देशव्यापी संपात खामगाव डॉक्टरांचा सहभाग..* *उद्या शनिवारी सर्व वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन..*९ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेज, कोलकाता येथे एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थीनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आधीच संप सुरू केला आहे. आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत.या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. आर जी कार महाविद्यालय प्रशासन व पोलिस यांच्या संगनमताने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.१५ ऑगस्ट २०२४ रोजी, आरजी कार मेडिकल कॉलेजला मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यावेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.*या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवा बंदीचा आवाहन कले आहे..* अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा सुरू राहतील. पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील.इंडियन मेडिकल असोसिएशन सर्व देशवासीयांना या गुन्ह्यातील पीडित महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांस न्याय मिळवून देण्यासाठी या संपास समर्थन देण्याची विनंती करते आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करुन कायद्या बदल करण्याचा आग्रह केंद्रशासनाकडे करत आहे.

*आरती हातरांळकर PSI पदी नियुक्त झाल्याने गजानन पा चव्हाण मित्रपरिवाराच्या वतीने सन्मान* *तालुका प्रतिनिधी*दिनांक 15/08/2024 रोजी गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यलय येथे मोजे मिनकी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांची लाडकी लेक यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) आरती कैलास हातराळकर आपले शिक्षण व कौटुंबिक संघर्षाने झुंज देत एक्झाम दिल्या होत्या घवघवीत देश संपादक करून पी एस आय पदी नियुक्ती झाले सन्मान करत असताना उपस्थित कर्मवीर भाऊराव पा चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते गजानन शंकरराव पा चव्हाण, राष्ट्रीय महासंघ मराठा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पा पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन पा तमलूरे, छावा संघटनेचे ता अध्यक्ष प्रताप सोमठाणकर, छावा तालुका संघटक साईनाथ पा मोरे, कैलास गोविंद हातराळकर,गणेश इंगोल,बालाजी इंगोले, शंकर पवार, माधवराव पवार, गंगाधर हजारे, विशाल कैलास, माधवराव जानोरे नरसीकर, सह विविध क्षेत्रातील मान्यवर उस्थितीत होते

खामगाव येथे वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डॉ नितीश अग्रवाल यांना मिळाला ध्वजारोहण करण्याचा मानखामगाव: वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, खामगाव येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व फॅक्टरी मॅनेजर श्री. मिलिंद वैद्य यांनी केले. ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नितीश अग्रवाल उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी बोलताना डॉ.नितीश अग्रवाल यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून आजच्या तरुण पिढीला देशाचे भविष्य म्हणून प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या भाषणात तरुणांनी राष्ट्र उभारणीत पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले.कार्यक्रमास जनरल मॅनेजर श्री. भाऊसाहेब शेळके, सेफ्टी मॅनेजर श्री. अतुल साकळकळे व इतर मॅनेजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटी कु. वैष्णवी लांडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता मनोरंजक खेळ व कवितेद्वारे करण्यात आली.

दिव्यांगांनी बोंबा मारत दिले मंञालयाला निवेदनदिव्यांग भव्य क्रांतीचा हल्लाबोल मुंबई : (अशोक चव्हाण )दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्रराज्य या संघटनेचे मुंबई मंत्रालयावर दिनांक 14 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता दिव्यांग बांधव यांच्या न्याय हक्काच्या मागण्या प्रलंबित असणाऱ्या मान्य करण्याकरता बोंबाबोंब आंदोलन केले या आंदोलनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्याय मंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतली व दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य केले आहेत या नंतर दिव्यांग भव्य क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी उपाध्यक्ष अल्ताफ काजी विभागीय अध्यक्ष रंगनाथ मुटकुळे पूजा मॅडम प्रकाश कुरडे तसेच हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्ते हिंगोली जिल्हा अध्यक्ष यांना जिल्ह्यातील कार्यकर्ते सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा उस्मानाबाद औरंगाबाद यवतमाळ धुळे लातूर बारामती येथील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनेउपस्थित होते मागण्या मान्य केल्यानंतर सर्व दिव्यांग बांधवांनी आंदोलन मागे घेतले व माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजित दादा पवार यांचे व आजाद मैदान पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांचे आभार मानले दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांनी सर्व दिव्यांग वंदू आणि बहिणी यांचे आभार मानले आणि विजय काका कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की माझ्या दिव्यांग बांधवाचा हक्क चोरणाऱ्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी करणारा आला कदाचित सोडणार नाही तसेच दिव्यांग बांधवाला ६००० पेन्शन झालीच पाहिजे दिव्यांग बांधवाच्या अनाथ दिव्यांग आश्रमासाठी शासकीय जमीन वाटप केलीच पाहिजे दिव्यांग बांधवाला विना घरकुल मिळालेच पाहिजे दिव्यांग बांधवांच्या घरकुलासाठी ग्रामपंचायत गावठाणा मधील एक गुंठा जागा घरकुल बांधण्यासाठी मिळालीच पाहिजे असेच अनेक काही प्रलंबित असणाऱ्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव असेच सामाजिक न्याय मंत्र्याचे सचिव यांच्याशी काल दिनांक १४ ऑगस्ट रोजी चर्चा झाली व मागण्या मान्य करणेचे पत्र संघटनेला देण्यात आले.

