बुद्धिवादी प्रतिभा शोध परीक्षेत गौरी पाटील राज्यातून प्रथम ............ खामगाव, प्रतिनिधी: डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद व RTSE Foundation च्या वतीने बुद्धिवादी प्रतिभा शोध परीक्षेत (आरटीएसई ) येथील लॉयन्स ज्ञानपीठ ची विद्यार्थिनी गौरी सुनील पाटील हिने राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. गौरी पाटील ही इयत्ता नववी मध्ये शिकत असून तिने RTSE परीक्षा २०२४ दिली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून खामगाव येथील गौरी सुनील पाटील ही राज्यातून प्रथम आली आहे. तिला लाॅयन्स शाळेच्या प्राचार्या व शिक्षक वर्ग तसेच डिझायर कोचिंग क्लासेसचे संचालक डी. पी. दांडगे सर, विवेक दांडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आपल्या यशाचे श्रेय गौरी आपले आई वडील व शिक्षकांना देते. गौरी हिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post