*महायुतीचा चौकार मेळावा किती लाभकारी होणार प्रतारावांसाठी*खामगाव (शेखर तायडे) बुलढाणा लोकसभेची निवडणुक मतदान २६एप्रिलला होणार आहे,यानिवडणुकीकरिता शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे)असा सरळ सामनाच होणार आहेयानिवडणुकी करिता स्थानिक मुद्यांना बगल देत राज्य व राष्ट्रीय विषयावरच निवडणुकीचे भाषणे अवलंबवुन राहतिल मागिल काळापासुन प्रलंबित असलेला खामगाव जिल्हा,जिगाव प्रकल्प रेल्वे एकिकडुन आम्ही करतोय चा आवाज निघेल तर दुसरीकडुन गद्दार, खोके,निवडणुकीसाठीच खामगाव,जळगाव दौरे असा मारा होईल परंतु रोजगार बेरोजगारी वर बोलण्याचा विसर पडल्याचेच दिसण्याची चिन्हे आहेत तर राम मंदिर,आम्ही केले तर समुद्रातील शिव स्मारक कुठे अडले हे पण विषय असतिलच बुलढाणा लोकसभेमध्ये तिसर्‍यांदा हायट्रीक साधण्यासाठी भरगच्च विजयी मतदान देणार्‍या खामगाव विधानसभेमध्ये महायुतीच्या मेळाव्यासाठी प्रमुख सहकारी पक्ष असलेला भाजप चे कार्यकर्ते किती तन मन वापरत धनाने साथ देतील यावरच प्रतापरावांचा चौकार ची मदार टिकुन राहणार आहे भाजपा बुलढाणा जिल्हा ऊपाध्यक्ष यांनी पुकारलेला बंडाचा झेंडा तर सहकारी राष्ट्रवादी (अजित) आर पि आय (आठवले) प्रहार संघटना यांच्या वरिष्ठ नेत्यांना प्रसिद्धीच्या बँनर वर सन्मान जनक स्थानच नसल्याची जाण यांच्या स्थानिक नेत्यांना या मेळाव्यात डावलल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यामधुन दिसुन येत आहे तर वार्तानकनासाठी असलेले पत्रकार हे कितपत योग्य प्रसिद्धी देतिल त्यावर हा महायुतीचा महामेळावा कितपत यशस्वी होतो हे ऊपस्थितीवरुन दिसुन येणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post