*मोबाईल राहलेला आहे*खामगाव÷विना सिम व कुठलिच माहिती नसलेला कोणीतरी अज्ञात ईसम आपल्या दिव्यांगत्व वा ईतर कामाने कार्यलयात आलेल्या पैकी म्हणजे बुधवार दि.१४/०८/२०२४ पासुन विसरलेला आहेतो मोबाईल रेडमी कंपनीचा मोबाईल ज्याचा डिव्हाईस नंबर *रेडमी A 3* माॅडल २३१२९RN51H असा आहेहा मोबाईल सा. दिव्यांग शक्ती कार्यलय खामगाव जि.बुलढाणा ऊपलब्द आहेजो कोणी विसरला असेल त्यांनी मोबाईल चा IMEI कोड तसेच IMEI SV कोड दर्शविणारे दुकानदाराचे बिल घेऊन यावे व मोबाईल साठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यन्त कार्यालयीन वेळेत पंधरा दिवसात घेऊन जावा असे दिव्यांग शक्तीच्यावतिने कळविण्यात आले आहे

तेल्हारा येथे शोककळातेल्हारा (संध्या ताथोड) तेल्हारा जिल्हा अकोला येथील काही माहेश्वरी समाजाची कुटुंबे बद्रीनाथ आणि केदारनाथच्या दर्शनासाठी धार्मिक यात्रेसाठी गेले होते. काल दि. 13/08/2024 मंगळवारी रात्री श्रीनगर गढवाल (उत्तराखंड) येथे एका अनियंत्रित ट्रकने जेवण झाल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या काही महिला प्रवाशांना चिरडले, त्यात तेल्हारा येथील रहिवासी श्री हरिशजी टावरी, त्यांची पत्नी *100 ललिता भाभी टावरी* आणि श्री नरेंद्रजी भैया यांचा समावेश होता. , त्यांची पत्नी *100 गौरी भैया* यांचे जागीच निधन झाले. तसेच एकाच गटातील तीन ते चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. तेल्हारा शहरावर कोसळलेल्या या सामुहिक दु:खाच्या घडीमध्ये संपूर्ण समाज सर्व कुटुंबीयांच्या पाठीशी उभा असून दिवंगत आत्म्याला आश्रय देवो व कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थनातर गौरी भैय्या या खामगाव येथील प्रसिद्ब अधिवक्ता तरुण मोहता यांच्या भगिनी आहेत त्यामुळे खामगाव येथिल महेश्वरी समाजानेही दु:ख व्यक्त केले आहे

दिव्यांगांचा पाच टक्के निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा सौ संध्याताई ताई ताथोड तेल्हाराप्रतिनीधीसंपुर्ण राज्यात आदेशित असलेला वार्षिक दिव्यांग स्वनिधी ५% वाटपाचे धोरण आहे या धोरणाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायती करत आहे याची ओरड संपुर्ण राज्यातिल कानाकोपर्‍यातील गाव तांड्यावर चालु असते यावर आता प्रहार संघटना लढा देत असतांनाच दिनांक 12 / 8/ 2024 ला तेल्हारा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी दिव्यांगांचा 5% निधी 15 ऑगस्ट च्या आधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा अन्यथा उपोषणाला बसू असे निवेदन प्रहार अपंग संस्थेच्या अकोला ऊपजिल्हाध्यक्ष सौ.संध्याताई ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राणे साहेब यांना देण्यात आले निवेदन देते वेळेस प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला उपजिल्हाप्रमुख सौ संध्याताई उद्धवराव ताथोड व प्रहार तेल्हारा उपप्रमुख सौ छायाताई दीपक इंगळे प्रहार हिवरखेड शाखाप्रमुख स्वप्निल भाऊ खंडेराव .राजूभाऊ वानखडे. दिलीप भाऊ इंगळे विजय भाऊ नागे आदी दिव्यांग उपस्थित होते

