येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी बुलढाणा लोकसभेची निवडणूक होवू घातली आहे. मा. उध्दव ठाकरे शिवसेना पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व मा. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्ष समर्थित महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभा मतदार संघात जो कोणता उमेदवार दिल्या जाईल, त्या उमेदवाराला निवडूण आणण्याचा संकल्प घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून मंगळवार दि. २६ मार्च २०२४ रोजी सायं. ५ वाजता ग्राम कोलोरी येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या नियोजन बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणुन बाळापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. नितीनजी देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. तरी ग्राम कोलोरी येथे आयोजित नियोजन बैठकीला खामगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुखांनी, बुथ कमिटी सदस्यांनी व महाविकास आघाडीच्या सर्व संघटना सेलचे अध्यक्ष, सर्कल प्रमुख, आजी-माजी जि.प., पं.स. सदस्य, आजी-माजी नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, सोसायटी सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे कार्यक्रम हा वार मंगळवार दि.२६ मार्च २०२४ * वेळ : सायं. ५ वा. * स्थळ - कोलोरी, ता. खामगाव.येथे राहिल असे महाविकास आघाडीचे समस्त अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावतिने कळविण्यात आले आहे .
byदिव्यांग शक्ती
-
0