*बजाज नगर मध्ये दिव्यांगाची मतदानासाठी जनजागरण रॅली* छ.संभाजीनगर (पारसचंद साकला) आज दिनांक 30 एप्रिल रोजी बजाज नगर मध्ये परिसरातील सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींनी मतदान जनजागृती साठी भव्य असी रॅली काढून स्वतः दिव्यांग 100% मतदानाचा हक्क बजावणार आहेत तसेच समाजातील इतर लोकांना सुद्धा मतदान करण्यासाठी दिव्यांगांनी बजाज नगर मध्ये रॅली काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला दिव्यांग बांधवांच्या सायकली दहा, दिव्यांगांच्या चार चाकी स्कुटी व अनेक वाहन या रॅलीमध्ये होते हि रॅली जागृत हनुमान मंदिर बजाज नगर इथून निघून भाजी मंडई मार्गे त्रिमूर्ती चौक हायटेक कॉलेज महाराणा प्रताप येथे विसर्जीत झाली ह्या रॅलीसाठी खास उपस्थित समाज कल्याण अधिकारी वाघ साहेब उपस्थित होते ते स्वतः रॅलीमध्ये सामील झाले रॅलीच्या समारोपा मध्ये दिव्यांगाच्या मतदानासाठी असलेल्या अडीअडचणी दिव्यांगाचा 12 डी नंबर फॉर्म भरून घेणे व दिव्यांगाला मतदानासाठी सर्व सुख सुविधा देणे या सर्व गोष्टीची माहिती दत्ता वाकडे यांनी समाज कल्याण अधिकारी ह्याच्यासमोर मांडल्या श्री वाघ साहेब यांनी सर्व दिव्यांगांना मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले व सर्वतोपरी ते मदत करतील त्याचबरोबर बजाज नगर विभागात असलेले मतदानासाठी नेमलेले बीएलओ यांच्याशी त्यांनी संपर्क करून दिला त्यांनी सर्व दिव्यांगाना शुभेच्छा दिल्या सशक्त माणूस करू शकत नाही असे एवढं मोठं काम मतदान जनजागृतीचं आज बजाज नगर मध्ये दिव्यांगाने केले आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारसचंद साकला, दत्ता वाकडे, किशोर फेगडे,डॉ. संकपाल ,बद्रीनाथ लघाने ,दत्तू लघाने ,शिवाजी दांगट राजे एकनाथ किर्तीकर यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून मेहनत घेतली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाज कल्याण अधिकारी वाघ साहेब, जोतीराम जाधव,गणेशआहेर ,सुनिताहिवर्डे,शिवकन्या,आशा सारडा,संरोजा भोसले, सुभाष पाईकराव, जैस्वाल,दिलीप कदम साहेब,अडसूळ साहेब ,विनोद पाटील, माणिक कुंभार,संजय फलटणे, शिवाजी राऊत शेलगावकर, प्रदीप माळी, दशरथ मात्रे, शिवानी वाकडे, मीराघुमरे,सास्ते महाराज ,उज्वला फेगडे ,सुनिता कदम ,कोमल झिंजुर्डे, भंडारी साहेब, नारखेडे, हर्षाली वाकडे, योगीराज तळेकर, सुनिता कदम,तसेच बजाज नगर परिसरातील असंख्य दिव्यंग बांधवांची उपस्थिती होती
byदिव्यांग शक्ती
-
0