"तिरंगाचा सन्मान व्हावा या करिता अभाविप चे खामगांव तहसीलदारांना निवेदन "खामगांव -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७६ वर्षा पासून अविरतपणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे हे आपण जाणताच.वर्तमान मध्ये आपला ७७ वा स्वातंत्र दिन आपण आनंदाने व उत्साहाने संपूर्ण भारत देश साजरा करत आहे. वर्तमान मध्ये ध्वजाचा अपमान होत आहे लहान मुले, पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते, सामान्य व्यक्ती हे १५ आॉगस्ट ला ध्वज खरेदी करतात व त्यांचा उपयोग झाल्या नंतर हे रस्त्याच्या कडेला, मैदानावर, कचरा पेठी मध्ये टाकले जातात. विद्यार्थी,छोट्या मुलांच्या हातुन तिरंगा ध्वज खाली पडतात व पायदळी जातात अशी परिस्थिती निर्माण न व्हावी व अशी सूचना शाळा, विद्यालय प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना द्याव्या. प्लॅस्टिक च्या ध्वजा वर विक्रीस बंदी असावी. तसेच वापरण्यावर प्रतिबंध असावा. आपणांस विनंती आहे की प्रशासनाने शाळा, विद्यालय,महाविद्यालय सामाजिक प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालयं आपले सूचना पत्र द्यावें.त्यावेळी तहसीलदारांनी लवकरात लवकर प्रतिबंध लाऊ व प्रशासनाला कळऊ असे म्हटले आहे. यावेळी. जिल्हा सयोजक ॠषीकेश वाघमारे, नगर मंत्री गणेश कठाळे, नगर सहमंत्री आनंद निकाळजे,पार्थ वराडे,सुयोग चंद्रे,प्रथमेश कोहळे, कार्तिक नेमाने,ओम काळे,शुभम राठोड, सानिका राठोड, वैष्णवी जावरकर,साक्षी करवते आदी अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते

पत्रकार गणेशोत्सव मंडळाची कार्यकारणी गठीतसमितीच्या अध्यक्षपदी गणेश पानझाडे तर सचिव मुबारक खानखामगाव - संपुर्ण राज्यात जल्लोषात साजरा केला जाणारा गणेशोत्सव याहीवर्षी पत्रकार गणेश उत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने दि.९ ऑगस्ट रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे बैठक पार पडली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार शरद देशमुख तर अशोक जसवानी, योगेश हजारे, गणेश उत्सव समिती चे माजी अध्यक्ष अनुप गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वानुमते पत्रकार गणेशोत्सव समिती २०२४ च्या अध्यक्षपदी गणेश पानझाडे, उपाध्यक्ष किरण मोरे, सुनिल गुळवे, सचिव मुबारक खान, कार्याध्यक्ष आनंद गायगोळ, सहसचिव आशिष पवार, कोषाध्यक्ष सुमित पवार, सहकोषाध्यक्ष गणेश भेरडे, संघटक मोहन हिवाळे, सहसंघटक शिवाजी भोसले, प्रसिध्दी प्रमुख सिध्दांत उंबरकार, सल्लागार किशोरआपा भोसले, प्रशांत देशमुख, शरद देशमुख, योगेश हजारे, अशोक जसवानी, जगदीश अग्रवाल, राहुल खंडारे, पंकज गमे व कार्यकारणी सदस्य म्हणून शेख सलीम, अमोल गावंडे, मोनु शर्मा, सुधिर टिकार, सैयद अकबर, आकाश पाटील, महेंद्र बनसोड, निखिल देशमुख, कुणाल देशपांडे, मुकेश हेलोडे, सुरज बोराखडे आदींची नियुक्ती करण्यात आली. यानंतर मागिल वर्षीच्या समितीने झालेला खर्चाचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. या बैठकीला असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. चौकट -स्वखर्चाने होणार गणेश उत्सव साजरासदर उत्सव सहा दिवसांचा साजरा होणार असून पत्रकार भवन येथे गणरायाची स्थापना तसेच उत्सवादरम्यान वृक्षरोपण, पत्रकार बांधवांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प, नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, कवी संमेलन यासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उत्सव पत्रकार बांधव स्वखर्चाने साजरा करणार असून पत्रकारांव्यतीरिक्त कुणाकडूनही देणगी स्विकारल्या जाणार नाही. तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.

*.. तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील विधानसभेची उमेदवारी देऊ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पत्रकार परिषदेत दिव्यांग संघटनेचे नेते तथा पत्रकार राहुल साळवे यांच्या प्रश्नावर उत्तर* नांदेड -( माधव शिंदे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व्हेक्षण देखील करण्यात येत आहे.काँग्रेस पक्ष हा कुठलीही जात, धर्म, पंथ असा कुठलाही भेदभाव न करता उमेदवारी देणारा पक्ष आहे. त्यामूळे त्यामध्ये दिव्यांगांनी मागणी केली तर काँग्रेसकडून दिव्यांगांना देखील निश्चितपणे विधानसभेची उमेदवारी देऊ, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मालेगाव रोड येथील भक्ती लाॅन्स येथे आयोजित तीन जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्ताने प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,सभागृनेते बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार.माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसिम खान,खासदार वसंतराव चव्हाण आदिसह अन्य काही मान्यवरांची पत्रकार परिषद नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आयोजित करण्यात आली होती. यावेळी दिव्यांग संघटनेचे नेते तथा पत्रकार राहुल साळवे यांनी पाहिलाच प्रश्न उपस्थित केला असता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यावर उत्तर देताना बोलत होते.

Load More
That is All