*मुख्यमंत्री शिंदेंनी महाराजांची बाजू घेतल्याने मुसद्दीख खान यांचा शिंदे सेनेस जय महाराष्ट्र* (बिड )....शिवसेना अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक युवक जिल्हाप्रमुख मुसद्दीख खान यांनी पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लाम आणि पैगंबरांबद्दल अर्वाच्य वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजाचा कैवार घेत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या तसेच सत्याला सोडून चुकीची साथ देत असल्याबद्दल शिंदे सेनेच्या पदाचा राजीनामा देत जय महाराष्ट्र केला आहे.मुसद्दीख खान हे गेल्या वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून शिवसेनेत शिंदे गटाच्या अल्पसंख्यांक युवक जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. पक्षासाठी त्यांनी चांगली भरीव कामगिरी केली होती. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाला तसेच तरुण पिढीला पक्षासोबत जोडण्याचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने केले होते. परंतु नुकतेच उपद्व्यापी रामगिरी महाराजांनी इस्लाम आणि पैगंबरांबद्दल नको ते बरडल्याने इस्लाम धर्मासह पैगंबरांची विटंबना झाली आहे. यात महाराज दोषी असताना सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांची बाजू घेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असे वक्तव्य केले. यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून जो निष्पक्षपणा मुख्यमंत्र्यांकडे असायला हवा तो त्यांनी दाखविला नाही तसेच सर्व धर्म समभाव या नीतीवर ते अंमलबजावणी करत असल्याचे दिसत नाही. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत यापुढे शिंदे सेनेच्या पदावर राहणे शक्य नसल्याचे सांगत अल्पसंख्यांक युवक जिल्हा प्रमुख पदावर राहणे इस्लाम, पैगंबर आणि एक मुसलमान म्हणून शक्य नसल्याने आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे मुसद्दीख खान यांनी म्हटले असून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post