*खामगाव येथुन तिन ऊमेदवार*तर खामगावात काॅग्रेस एकञ बुलढाणा/खामगाव..शेखर तायडे..बुलढाणा लोकसभे करिता २६एप्रिल ला मतदान होणार आहे,या निवडणुकीत धन शक्तीचा मारा तर एकीकडे जनसमूहाचा जमाव मत आपल्याकडे कसे आकर्षित होतील यासाठी ची जुळवाजुळव चालु झाली आहेया निवडणुकीत बंडखोर फुटीर शिवसेना कि वास्तविक शिवसेना अशी लढत प्रामुख्याने चर्चेत असतांना वन मिशन बुलढाणा शेतकरीनेते यांच्यातच प्रमुख लढत होणार असल्याचे आज तरी दिसत आहेया निवडणुकी करिता एकुण २१ऊमेदवार कायम असल्याचे स्पष्ठ झाले आहे यामध्येमेहकर तालुक्यातुन— २,बुलढाणा तालुक्यातुन—९चिखली तालुक्यातुन—५ देऊळगाव राजा तालुक्यातुन—१खामगाव तालुक्यातुन —३ ,अकोला जिल्ह्यातुन—१असे अर्ज प्राप्त झाले आहेत तर सर्वाधिक ऊमेदवार बुलढाणा येथुन ९ अर्ज तर खामगाव तालुक्यातुन ज्यामध्ये संतोष ईंगळे,ऊध्दव ओंकार आटोळे ,मोहमंद हसन ईनामदार यांनी अर्ज सादर केले आहेत तर आज खामगाव येथे काॅग्रेस पक्षाच्या एकीचे दर्शन महाविर भवन येथे पहावयास मिळाले यामध्ये अगदी झाडुनपुसुन रुसवे फुगवे बाजुला सारत एकञीत ईंडीया आधाडीचे ऊमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकरांनसाठी दिसल्याने हा एकञीत पणा शेवटपर्यन्त राहिला तर या लोकसभेला वेगळे चिञ निर्माण होऊ शकते
byदिव्यांग शक्ती
-
0