दिव्यांगांचा पाच टक्के निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा सौ संध्याताई ताई ताथोड तेल्हाराप्रतिनीधीसंपुर्ण राज्यात आदेशित असलेला वार्षिक दिव्यांग स्वनिधी ५% वाटपाचे धोरण आहे या धोरणाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायती करत आहे याची ओरड संपुर्ण राज्यातिल कानाकोपर्यातील गाव तांड्यावर चालु असते यावर आता प्रहार संघटना लढा देत असतांनाच दिनांक 12 / 8/ 2024 ला तेल्हारा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी दिव्यांगांचा 5% निधी 15 ऑगस्ट च्या आधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा अन्यथा उपोषणाला बसू असे निवेदन प्रहार अपंग संस्थेच्या अकोला ऊपजिल्हाध्यक्ष सौ.संध्याताई ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राणे साहेब यांना देण्यात आले निवेदन देते वेळेस प्रहार दिव्यांग क्रांती संस्था अकोला उपजिल्हाप्रमुख सौ संध्याताई उद्धवराव ताथोड व प्रहार तेल्हारा उपप्रमुख सौ छायाताई दीपक इंगळे प्रहार हिवरखेड शाखाप्रमुख स्वप्निल भाऊ खंडेराव .राजूभाऊ वानखडे. दिलीप भाऊ इंगळे विजय भाऊ नागे आदी दिव्यांग उपस्थित होते
byदिव्यांग शक्ती
-
0