*प्रशासक व रिश्वतखोर! सचिव यांच्या कारभाराची गावात खमंग चर्चा* *कारवाईकडे लक्ष* खामगाव÷ ( मधुकर पाटील ) खामगाव तालुक्यातील शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत जयपुर लांडे येथील प्रशासक, सचिव यांच्या कारभाराची मनमानी भ्रष्टाचार कागदपत्रे विकासच्यानावाने असलेल्या लाखो रुपयाच्या घोळ प्रकरणी गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याचे पहावा यास मिळत आहे जयपुर लांडे येथील ग्रामपंचायत सदस्य तक्रारदार सौ. वैशाली मंगेश तायडे यांनी दिनांक 4. 11. 2023 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भाग्यश्री विसपुते यांच्याकडे प्रशासक सचिव यांच्या भ्रष्टकारभारावर वर कार्यवाही करित तडकाफडकी निलंबनाची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती त्यावर खामगाव गटविकास अधिकारी यांनी चौकशी अधिकारी नेमून 30. 11. 2023 रोजी ग्रामपंचायत जयपुर लांडे येथे तपासणीसाठी भेट दिली होती त्यावेळेस अभिलेखे तपासणीसाठी सादर करण्यात यावे असे सुचविले होते परंतु तत्कालीन ग्रामपंचायत सचिव कुमारी क्षिरसाठ व प्रशासक घुगे यांनी अभिलेखे ऑडिट करता गेलेले आहेत असे खोटे सांगून वेळ मारून नेली होती परंतु याविषयी संबंधित तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी स्मरणपत्र क्रमांक एक ने जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याकडे पुनश्चा तडका फडकी कार्यवाहिचे कळवित निलंबनाची मागणी केली होती त्यावर खामगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सचिव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेशित केले होते या अखेर शेवटी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तक्रार कर्त्या ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक 19 एप्रिल रोजी एका निवेदनाद्वारे ०१ मे महाराष्ट्र दिनापासुन बेमुदत उपोषणाची नोटीस स्मरण पत्र देत दिली होती याची प्रशासनाने दखल घेऊन दिनांक 29 एप्रिल रोजी एका पत्राद्वारे तक्रार करतेस आश्वासित पत्र तात्काळ निर्गमित केले त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र दिन,कामगार दिवस असल्यामुळे ऊपोषण करतेस चौकशी कामे प्रशासनास सात दिवसाचा कालावधी द्यावा त्यानंतर आपणास न्याय न मिळाल्यास आपण लोकशाही मार्गाने उपोषण करू शकाल असे आश्वासित केले त्यामुळे तक्रारदार त्या ग्रामपंचायत सदस्य यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले प्रशासनाने अजूनही या प्रकरणावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याचे दिसून येत असल्याने यामध्ये कुठे पाणी मुरत तर नाहीना अशी खमंग चर्चा जयपुर ग्रामपंचायत खामगाव सह संपुर्ण बुलढाणा जिल्ह्यात होत आहे तर तक्रारदार ग्रामपंचायत सदस्या या ऊपोषणावर ठाम असल्याची व लवकरच ऊपोषणासह लोकशाही मार्गाने आंन्दोलनावर कायम असल्याचे सांगितले आहे तर चौकशी अधिकारी यांनी सांगितले कि तपासणीची प्रक्रिया सुरु असल्याने लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कार्यवाही करणार असल्याचे सांगितले य ाप्रकरणामधिल ग्रामसेविका या जयपुर गावामध्ये तक्रारकर्त्यांच्या घरी जाऊ प्रकरण मिटविण्यासाठी सहकार्य करण्याचे करावे यावर भ्रष्टकारभार करणार्‍या ग्रामसेविका दबाव टाकण्यासाठी आली असल्याची याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या तक्रारदार सदस्या तायडे यांनी याविषयी पोलिस प्रशासनाला मोखिक कळविल्याचे माहीती मिळाली तर यातील गावाच्या विकासाचा असलेला निधी अपहार प्रकरणातील काही रक्कम पैकी १,७६,२५०/-रुपये आज भरला असल्याची माहिती मिळाली आहे तर यामधिल ग्रामसेविका क्षिरसाठ या गोळेगाव खुर्द ता.शेगाव येथे घरकुलच्या प्रकरणामध्ये ५०००/-रुपयाची लाच घेतली असता साफळा रचत पकडण्यात आले होते हे विशेष...

Post a Comment

Previous Post Next Post