*दिव्यांग (पी.डब्ल्यू.डी आयकॉन) म्हणून वैभव गजानन संबारे नियुक्त*. ......खामगांव (ऊमाका) लोकसभा निवडणूक २०२४ ची पूर्व तयारीच्या दृष्टीने २६ खामगांव विधानसभा मतदार संघामध्ये Systematic Voters Education And Electoral Participation (SVEEP) चे व्यापक जनजागृती व प्रसिध्दीसाठी PWD Icon करिता नियुक्ती करण्याबाबत मा.भारत निवडणूक आयोगाचे निर्देशनुसार वैभव गजानन संबारे नियुक्त. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदार नोंदणी व जनजागृतीसाठी खामगांव विधानसभा मतदार संघाकरिता दिव्यांग (पी.डब्ल्यू.डी आयकॉन) म्हणून राज्यस्तरीय पॅरा ऑलंपिक स्पर्धा दिव्यांग क्रिडा स्पर्धेमध्ये भालाफेक-द्वितीय क्रमांक, थाळीफेक-तृतीय क्रमांक मिळवलेले खेळाडू वैभव गजानन संबारे, रा. शिवाजी नगर, सुटाळा बु. ता. खामागंव जि. बुलढाणा दि. २१ मार्च रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देवून नियुक्ती करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार विजय पाटील तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव गजानन संबारे हे राज्यस्तरीय पॅरा ऑलंपिक स्पर्धा दिव्यांग क्रिडा स्पर्धेमध्ये भालाफेक-द्वितीय क्रमांक,थाळीफेक-तृतीय क्रमांक मिळवलेले खेळाडू असून विविध खेळांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.त्यांची तालुका व जिल्हयामध्ये नामवंत खेळाडू म्हणून ओळख असून,खामगांव विधानसभा मतदार संघामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने मतदारांना आवाहन करणे, दिव्यांग व्यक्तींची जास्तीत-जास्त मतदार नोंदणी होणे व त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविणे तसेच विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये मतदान प्रक्रिये विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमामध्ये मागदर्शन करणे ई.करिता त्यांची खामगांव विधानसभा मतदार संघाकरिता दिव्यांग (पी.डब्ल्यू.डी आयकॉन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post