*आ अँड फुंडकर यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा* खामगाव ( का.प्र.)*भाजपाच्या वतीने ईदगाह मैदानावर करण्यात आले मुस्लिम बांधवांचे स्वागत* *खामगाव*::- आ अँड आकाश फुंडकर यांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदान येथे जाऊन पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज शहरालगतच्या सजनपूरी येथील ईदगाह मैदानावर आज 11 एप्रिल रोजी सकाळी पार पडली. ईदगाह मैदानावर भाजपाच्या वतीने नमाज अदा करण्यासाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नमाज अदा केल्यानंतर आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना आलिंगन देत आ अँड आकाश फुंडकर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित ,खामगाव विधानसभा विस्तारक डॉ एकनाथ पाटील, विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, तालुकाध्यक्ष विलास काळे, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख पवन गरड ,शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय अवताडे, जितेंद्र पुरोहित, वैभव डवरे , इद्रिससर ,वासिक सर , सर,अनिस जमादार ,राजेश शर्मा ,प्रकाश टिकार, वसंता वानखडे ,प्रतीक नांदोकार ,भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष अजहर मुस्ताक, फईम राजा, सजनपुरी चे सरपंच मुज्जू भाई, इमरान खान, जावेद खान , आयाज खान , आरिफ बेग,शेख राजू ,रहीम खान ,शेख सादिक आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा नमाज अदा केल्यानंतर आलेल्या मुस्लिम बांधवांचे स्वागत करून त्यांना पवित्र रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.
byदिव्यांग शक्ती
-
0