*नासिक सिविल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या शिबिरात जिल्ह्यातील 230 दिव्यांगांना रेल्वे सवलत प्रमाणपत्र चा लाभ* *श्री रामदासजी खोत साहेब संपर्कप्रमुख तथा महासचिव महाराष्ट्र राज्य प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट् यांच्या मार्गदर्शनाने* *सिन्नर तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे सर्व पदाधिकारी व नाशिक जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे सर्व पदाधिकारी यांच्या विचाराने**सिन्नर प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांच्या अथक प्रयत्नाने नाशिक जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी सिव्हिल हॉस्पिटल नासिक येथे रेल्वे सवलत प्रमाणपत्र आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कार्याध्यक्ष संदीप आव्हाड यांनी वर्तमानपत्र व व्हाट्सअप द्वारे सर्व दिव्यांग बांधवांना रेल्वे सवलत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला साथ देत सिन्नर तालुका निफाड तालुका नाशिक रोड चांदवड नाशिक तालुका पेठ सुरगाण येथील सर्व दिव्यांग नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी नऊ वाजता तपासणीसाठी जमा झाले या शिबिरासाठी नासिक तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ कागणे यांनी सर्व दिव्यांग बांधवांना नाष्ट्याची व पाण्याच्या बॉटल ची सोय केली होती या शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर दुधाडिया डॉक्टर कुटे डॉक्टर नायडू आगवणे साहेब निर्मला मॅडम श्रीमती कविता जुने जा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अगदी सूक्ष्म असे नियोजन करून 230 दिव्यांग रेल्वे सवलत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले रेल्वे सवलत प्रमाणपत्र शेवटच्या दिव्यांगापर्यंत मिळण्यासाठी प्रयत्न केला हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी कार्याध्यक्ष संदीप आव्हाड ही सकाळी नऊ ते सायंकाळी सात पर्यंत सिविल हॉस्पिटल येथे उपस्थित होते याप्रसंगी दिव्यांग अनिल बोराडे साहेब दत्ता बोराडे साहेब व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते*
byदिव्यांग शक्ती
-
0