शहरात रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे होणार गौरक्षणला जमा पशू पालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये- मुख्याधिकारी डाॅ.प्रशांत शेळके खामगाव-( मधुकर पाटिल) शहरात मोकाट जनावरांचा विषय गंभीर बनत चालला असून नगर पालीकेने शहरात रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून गौरक्षण मध्ये जमा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. तरी पशु पालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट न सोडता घरी गोठधात बांधून ठेवावी, असे आचाहन मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी केले आहे.खामगाव शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला असून यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडून बसतात. यामुळे वाहतूकीची कोंडी होते. मेनरोड, नांदुरा रोड, सरकी लाईन, आठवडी बाजार रोड, बारादरी यासह शहरातील बर्दळीच्या भागात मोकाट जनावरांमुळे रहदारीस अडथळा होतो. याचा नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान नगर पालिका प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत नगर परिषद हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रहदारीच्या व चर्दळीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून गौरक्षण संस्थानमध्ये देखभाल व संगोपनाकरीता देण्याची मोहीम हाती घेतली आहे. कालपासूनच ही मोहीम सुरु करण्यात आली असून पहिले पाच-सहा दिवस जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जनावरे पकडण्याची मोहीम सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी प्रश्नकालशी बोलतांना दिली आहे. तरी पशू पालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडून न देता घरी गोठ्यात बांधून ठेवावी, असे आवाहनही मुख्याधिकारी शेळके यांनी केले आहे
byदिव्यांग शक्ती
-
0