नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल २.०' उपयुक्त प्रणाली - जिल्हाधिकारी किरण पाटीलबुलडाणा,(जिमाका),दि.10 : सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या तक्रारींचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल २.०' ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार , अपर पोलीस अधीक्षक खान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, प्रशिक्षक देवांग दवे, विनोद वर्मा, बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे , तहसिलदार संजीवनी मुपडे यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत प्रशिक्षक देवांग दवे यांनी माहिती दिली. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली
byदिव्यांग शक्ती
-
0