*क्रांतीदिनी विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रहार जनशक्तीचा जन आक्रोश* *राज्यस्तरीय मोर्चाचे आ.बच्चू कडू करणार नेतृत्व**सहभागी होण्याचे प्रहारचे गजानन लोखंडकार यांचे आवाहन*प्रहार जनशक्ती पक्षाचे सुप्रिमो तथा अध्यक्ष आमदार बच्चु कडू यांचे नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विविध मागण्यासाठी राज्यस्तरीय जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात बुलढाणा जिल्ह्यासह खामगांव तालुक्यातील प्रहार सेवक, आजी माजी पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रहारचे गजानन लोखंडकार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे आवाहन केले आहे. या राज्यस्तरीय मोर्चा ला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्षआ. बच्चुभाऊ कडू संबोधित करणार आहे. राज्यातील निराधार शेतकरी, दिव्यांग, विधवा, शेतमजूर आदींच्या प्रलंबित मागण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांचे नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लभाऊ जवंजाळ, यांचेसह वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग्यासह शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांनी जन आक्रोश मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन प्रहारचे गजानन लोखंडकार यांनी केले आहे.Box ह्या आहेत आक्रोश मोर्चातल्या प्रमुख मागण्यास्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तातडीने मंजुर करुन अमलबजावणी करणे.पेरणी ते कापनी पर्यंतचे सर्व कामे mregs (रोजगार हमी योजने) मार्फत करणे.नव्याने युवा धोरण व बेरोजगार युवकांसाठी किमान ५००० कोटीची तरतुद करणेशेतमजुर व प्रकल्पग्रस्तासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करणेकांदा निर्यात बंदी संदर्भात ठाम (पक्के) धोरण असावे..
byदिव्यांग शक्ती
-
0