*चिंचपूर येथे कळस स्थापना सोहळा व रामकथा सप्ताह चे आयोजन* चिंचपूर :-(अनंता शेळके) श्रृंगऋषी संस्थान चिंचपूर येथील पुरातन महादेव मंदिराचे बांधकाम (जिर्णोद्धार) नुकतेच पुर्ण झाले असून मंदिरावर कळस स्थापनेचा कार्यक्रम श्री हरिचैतन्यजी सरस्वतीजी महाराज ( पळसखेड आश्रम) यांच्या कृपाआशिर्वादाने व परम पुज्य श्री स्वामीजी रामभारती महाराज (कैलास आश्रम चांगेफळ) यांचे शुभ हस्ते दिनांक 15 एप्रिल 2024 सोमवार ला संपन्न होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आमली बारस निमित्त श्री.ह.भ.प रामकृष्ण महाराज ठाकरे (नाथबुवा देऊळगाव सा.) यांच्या अमृत वाणीतुन रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 13 एप्रिल 2024 शनिवारी महादेव मंदिरात नवीन आणलेल्या नंदी व कळसाची गावातून भव्य सांप्रदायिक नगर परिक्रमा (मिरवणूक) काढण्यात येणार आहे. दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी श्रृंग ॠषी संस्थान चिंचपूर येथे पुरातन महादेव मंदिरात 21 जोडप्यांच्या हस्ते महापूजा व होम हवन करण्यात येणार आहे.व दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी महादेव मंदिरात नंदी व कळसाची विधीवत स्थापना करण्यात येणार आहे. दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महादेव पार्वती विवाह सोहळा होणार आहे. दिनांक 17 एप्रिल 2024 बुधवार रोजी प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.व दिनांक 20 एप्रिल 2024 शनिवार रोजी रामकथेची सांगता व श्री.ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज दोडे (पिंप्री कोळी) यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. तरी सदर कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी चिंचपुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
byदिव्यांग शक्ती
-
0