*आंगणवाडी सेविकाकडे पडुन आहेत अर्ज**लाडकी बहिण पाहत आहे १५००/-₹ ची वाट*खामगाव.(महादेव पांडे) महाराष्ट्र राज्याने लोकप्रियतेचा गाजावाजा करित महिलांना आपल्या सरकार कडे आर्कषित करण्याच्या हेतुने मुख्यमंञी लाडकी बहिण योजना घोषीत केली या योजनेतुन २,५०,०००/-रुपये पेक्षा कमी ऊत्पन्न् असलेल्या कुटुंबातील महिला वर्गाला १५००/- रुपये प्रतिमाह अनुदानाची घोषणा करण्यात आली या योजनेचे अर्ज आंगणवाडीसेविका,ग्रामपंचायत,नगरपरिषद स्तरासह मोबाईल च्या माध्यमातुन अर्ज मागविण्यात आले याची पंचायत स्तरावर छाननी करित ञुटीतील अर्ज वगळुन अर्ज निकाली काढण्यात येऊन प्रायोगिक स्तरावर म्हणजेदि.०३/०८/२०२४ला सिल्लोड (छञपती संभाजीनगर) काही रुपये वर्ग करण्यात येत असतांनाच यामाध्यमातुन लाभार्थी लाडकी बहिणीच्या राखी पोर्णिमापर्यन्त त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेया योजनेकरीता आॅनलाईन केल्यानंतरची कागदपञे संबधित विभागासह आंगणवाडीसेविका यांच्याकडे जमा करण्यात आले,परंतु या सेविकांना कागदपञे कुठे जमा करावी याविषयी मार्गदर्शन नसल्यामुळे ०२/०८/२०२४ पर्यन्त जमा झालेली कागदपञे कोणाकडे द्यावीत याची माहिती वा सुचनाच प्राप्त नसल्याचे एका आंगणवाडी सेविकाताईने सांगितले!यामुळे ज्या लाडकी बहिणींनी कागदपञे देऊन पैसे खात्यात येतील कि नाही अर्जात काही ञुटी आहे का? नाव,गाव,आधार,बॅकेचा खाते क्रमांक,जन्म तारिख आदी व्यवसाथित आहे का नाही याविषयी शंकाकुशंका निर्माण होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post