*सत्कार नव्हे तर सत्कार्य करून केमिस्ट कोहिनूर मा श्री अनिल भाऊ नावंदर यांचा वाढदिवस साजरा**विविध सामाजिक उपक्रमाने आदरणीय भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा* खामगाव बुलडाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा श्री गजाननजी शिंदे व सचिव मा श्री रामचंद्रजी आयलानी यांच्या नेतृत्वाखाली व मा श्री राजेन्द्रजी नहार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात 11 मे रोजी मा श्री अनिल भाऊ नावंदर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलासेवासंकल्प प्रतिप्ठान, पळसखेड सपकाळ येथे खामगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आवश्यक असलेला किराणा सामान, गहु , तांदूळ, तेल साखर, दाळ , बिस्किटे, मसाले ,फळे व साबण इतर वस्तू अश्या अंदाजे 64,000 हजार रुपयांचा संकल्प होता. तो त्यांना वाढदिवसानिमित्त भेट म्हणुन देण्यात आला. यामध्ये , जळगाव जामोद, बुलढाणा ,चिखली देऊळगाव राजा येथील सभासदांनी सुद्धा भरीव योगदान दिलेचिखली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने ग्रामदेवता रेणुकामाता ला पातळ चढवुन भाऊंच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली व तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली ला धान्य व किराणा सामान भेट म्हणुन दिले.बुलढाणा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यात 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले. बुलढाणा शहर संघटनेने वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला अक्षयतृतीया च्या शुभमोहर्तावर गोरक्षण धाम बुलढाणा येथे गायींसाठी चारा , ढेप , कुटार देऊन सत्कार्य केले.जिल्हात बुलढाणा, धाड , शेगाव , पातुर्डा , मोताळा संग्रामपूर , डोणगाव मध्ये फळवाटप , धान्यवाटप , आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आलेसंग्रामपूर,जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शाळा , बालसंस्कार केंद्र व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अनेक आदिवासी शाळेत लहान बालकांना अन्नदान, शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलेनांदुरा येथे मतदान जागृती अभियान, गरजु विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.मेहकर , लोणार सिंदखेडराजा, देऊळगाव मही येथे विविध उपक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलाकेमिस्ट कोहिनूर मा श्री अनिल भाऊ नावंदर हे सतत समाजाला काही ना काही देत रहातात त्यांचा आदर्श घेऊन बुलढाणा जिल्हाने त्यांच्या वाढदिवसाच्या सामाजिक बांधिलकी जपत सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य, तालुका/शहर अध्यक्ष- सचिव , पदाधिकारी व केमिस्ट सभासदांनी एक आदर्श निर्माण केला

Post a Comment

Previous Post Next Post