• लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांनी होणार . तानाजी व्यायम शाळा सचिव ओंकारआप्पा तोडकर यांचेवतिने राष्ट्रीय शाळेत अन्नदान,• ३५०० विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरासह विविध कार्यक्रमखामगाव : लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची जयंती विविध सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.    महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते स्वर्गीय पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांची ता. २१ ऑगस्ट रोजी जयंती आहे. या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी सर्वप्रथम  येथील सिद्धविनायक टेक्निकल कॅम्पस येथे लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी खामगाव मतदार संघाचे आमदार ऍड. आकाश फुंडकर, सागर फुंडकर, फुंडकर परिवार तसेच नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीच्या वतीने न. प. अंतर्गत येणाऱ्या पहिली ते पाचवी शाळेतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटपाचा शुभारंभ येथील शाळा क्रमांक ६ मधे आमदार अड,आकाश फुंडकर यांच्या हस्ते होईल. प्रगतीचा एकच मंत्र, शिक्षण घेणे हेच तंत्र उपक्रमांतर्गत पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक किट दिल्या जाणार आहे. त्यानंतर शिवाजी नगर भागातील मराठा समाज सभागृह येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांसाठी भव्य मोती बिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भाजपा तसेच रोटरी क्लब खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर मार्फत नेत्र तपासणी करून आवश्यक त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. १०.३० वाजता भाजपा अल्पसंख्याक आघाडी यांच्या वतीने खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप , सकाळी ११ वाजता भाजपा विधानसभा प्रमुख संजय शिनगारे यांचे तर्फे लॉयन्स अन्नछत्रच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातलगांना अन्नदान व सायंकाळीं ५.३० वाजता भाजपाचे जेष्ठ नेते शत्रुघ्न पाटील यांचे तर्फे शिवनेरी लंगर सेवेच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातलगांना भोजन वाटप करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी खामगाव शहरात भाजप युवा मोर्चाच्या अनेक शाखांचे उद्घाटन आमदार आकाश फुंडकर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक सागर फुंडकर यांचे हस्ते होणार आहे.तसेच तानाजी व्यायाम शाळेचे सचिव ओंकार आप्पाजी तोडकर यांचे मार्फत सकाळी 11 वाजता टिळक राष्ट्रीय विद्यालय येथे भोजन वाटप करण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी खामगाव मतदार संघाच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post