विश्वकर्मा योजनेत टेलर वा बांधकाम कामगार १५ हजार किट मधुन वगळले खामगाव :(व्रुत्तसेवा ) विश्वकर्मा योजनेला १७ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक कारागिरांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कारागिरांना १५ हजारांची साधन किट मिळते. मात्र, या योजनेमध्ये टेलर व बांधकाम कामगारांचा समावेश नसल्याने या योजनेचा लाभ मिळणार नाही. देशातील विविध पारंपरिक १८ क्षेत्रांमध्ये कार्यरत कारागिरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या क्षेत्रांमध्ये सुतारकाम, नौकाबांधणी, चिलखतकार, लोहार, हातोडी व हत्यारे बनवणारे, चाव्या बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, बुरुडकाम, पारंपरिक खेळणी बनवणारे, न्हावी, पुष्पहार बनवणारे, धोबी, शिंपी, मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणारे यांचा समावेश करण्यात आला आहे. विश्वकर्मा योजनेत लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिदिन ५०० रुपयांचे विद्यावेतन, प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी १५ हजार रुपये दिले जातात. मात्र प्रशासनाने टेलर आणि बांधकाम कामगारांना याअंतर्गत स्थगिती दिली आहे. ही योजना औपचारिक सूक्ष्म, लघुूआणि मध्यम उद्योग परिसंस्थेत 'नवउद्योजक' म्हणून साहाय्य ठरेल. पीएम विश्वकर्मा पोर्टलवरआधार-आधारित प्रमाणिकरणासह बायोमेट्रिक सामान्य सेवा केंद्रांद्वारे लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.१८ पारंपारिक क्षेञात १८ वर्षावरिल असलेले कारागिर याचा लाभ घेणार आहेत तर शिलाई मशिनसाठी असंख्य महिलांनी आपली नोंद केली आहे हे विशेष
byदिव्यांग शक्ती
-
0