विवाह मतदानाची पञीका आकर्षक चर्चेचा विषय ...... * *मतदानपञीकेची सोशल मिडीयावर धुम** खामगाव मतदान जनजाग्रुती करिता मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता विविध फंडे आजमाविण्यात येत आहे त्यातीलच विवाह सोहळे चालु असल्याने भन्नाट शक्कल लढवित मतदान जनजाग्रुती करिता विवाह प्रतिकाचे साधर्म्य असलेली पञिका दुसरा टप्प्याचे मतदानाविषयी असलेली सोशल मिडीयावर फिरत आहेत्यामध्ये।। मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय ।।।। आग्रहाचे निमंत्रण ।।श्री./सौ.रा.रा.चि. मतदार भारतीय नागरीकांचा ज्येष्ठ चिरंजीवचि. सौ.का.लोकशाही भारतीय संविधानाची ज्येष्ठ सुकन्या।। शुभविवाह ।।चैत्र कृ. २ शुक्रवार दि.२६ एप्रिल २०२४ रोजी, सकाळी ७:०० ते सायं. ५:०० या शुभ मुहूर्तावर लोकसभा-२०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदान रुपी आशिर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा यासाठी हेची निमंत्रण अगत्याचे..!।। आपले विनित ।। आम्ही भारताचे लोक वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं... आमच्या शिवाय तर मज्जाच नाही.. कु.निळीशाई । चि.ई.व्ही.एम.आपले मतदान केंद्र ।। स्थळ ।।टिप : आपले मतदान हाच आमचा आहेर अण् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असे या पञीकेत नमुद केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post