शिवसेना दोन्ही तालुका प्रमुख भिडले विजयाच्या दाव्यासाठीखामगाव ( का.प्र.) बुलढाणा लोकसभेसाठी शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना हा काॅग्रेस,भाजप, राष्ट्रवादी मिञ पक्ष यांच्या सहकार्याने बुलढाणेकरांच्या अकरा तालुक्यांनी अनुभवला या निवडणुकीच्या लढाई मध्ये गद्दार खोके निष्ठावंत फेकु विधायक कामात कामचुकार एकाच माणसाच्या वलयाचा आधार आदी विषयाचा शिवसेना ऊद्वव ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी वातावरण तयार केले यासाठी करावी लागलेली कसरत काॅग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कट्टर निष्ठावंत शिवसैनिक भाजपा मधिल दुरावलेला मतदार विकासाचा समतोल यावर फोकस करित खामगाव तालुका शिवसेना (ठाकरे) प्रमुख विजय ऊर्फ बंडु बोदडे यांनी संभाळलीतर ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची असतांना त्यांना यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काॅग्रेसपक्षाच्या नेत्यांचे तसेच मिञपक्षांचे सहकार्य मार्गदर्शन त्यांना मिळाले शिवसेना (शिंदे) तालुका प्रमुख राजेंद्र बधे यांनी १५वर्षात काय काय विधायक कामे आमच्या ऊमेदवाराने संसदेत केली व काय करणार आहे यावर फोकस करित मंदिर कलम,३७०,शेगाव रेल्वे थांबा, ईतर कामांचा आधार घेत चौकार साठी हि निवडणुक लढविली यासाठी त्यांचा असलेला व्यतीगत मिलनसार संपर्क तसेच भाजपच्या विधान सभेतील सर्व बुध यंञणेचा लाभ पदरी पाडत ही निवडणुक पार पाडली तर यासाठी मार्गदर्शक म्हणुन आमदार आकाश फुंडकर यासह मिञपक्षाच्या नेत्यांचे सहकार्य मार्गदर्शन लाभलेआता येत्या काळात दोन्ही गट शिवसेनेचे शिलेदार बंडु बोदडे व राजु बधे यांच्या परिश्रमाचा म्हणजे ४जुन ला त्यांच्या विजयाचे दावे प्रतिदावे चा निकाल लागेल कोण बाजीगर होणार हे ठरणार

Post a Comment

Previous Post Next Post