स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन खामगाव : श्री छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, जयहिंद लोकचळवळीचे बुलडाणा जिल्हा समन्वयक स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 20 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.स्वप्नील ठाकरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकोपयोगी कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यात 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता श्री महादेव मंदिर सुटाळा बुद्रुक येथे स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या हस्ते रुद्राभिषेक केला जाणार आहे. याप्रसंगी परिसरातील नागरिक उपस्थित राहतील. तदनंतर सुटाळा खुर्द ग्रामपंचायत मध्ये सकाळी 9 वाजता स्वर्गीय संजय ठाकरे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठाकरे परिवाराकडून देण्यात आलेल्या वॉटर चिलरचे लोकार्पण होईल आणि सुटाळा खुर्द ग्रामपंचायत मध्ये प्रथमच घंटागाडी ग्रामस्थांच्या सेवेत रुजू करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता सुटाळा खुर्द ग्रामपंचायतच्या ह भ प तुळशीराम महाराज वानखडे कमान गेटचे उद्घाटन वानखडे परिवारातील सदस्य आणि स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उपरोक्त सर्व कार्यक्रमांना माजी जिल्हा परिषद सदस्य सीमाताई ठाकरे, सरपंच निलेश देशमुख, उपसरपंच जयेश वावगे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती राहणार आहेत.यानंतर सावजी लेआउट मधील श्री उदासी बाबा मंदिरात सकाळी 10 वाजता भव्य हृदयरोग तपासणी शिबिर होईल आणि वृक्षारोपण केले जाणार आहे. या शिबिरात हृदयरोग तपासणी केली जाईल. तसेच एन्जिओप्लास्टी,बायपास ई.सी.जी., शुगर, बी.पी., आर.बी.एस.,युरीक अॅसीड, एच.बी., कॅलेस्ट्रॉल,पि.एफ.टी, हे सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. डॉ. निखिल संजय ठाकरे हे रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य सीमाताई ठाकरे, स्वप्निल ठाकरे पाटील, सरपंच निलेश देशमुख उपसरपंच जयेश वावगे त्यांच्यासह नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळात स्वप्नील ठाकरे पाटील हे श्री छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यालयात उपस्थित असतील. तरी हृदयरोग तपासणी शिबिर तसेच सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री छत्रपती प्रतिष्ठान खामगाव व जय हिंद लोकचळवळ बुलढाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0