*बोगस अपंगाची गोची होणार**दिव्यांग गनणा होणार**तर आपले अद्यावत प्रमाणपञ तयार ठेवा*मुंबई..(प्रतिनीधी)सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात दिव्यांग व्यक्तीची संख्या (७ प्रकारानुसार) २९.६३ लाख असून एकूण लोकसंख्येच्या २.६% इतकी आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींचे २१ प्रकार निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या संख्येत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील प्रकरण ३ कलम १७(१) नुसार दर ५ वर्षांनी सर्वसमावेशक शिक्षण देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्यकता नमूद केली आहे. तसेच कायदा लागू झाल्यानंतर २ वर्षात राज्यातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचे सूचित केले आहे. त्याचप्रमाणे प्रकरण ५ कलम २ (A) नुसार राज्यशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग व्यक्तीसाठी आरोग्य सुविधा तसेच दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी उपक्रम/योजना तयार कराव्यात. त्यानुसार दिव्यांगाचे सर्वेक्षण, तपासणी आणि दिव्यांगत्वाचे कारण शोधण्यासाठी संशोधन करण्याबाबतची तरतूद केली आहे.दिव्यांगांच्या एकूण लोकसंख्येची किंवा त्यांची सामाजिक-आर्थिक स्थितीची केंद्र सरकार अथवा राज्य शासनाकडे अचूक नोंद उपलब्ध नाही. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या तपशीलवार माहितीच्या आधारे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासाकरिता (शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षा, सकारात्मक कृतीविषयक योजना) विविध उपक्रम व योजना यांचे नियोजन करुन दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. यासाठी दिव्यांगांची जिल्हा/तालुका व गावनिहाय तसेच दिव्यांगाच्या विविध प्रकारानुसार दिव्यांगाची अचूक आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जेणेकरुन दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार त्यांना शासकीय योजना तसेच अन्य सोयीसुविधा देणे सुलभ होईल. यापूर्वी राज्यात शारिरीकदृष्टया दिव्यांगांचे तालुका पातळीवर सर्वेक्षण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक ०८.०२.१९९४ रोजीच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला होता. सदर सर्वेक्षण होऊन जवळपास ३० वर्षाचा कालावधी लोटला आहे. दिव्यांग व्यक्तीकरीता योजना, कार्यक्रम, प्रकल्प याची आखणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहितीचे संकलन करणे, दिव्यांग व्यक्तीविषयक संशोधन करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींच्या समस्या गरजा ओळखणे व दिव्यांग व्यक्तींचे सर्वांगीण पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने माहिती संकलित करणे यासाठी राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याची योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पुर्वी ७प्रकार चे अपंग होते तर आता २१प्रकार दिव्यांगाचे झाले असल्यामुळे संख्या कोटी मध्ये गेली आहे यामध्ये बोगस प्रमाणपञ धारकांची धाकधुक वाढली आहे त्यामुळे हि दिव्यांग गणणा वास्तविक असलेल्यांनसाठी फायदेशीर होणार आहे
byदिव्यांग शक्ती
-
0