सुषमा अंधारे अर्ज भरण्यासाठी बुलढाण्यात येणार वासनिक येण्याची शक्यता!बुलढाणा..(का.प्र.)शिवसेनेची वाघीण सुषमाताई आता बुलढाण्यात धडकणार! बुलढाणा लोकसभा - इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना उपनेत्या मा.सुषमाताई अंधारे येत आहेत. गुरुवार दि.04 एप्रिल 2024 | वेळ :- सकाळी 11.00 वा. स्थळ : जिजामाता प्रेक्षागार जवळील, नाट्य क्रिडा मंडळाचे खुले मैदान, (विश्रामगृहाजवळ) बुलढाणा.येथे आयोजीत केली आहे.या साठी ईंडिया आधाडीचे सर्व आमदार,माजी आमदार,जिप माजी सदस्य,पस माजी सदस्य,मा.नगरसेवक,सरपंच सदस्य,क्रुषी बाजार समिती सदस्य,खरेदी विक्री संघ सदस्य,महाविकास आधाडीचे पदाधिकारी,सदस्य आदी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहणार आहेत तर अर्ज भरतेवेळी खासदार तथा माजी केंद्रीय मंञी मुकुल वासनिक हे सुध्दा राहण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0