सालगाव रेवलगाव मधील दारू बंद .. ग्रामपंचायत ठराव केला मंजूर ..परतुर ( शेख फेरोज ) तालुक्यातील सालगाव रेवलगाव येथे ग्रामसभा भरवण्यात आली होती त्या ठरावा मध्ये पुढाकार घेतला 1. मसाजी साहेबराव ठोके 2. नाजम शबीर सय्यद यानी तसेच सालगाव रेवलगाव येथील सर्व गावकरी यांनी सह्या करून आपला दारू बंदीला विरोध केला. मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलिस ठाणे आष्टी यांनाही एक निवेदन दिले तसेच उपविभागीय अधिकारी साहेब परतूर यांनाही प्रत दिली आहे ... गावातील तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे यावर कठोर पावले उचलून दारू विकणारी व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्यात यावा असे नाही केल्यास समस्थ गावकरी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये उपोषण करू असा ईशारा पत्राद्वारे देण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post