दिव्यांगत्वावर मात करत यशाला घातली गवसणीप्रतिनिधी- दिव्यांग व्यक्ती समोर येताच डोळ्यासमोर उभा ठाकतो त्यांचा संघर्षमय जिवन प्रवास एकीकडे दिव्यागंत्व अन् दुसरीकडे एकविसाव्या शतकात प्रत्येक सर्व सामान्य माणसाची जगन्या साठी होणारी धडपड अशा असाह्य जिवन परिस्थीत ही आजच्या स्थितीला स्वतःला सिद्ध करुन दाखवणे म्हणजे च तारेवरची कसरतच म्हणावी लागेल ह्या सगळ्या गोष्टीवर मात करत तेनीनहळच्या स्नेहल विलास नौकुडकर यांनी दिव्यांगतवावर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून स्वतःला सिद्ध करत गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली त्यांच्या ह्या कठोरमय आणि यशस्वी मय जीवनाचे सर्वत्र कौतुक होत आहे गडहिंग्लज तालुक्यातील तेगिनहाळ ह्या छोट्याशा गावी जन्मलेल्या स्नेहल यांना लाहापणीच मल्टिपल डीसाबॅलिटी हया आजराजाराणे ग्रासले या आजारात पायावरील बळ च असाह्य होत असल्याने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहणे सुधा कठिण झाले घरात अठरा विश्व दरिद्री वडिलांचा शेतीचा व्यवसाय भाऊ गावोगावी फिरून भाजी विक्रीचा व्यवसाय करतो डोळयांसमोर संकटांचा डोंगर उभा असताना सुद्धा मात्र मनाच्या अथांग शक्तीने त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचे ठरवले शरीराने जरी अपंग असलो तरी मनाने अपंग असू नये ह्या विचारांनी त्यांनी बुध्दीच्या बळावर सिद्ध करण्याचे ठरवले आणि सुरू झाला एक अभ्यासमय संघर्ष प्रवास तेनिनहळ शाळेत प्राथमिकचे शिक्षण व मुंगरवाडीच्या हायस्कूल मधून मांध्यमिकचे शिक्षण घेतल्यावर कोल्हापूरच्या महावीर कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयीन शिक्षणाच्या कालावधीत त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि उराशी खानगुठ बांधत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत यशाला गवसणी घातली नुकतीच त्यांची गटविकास अधिकारी वर्ग 1 पदावर निवड झाली आहे स्न्हेल ह्यांचे ह्या संघर्षमय व यशोस्वींमय जीवनाचे सर्वत्र कौतुक होत आहे
byदिव्यांग शक्ती
-
0