लोकनेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालयात "भाजपा स्थापना दिन" साजरा बुलडाणा:-(गणेश सोनुने) भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 अप्रिल 1980 रोजी भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांची मिळून झाली. आज पक्षाचा 45 वा स्थापना दिवस असल्याने बुलडाणा येथे भाजपा लोकसभा प्रमुख मा.आमदार विजयराजजी शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय "शिवालय" येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरा झाला. भारतीय जनता पक्षाच्या उभारणी व विचारधारेत ज्यांचे भरीव योगदान आहे अश्या भारतीय जन संघाचे संस्थापक स्व.श्यामाप्रसादजी मुखर्जी, पंडित दिनदयाल उपाध्याय व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे विजयराजजी शिंदे यांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी "भारतीय जनता पक्षाचा विजय असो" , "भारत माता की जय" आदी घोषनांनी कार्यालय परिसर दणानून गेला होता. यावेळी बोलताना मा.आमदार विजयराजजी शिंदे यांनी बोलताना सांगितले की ,"भारतीय जनता पक्षास गौरवशाली व संघर्षशिल इतिहास आहे. पक्षाच्या अनेक महापुरुषांच्या परिश्रमातुन विशाल अश्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.पक्षाची राष्ट्रवादाची विचारधारा व अंत्योदय सिद्धांत यांच्या आधारावर पक्ष जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेला आहे तसेच पंत प्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात येणाऱ्या काळात देश "आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल यांत शंका नाही" असे मत व्यक्त केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री दीपक वारे, कामगार मोर्चा प्रदेश सचिव श्री विश्राम पवार, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री दत्ता शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री पुरषोत्तम लाखोटीया, गणेश देहाडराय, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, डॉ आनंद रिंढे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महादेव शिराळ, ज्ञानेश्वर राजगुरे, ऍड दशरथसिंग राजपूत, श्री अनंता शिंदे, शेख रशिद, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष कुलदीप पवार, महिला जिल्हा सरचिटणीस सौ उषाताई पवार ,महिला उपाध्यक्ष सौ अल्काताई पाठक, महिला शहराध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर, प्रशांत भोरसे, माजी नगरसेवक मुन्ना बेगानी, प्रदीप सोनटक्के, किरन नाईक, ई कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.".
byदिव्यांग शक्ती
-
0