*अग्निवीर योजना बंद करणार*समाजवादी पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्धउत्तर प्रदेश:(लखनौ) उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपला अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. अग्निवीर योजना समाप्त करून नियमित भरती, महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण, गरीब महिलांना मासिक ३ हजार पेन्शन, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक ५ हजार पेन्शन, २०२४ च्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची हमी, मुलींना पदव्युत्तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण,तरुणांना लॅपटॉप देणार, मनरेगातील काम करणार्यांना मजुरी ४५० रुपयांपर्यंत वाढणार., सर्व शासकीय विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार,राशनच्या गव्हाच्या जागी दळलेले पीठ दिले जाईल.• प्रत्येक कुटुंबाला ५०० रुपयांचा मोबाइल डेटा देण्याचे समाजवादी पार्टीच्या जाहिरनाम्यात प्रसिद्ध केले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0